अभ्यास ६
शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा
योहान १०:३३-३६
सारांश: फक्त शास्त्रवचन वाचून पुढच्या मुद्द्याकडे जाऊ नका. तुम्ही वाचलेल्या शास्त्रवचनात आणि सांगत असलेल्या मुद्यात काय संबंध आहे हे श्रोत्यांना चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे.
हे कसं कराल:
-
मुख्य शब्दांवर जोर द्या. शास्त्रवचन वाचल्यानंतर त्यातील अशा शब्दांवर जोर द्या जे तुमच्या मुख्य मुद्द्याशी संबंधित आहेत. ते शब्द वारंवार बोलून किंवा वचनातील मुख्य शब्द कोणते आहेत हे श्रोत्यांना प्रश्न विचारून तुम्ही असं करू शकता.
-
मुख्य मुद्द्यांवर जोर द्या. एखादं शास्त्रवचन तुम्ही का वाचत आहात याचं कारण तुम्ही आधी सांगितलं असेल, तर त्या वचनातील मुख्य शब्द त्या कारणाशी कसे संबंधित आहेत हे समजावून सांगा.
-
शास्त्रवचन कसं लागू होतं हे सोप्या शब्दात सांगा. मुख्य मुद्द्याशी संबंधित नसलेली माहिती देण्याचं टाळा. श्रोत्यांना विषयाबद्दल आधीच किती माहिती आहे ते लक्षात घेऊन, त्यांना तो मुद्दा चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी आणखी किती माहिती द्यायची हे ठरवा.