स्तोत्रं ११४:१-८

  • इस्राएलची इजिप्तमधून सुटका

    • सागर पळून गेला ()

    • पर्वत मेंढ्यांसारखे उड्या मारू लागले ()

    • गारगोटी खडकातून झरे वाहू लागले ()

११४  जेव्हा इस्राएल इजिप्तमधून बाहेर निघाला;+जेव्हा विदेशी भाषा बोलणाऱ्‍या लोकांमधून, याकोबचं घराणं बाहेर निघालं,  २  तेव्हा यहूदा हे देवाचं पवित्र ठिकाण बनलंआणि इस्राएल देवाचं राज्य बनलं.+  ३  सागराने हे पाहिलं आणि तो पळून गेला;+यार्देन हे पाहून मागे वळली.+  ४  तेव्हा पर्वत मेंढ्यांप्रमाणे,आणि टेकड्या कोकरांप्रमाणे उड्या मारू लागल्या.+  ५  हे सागरा, तू का पळालास?+ हे यार्देन, तू का मागे वळलीस?+  ६  हे पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणेआणि हे टेकड्यांनो, तुम्ही कोकरांप्रमाणे उड्या का मारायला लागलात?  ७  हे पृथ्वी, प्रभूमुळे,याकोबच्या देवामुळे थरथर काप!+  ८  तो खडकाचं तळं करतो;गारगोटी खडकातून झरे वाहायला लावतो.+

तळटीपा