२८ एप्रिल–४ मे
नीतिवचनं ११
गीत ८७ आणि प्रार्थना | सुरुवातीचे शब्द (१ मि.)
१. असं बोलू नका!
(१० मि.)
तुमच्या ‘शेजाऱ्याचं’ नुकसान होईल असं काही बोलू नका (नीत ११:९; टेहळणी बुरूज०२ ५/१५ २६ ¶४)
फुटी पाडणाऱ्या गोष्टी बोलू नका (नीत ११:११; टेहळणी बुरूज०२ ५/१५ २७ ¶२-३)
इतरांच्या गुप्त गोष्टी उघड करू नका (नीत ११:१२, १३; टेहळणी बुरूज०२ ५/१५ २७ ¶५)
यावर मनन करा: लूक ६:४५ मधले येशूचे शब्द आपल्याला वाईट बोलण्यापासून दूर राहायला कसे मदत करतात?
२. आध्यात्मिक रत्नं शोधा
(१० मि.)
-
नीत ११:१७—इतरांवर दया केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (सावध राहा!२०.१ ११, चौकट)
-
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला कोणती आध्यात्मिक रत्नं मिळाली?
३. बायबल वाचन
(४ मि.) नीत ११:१-२० (शिकवणे अभ्यास ५)
४. संभाषण सुरू करण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. अलीकडच्या सभेमध्ये तुम्ही शिकलेली गोष्ट समोरच्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करा. (शिष्य बनवा धडा २ मुद्दा ४)
५. पुन्हा भेटण्यासाठी
(४ मि.) अनौपचारिक साक्षकार्य. शिकवण्याच्या साधनांमधला एखादा व्हिडिओ दाखवा. (शिष्य बनवा धडा ८ मुद्दा ३)
६. शिष्य बनवण्यासाठी
(४ मि.) सार्वजनिक साक्षकार्य. बायबल अभ्यासासाठी विचारा आणि तो कसा केला जातो ते दाखवा. (शिष्य बनवा धडा १० मुद्दा ३)
गीत १५७
७. तुमच्या जीभेमुळे शांती भंग होऊ देऊ नका
(१५ मि.) चर्चा.
अपरिपूर्ण असल्यामुळे आपण बोलण्यात चुकतो. (याक ३:८) म्हणून चुकीच्या गोष्टी बोलल्यामुळे कोणते परिणाम होऊ शकतात याचा आपण आधीच विचार केला पाहिजे. यामुळे आपल्याला असं बोलणं टाळता येईल ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होऊ शकतो. कोणत्या प्रकारच्या बोलण्यामुळे मंडळीची शांती भंग होऊ शकते ते खाली सांगितलं आहे:
-
फुशारकी मारणं. अशा प्रकारचं बोलणं स्वतःची बढाई मारण्यासाठी केलं जातं. यामुळे दुसऱ्यांच्या मनात स्पर्धेची आणि ईर्ष्येची भावना येऊ शकते.—नीत २७:२
-
खोटं बोलणं. यात फक्त खोटं बोलणंच सामील नाही, तर एखाद्याला भरकटवण्यासाठी मुद्दामहून काही गोष्टी सांगणंसुद्धा सामील आहे. आपण थोडं जरी खोटं बोललो तरी आपलं चांगलं नाव खराब होऊ शकतं आणि इतरांचा आपल्यावरचा भरवसा कमी होऊ शकतो.—उप १०:१
-
इतरांची बदनामी करणाऱ्या गप्पागोष्टी. यात विनाकारण इतरांबद्दल बोलणं सामील आहे. यामुळे त्यांच्या खाजगी गोष्टी उघड होऊ शकतात किंवा त्यांच्याबद्दल अफवा उठू शकतात. (१ती ५:१३) अशा प्रकारच्या गप्पागोष्टी केल्यामुळे भांडणं होऊ शकतात आणि फुटी पडू शकतात
-
रागाने बोलणं. आपलं मन दुखावणाऱ्या व्यक्तीला भावनेच्या भरात नको ते बोलणं म्हणजे रागाने बोलणं. (इफि ४:२६) यामुळे त्या व्यक्तीला खूप वाईट वाटू शकतं.—नीत २९:२२
शांती भंग करणाऱ्या गोष्टी आपल्यामधून ‘काढून टाका’—निवडक भाग हा व्हिडिओ दाखवा. मग भाऊबहिणींना विचारा:
-
आपल्या चुकीच्या बोलण्यामुळे मंडळीची शांती किती सहजपणे भंग होऊ शकते, याबद्दल तुम्हाला काय शिकायला मिळालं?
मंडळीत पुन्हा शांती कशी निर्माण झाली हे जाणून घ्यायला “शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा” हा व्हिडिओ पाहा.
८. मंडळीचा बायबल अभ्यास
(३० मि.) साक्ष द्या अध्या. २५ ¶१४-२१