स्तोत्रं १२०:१-७
चढणीचं गीत.*
१२० मी माझ्या संकटात यहोवाला हाक मारली,+आणि त्याने मला उत्तर दिलं.+
२ हे यहोवा, मला* खोटं बोलणाऱ्या ओठांपासून
आणि फसवणाऱ्या जिभेपासून वाचव.
३ अगं फसवणाऱ्या जिभे!+
तो तुझं काय करेल? तुला कोणती शिक्षा देईल?
४ योद्ध्याच्या तीक्ष्ण बाणांनी+आणि जळत्या निखाऱ्यांनी+ तो तुला शिक्षा देईल.
५ हाय हाय! मी मेशेखमध्ये+ विदेशी म्हणून राहिलो;मी केदारमधल्या+ तंबूंमध्ये राहिलो.
६ शांतीचा द्वेष करणाऱ्यांसोबत,मी खूप काळ राहिलो.+
७ मी शांतिप्रिय आहे; पण जेव्हा मी बोलतो,तेव्हा ते युद्ध करायला येतात.