मत्तयने सांगितलेला संदेश १:१-२५
१ अब्राहामचा वंशज+ दावीद, दावीदचा वंशज+ येशू ख्रिस्त* याच्या जीवनाचा अहवाल:*
२ अब्राहामला इसहाक झाला;+इसहाकला याकोब;+याकोबला, यहूदा+ आणि त्याचे भाऊ झाले;
३ यहूदाला तामारपासून पेरेस आणि जेरह झाले;+पेरेसला हेस्रोन;+हेस्रोनला राम+ झाला;
४ रामला अम्मीनादाब झाला;अम्मीनादाबला नहशोन;+नहशोनला सल्मोन झाला;
५ सल्मोनला राहाबपासून+ बवाज झाला;बवाजला रूथपासून ओबेद;+ओबेदला इशाय झाला;+
६ इशायला दावीद राजा झाला.+
दावीदला, जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून शलमोन झाला;+
७ शलमोनला रहबाम+ झाला;रहबामला अबीया;अबीयाला आसा झाला;+
८ आसाला यहोशाफाट झाला;+यहोशाफाटला यहोराम;+यहोरामला उज्जीया झाला;
९ उज्जीयाला योथाम झाला;+योथामला आहाज;+आहाजला हिज्कीया झाला;+
१० हिज्कीयाला मनश्शे झाला;+मनश्शेला आमोन;+आमोनला योशीया झाला;+
११ यहुद्यांना बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं, त्या काळात+ योशीयाला+ यखन्या+ आणि त्याचे भाऊ झाले.
१२ बाबेलच्या बंदिवासात गेल्यानंतर यखन्याला शल्तीएल झाला;शल्तीएलला जरूब्बाबेल झाला;+
१३ जरूब्बाबेलला अबीहूद झाला;अबीहूदला एल्याकीम;एल्याकीमला अज्जुर झाला;
१४ अज्जुरला सादोक झाला;सादोकला याखीम;याखीमला एलीहूद झाला;
१५ एलीहूदला एलाजार झाला;एलाजारला मत्तान;मत्तानला याकोब झाला;
१६ याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरीयाचा पती होता. मरीयाच्या पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.+
१७ अशा प्रकारे अब्राहामपासून दावीदपर्यंत १४ पिढ्या झाल्या. दावीदपासून यहुद्यांच्या बाबेलमधल्या बंदिवासापर्यंत १४ पिढ्या झाल्या आणि बाबेलमधल्या बंदिवासापासून ख्रिस्तापर्यंत १४ पिढ्या झाल्या.
१८ येशू ख्रिस्ताचा जन्म अशा प्रकारे झाला: त्याची आई मरीया हिचं योसेफशी लग्न ठरलं होतं. पण, त्यांचं लग्न होण्याआधीच ती पवित्र शक्तीने* गरोदर राहिली.+
१९ तिचा नवरा योसेफ एक चांगला* माणूस असल्यामुळे त्याला चारचौघांत तिची बदनामी होऊ द्यायची नव्हती. म्हणून त्याने तिला गुपचूप घटस्फोट* द्यायचं ठरवलं.+
२० पण त्याने या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर यहोवाच्या* दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिलं. तो त्याला म्हणाला: “योसेफ, दावीदच्या मुला, मरीयाशी लग्न करायला* घाबरू नकोस, कारण तिच्या पोटात असलेला गर्भ पवित्र शक्तीमुळे* आहे.+
२१ तिला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव येशू* ठेव,+ कारण तो आपल्या लोकांची त्यांच्या पापांपासून सुटका करेल.”*+
२२ यहोवाने* आपल्या संदेष्ट्याद्वारे सांगितलेलं वचन पूर्ण व्हावं, म्हणून या सगळ्या गोष्टी खरोखरच घडल्या. त्याने असं सांगितलं होतं:
२३ “पाहा! कुमारी गर्भवती होईल आणि ती एका मुलाला जन्म देईल. त्याचं नाव इम्मानुएल+ ठेवलं जाईल.” या नावाचा अर्थ “देव आपल्यासोबत आहे” असा होतो.+
२४ मग योसेफ झोपेतून जागा झाला. त्याने यहोवाच्या* दूताने सांगितल्याप्रमाणे केलं आणि आपल्या बायकोला घरी आणलं.
२५ पण तिने मुलाला जन्म देईपर्यंत+ त्याने तिच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्याने मुलाचं नाव येशू ठेवलं.+
तळटीपा
^ किंवा “याची वंशावळ.”
^ किंवा “मसीहा; देवाचा अभिषिक्त.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “नीतिमान.”
^ यहुदी परंपरेनुसार, लग्न ठरल्यावर ते मोडण्यासाठी घटस्फोट द्यावा लागायचा.
^ ख्रिस्ती ग्रीक भाषांतरात देवाचं नाव ‘यहोवा’ हे २३७ ठिकाणी आढळतं; त्यांपैकी हे पहिलं. अति. क५ पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “आपली बायको मरीया हिला घरी आणायला.”
^ हे नाव येशूवा किंवा यहोशवा या हिब्रू नावाचं रूप आहे. या नावाचा अर्थ “यहोवा तारण करतो” असा होतो.
^ शब्दशः “आपल्या लोकांचं तारण करेल.”