स्तोत्रं १३९:१-२४

  • देव आपल्या सेवकांना चांगल्या प्रकारे ओळखतो

    • देवाच्या पवित्र शक्‍तीपासून निसटू शकत नाही ()

    • “तू मला किती अद्‌भुत रितीने बनवलंस” (१४)

    • मी गर्भात असताना तू मला पाहिलंस (१६)

    • “मला सर्वकाळाच्या मार्गावर चालव” (२४)

दावीदचं गीत. स्तुतिगीत. संचालकासाठी. १३९  हे यहोवा, तू मला तपासून पाहिलं आहेस आणि तू मला ओळखतोस.+  २  माझं बसणं आणि माझं उठणं तुला माहीत आहे.+ माझे विचार तू दुरूनच ओळखतोस.+  ३  मी प्रवास करतो आणि विश्रांती घेतो, तेव्हा तू मला पाहतोस;*माझे सर्व मार्ग तू जाणतोस.+  ४  हे यहोवा, माझ्या तोंडातून शब्द फुटण्याआधीचतुला तो माहीत असतो.+  ५  माझ्या मागे आणि पुढे, सर्व बाजूंनी तू माझं रक्षण करतोस,तू आपला हात माझ्यावर ठेवतोस.  ६  हे ज्ञान माझ्या समजण्यापलीकडे;*माझ्या आवाक्याबाहेरचं आहे.*+  ७  मी तुझ्या पवित्र शक्‍तीपासून* निसटून कुठे जाऊ शकतो? तुझ्यासमोरून मी कुठे पळून जाऊ शकतो?+  ८  जर मी आकाशात चढून गेलो, तर तू तिथे असशील,आणि जर मी कबरेत* अंथरूण घातलं, तर पाहा! तिथेही तू असशील.+  ९  जर मी पहाटेच्या पंखांवर स्वार होऊन,सर्वात दूरच्या समुद्राजवळ राहायला गेलो, १०  तर, तिथेही तुझा हात मला मार्ग दाखवेलआणि तुझा उजवा हात मला सांभाळेल.+ ११  “अंधार मला नक्कीच लपवू शकेल,” असं जर मी म्हणालो,तर माझ्याभोवती रात्रीचा अंधार, प्रकाशात बदलेल. १२  काळोखही तुझ्यासाठी पुरेसा दाट नसेल;उलट, रात्रसुद्धा दिवसाइतकीच लख्ख असेल.+ तुझ्यासाठी काळोख आणि प्रकाश सारखाच!+ १३  कारण तूच माझे अवयव* निर्माण केलेस;माझ्या आईच्या पोटात,* तू मला पडद्याआड ठेवलंस.+ १४  तू मला किती अद्‌भुत रितीने बनवलंस,+ हे पाहून मी विस्मित होतोआणि म्हणून मी तुझी स्तुती करतो! तुझी कार्यं अद्‌भुत आहेत,+याची मला जाणीव आहे. १५  जेव्हा मला गुप्त ठिकाणी बनवण्यात आलं आणि पृथ्वीच्या सगळ्यात खोल भागांत मी आकार घेत होतो,*तेव्हा माझी हाडं तुझ्यापासून लपलेली नव्हती.+ १६  मी गर्भात होतो, तेव्हा तुझ्या डोळ्यांनी मला पाहिलं;माझ्या शरीराच्या भागांपैकी एकही अस्तित्वात येण्याआधी,त्या सर्वांबद्दल आणि त्यांची रचना झाली त्या दिवसांबद्दल,तुझ्या पुस्तकात लिहिलेलं होतं. १७  म्हणूनच, हे देवा, तुझे विचार मला फार मौल्यवान वाटतात!+ त्यांची बेरीज करता येणार नाही!+ १८  मी ते मोजू लागलो, तर त्यांची संख्या वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.+ सकाळी जाग आल्यावरही, मी ते मोजतच असेन.*+ १९  हे देवा, कृपा करून दुष्टांचा नाश कर!+ म्हणजे हिंसाचार करणारे* माझ्यापासून दूर होतील. २०  जे दुष्ट हेतूने* तुझ्याविरुद्ध बोलतात,ते तुझे शत्रू आहेत; ते तुझ्या नावाचा गैरवापर करतात.+ २१  हे यहोवा, जे तुझा द्वेष करतात, त्यांचा मी द्वेष करत नाही का?+ जे तुझ्याविरुद्ध बंड करतात, त्यांची मला घृणा वाटत नाही का?+ २२  हो, अगदी मनापासून मी त्यांचा द्वेष करतो.+ ते खरोखर माझे शत्रू आहेत. २३  हे देवा, मला तपासून पाहा आणि माझं मन ओळख.+ माझी पारख कर आणि माझ्या चिंता* जाणून घे.+ २४  चुकीच्या मार्गावर नेणारी एखादी गोष्ट तर माझ्यात नाही ना, हे पाहा+आणि मला सर्वकाळाच्या मार्गावर चालव.+

तळटीपा

शब्दशः “मापतोस.”
किंवा “माझ्यासाठी खूपच अद्‌भुत.”
किंवा “माझ्या मोजण्यापलीकडे आहे.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “गुरदे.”
किंवा “उदरात.”
शब्दशः “विणला जात होतो.”
शब्दशः “मी अजूनही तुझ्यासोबत आहे.”
किंवा “रक्‍तपाताचे दोषी.”
किंवा “स्वतःच्या कल्पनेप्रमाणे.”
किंवा “मला अस्वस्थ करणारे विचार.”