अध्याय सतरा
प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
-
आपण देवाला प्रार्थना का केली पाहिजे?
-
देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात म्हणून आपण काय केले पाहिजे?
-
देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर कसे देतो?
१, २. प्रार्थनेला आपण सर्वात मोठा सन्मान का समजले पाहिजे आणि याविषयावर बायबल काय म्हणते, हे जाणून घेणे महत्त्वाचे का आहे?
अफाट विश्वाच्या तुलनेत पृथ्वी खूप लहान आहे. ‘आकाश व पृथ्वीच्या निर्माणकर्त्यासमोर’ अर्थात यहोवासमोर तर मानवजातीची राषट्रे बादलीतल्या पाण्याच्या एका थेंबासमान आहेत. (स्तोत्र ११५:१५; यशया ४०:१५) तरीपण बायबल म्हणते: “जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी” ऐकतो. (स्तोत्र १४५:१८, १९) याचा काय अर्थ होतो यावर जरा विचार करा! सर्वशक्तिमान निर्माणकर्ता आपल्या जवळ आहे आणि आपण “खऱ्या भावाने त्याचा धावा” करतो तेव्हा तो आपले ऐकेल. खरेच, प्रार्थनेद्वारे देवाबरोबर बोलण्याचा केवढा मोठा सन्मान आपल्याला मिळाला आहे!
२ यहोवाने आपली प्रार्थना ऐकावी असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण, त्याला मान्य असलेल्या मार्गाने प्रार्थना केली पाहिजे. पण प्रार्थनेविषयी बायबल काय म्हणते हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण असे करू शकत नाही. त्यामुळे या विषयावर शास्त्रवचनांत काय म्हटले आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण प्रार्थनेमुळे आपण देवाच्या आणखी जवळ येतो.
यहोवाला प्रार्थना का करावी?
३. आपण यहोवाला प्रार्थना का केली पाहिजे याचे एक महत्त्वपूर्ण कारण काय आहे?
३ यहोवाला प्रार्थना करण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तो फिलिप्पैकर ४:६, ७) विश्वाच्या सार्वभौम शासकाने आपल्यासाठी केलेल्या या दयाळू तरतूदीकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये.
आपल्याला असे करण्याचे आमंत्रण देतो. त्याचे वचन असे उत्तेजन देते: “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (४. नियमित प्रार्थना केल्यामुळे यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध कशाप्रकारे मजबूत होतो?
४ प्रार्थना करण्याचे दुसरे एक कारण म्हणजे, यहोवाला नियमित प्रार्थना केल्यामुळे त्याच्याबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत होतो. खरे मित्र त्यांना फक्त काहीतरी हवे असते तेव्हाच एकमेकांबरोबर बोलत नाहीत. तर, ते एकमेकांमध्ये रस घेतात, ते एकमेकांजवळ आपले विचार, आपल्या चिंता, आपल्या भावना व्यक्त करतात तेव्हा त्यांच्या मैत्रीचे बंधन आणखी मजबूत होते. काही बाबतीत, यहोवाबरोबरचा आपला नातेसंबंध काहीसा असाच आहे. या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही, यहोवा, त्याचे गुण, त्याचा उद्देश या विषयांवर बायबल काय शिकवते ते जाणून घेतले आहे. तुम्ही त्याला एक खरी व्यक्ती म्हणून ओळखू लागला आहात. प्रार्थनेमुळे तुम्हाला, तुमचे विचार, तुमच्या अगदी अंतरिक भावना तुमच्या स्वर्गीय पित्याला याकोब ४:८.
सांगण्याची संधी मिळते. असे केल्याने तुम्ही यहोवाच्या आणखी जवळ येता.—आपण कोणत्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत?
५. यहोवा सर्वच प्रार्थना ऐकत नाही, हे कशावरून दिसून येते?
५ यहोवा सर्वच प्रार्थना ऐकतो का? संदेष्टा यशया याच्या दिवसांतील बंडखोर इस्राएली लोकांना त्याने काय सांगितले ते पाहा: “तुम्ही कितीहि विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.” (यशया १:१५) म्हणजे, कधीकधी आपल्या विशिष्ट कार्यांमुळे यहोवा आपल्या प्रार्थना ऐकत नाही. यास्तव, देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण काही मूलभूत अटी पूर्ण करण्याची गरज आहे.
६. देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर सर्वात पहिली अट कोणती आहे आणि ही अट आपण कशी पूर्ण करू शकतो?
६ पहिली अट म्हणजे, आपण विश्वास दाखवला पाहिजे. (मार्क ११:२४) प्रेषित पौलाने लिहिले: “विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) खरा विश्वास असणे म्हणजे, देव आहे आणि तो आपल्या प्रार्थना ऐकतो व त्यांचे उत्तर देतो इतकेच माहीत असणे नव्हे. आपला विश्वास कार्यांवरून दिसून येतो. आपण दररोजचे जीवन ज्याप्रकारे जगतो त्यावरून आपल्याला विश्वास आहे हे स्पष्टपणे दिसले पाहिजे.—याकोब २:२६.
७. (क) प्रार्थनेद्वारे यहोवाशी बोलताना आपण आदर का दाखवला पाहिजे? (ख) देवाला प्रार्थना करताना, आपण नम्रता व प्रामाणिकपणा कसा दाखवू शकतो?
७ यहोवाची अशीही अट आहे, की त्याला प्रार्थना करणाऱ्यांनी नम्र व प्रामाणिकपणे प्रार्थना केली पाहिजे. यहोवाबरोबर बोलताना नम्रतेने बोलण्यासाठी आपल्याजवळ अनेक कारणे नाहीत का? लोकांना एखाद्या राजाशी किंवा राष्ट्रपतींशी बोलायची संधी मिळते तेव्हा ते त्यांच्या अधिकाराला मान देऊन अगदी अदबीने त्यांच्याशी बोलतात. मग, यहोवाशी बोलताना आपण आणखी किती नम्रतेने बोलले पाहिजे! (स्तोत्र १३८:६) तो तर “सर्वसमर्थ देव आहे!” (उत्पत्ति १७:१) देवाला प्रार्थना करताना, आपण ज्यापद्धतीने त्याला प्रार्थना करतो त्यावरून, त्याच्यासमोर आपली काय योग्यता आहे हे आपण नम्रपणे ओळखले आहे, हे दिसले पाहिजे. अशाप्रकारची नम्रता आपल्याला, तीच रटाळ प्रार्थना करण्याऐवजी, अगदी मनापासून बोलण्यास प्रवृत्त करेल.—मत्तय ६:७, ८.
८. आपण ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो त्यांच्या अनुषंगाने कार्य कसे करू शकतो?
८ आणखी एक अट म्हणजे, आपण आपल्या प्रार्थनांच्या अनुषंगाने वागले पाहिजे. आपण ज्या ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो त्यांसाठी आपण आपल्यापरीने प्रयत्नही केले पाहिजे, अशी यहोवाची इच्छा आहे. जसे की आपण जर “आमची रोजची भाकर आज आम्हास दे” अशी प्रार्थना करत असू तर, आपण मिळेल ते काम, कष्टाने केले पाहिजे. (मत्तय ६:११; २ थेस्सलनीकाकर ३:१०) आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करण्यासाठी आपण प्रार्थना करत असलो तर आपण अशी सर्व परिस्थिती व प्रसंग टाळले पाहिजेत ज्यांच्यामुळे आपण मोहात पडू. (कलस्सैकर ३:५) या मूलभूत अटींव्यतिरिक्त प्रार्थनेविषयी काही प्रश्नही आहेत ज्यांची उत्तरे आपण शोधली पाहिजेत.
प्रार्थनेविषयी काही प्रश्नांची उत्तरे देणे
९. आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे आणि कोणाद्वारे?
९ आपण कोणाला प्रार्थना केली पाहिजे? येशूने आपल्या अनुयायांना ‘स्वर्गातील पित्याला’ प्रार्थना करण्यास शिकवले. (मत्तय ६:९) तर आपण फक्त यहोवा देवाला प्रार्थना केली पाहिजे. परंतु, आपण यहोवाच्या एकुलत्या एका पुत्राचे अर्थात येशू ख्रिस्ताचे स्थान मान्य केले पाहिजे, अशी यहोवा अपेक्षा करतो. आपण पाचव्या अध्यायात शिकलो, की आपल्याला पाप आणि मृत्यूतून सोडवण्याकरता येशूला पृथ्वीवर खंडणी म्हणून अर्पण करण्यात आले. (योहान ३:१६; रोमकर ५:१२) तो नियुक्त प्रमुख याजक आणि न्यायाधीश आहे. (योहान ५:२२; इब्री लोकांस ६:२०) यास्तव, आपण आपल्या प्रार्थना येशूच्या नावाने केल्या पाहिजेत, असे शास्त्रवचने सांगतात. येशू स्वतः म्हणाला होता: “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” (योहान १४:६) देवाने आपल्या प्रार्थना ऐकाव्यात असे आपल्याला वाटत असेल तर आपण येशूच्या नावाने फक्त यहोवालाच प्रार्थना केली पाहिजे.
१०. प्रार्थना करताना आपण एका विशिष्ट स्थितीतच असण्याची गरज का नाही?
१० प्रार्थना करताना आपण विशिष्ट स्थितीत असण्याची गरज आहे का? नाही. आपले हात किंवा आपले शरीर विशिष्ट स्थितीत असावे, अशी यहोवा अपेक्षा करीत नाही. वेगवेगळ्या स्थितीत प्रार्थना केली जाऊ शकते, असे बायबल शिकवते. यांमध्ये, बसणे, वाकणे, गुडघे टेकणे किंवा उभे राहणे, समाविष्ट आहे. (१ इतिहास १७:१६; नहेम्या ८:६; दानीएल ६:१०; मार्क ११:२५) इतरांना दिसेल अशी विशिष्ट स्थिती महत्त्वाची नाही तर आपल्या अंतःकरणाची स्थिती अधिक महत्त्वाची आहे. खरे तर, दररोजच्या कामात असताना किंवा आपल्यासमोर एखादा तातडीचा प्रसंग येतो तेव्हा आपण कोठेही असलो तरी मनातल्या मनात प्रार्थना करू शकतो. इतरांनी जरी आपल्याला प्रार्थना करताना पाहिले नसेल तरी यहोवा अशा प्रार्थना ऐकतो.—नहेम्या २:१-६.
११. प्रार्थना करण्यास उचित असलेल्या काही व्यक्तिगत गोष्टी कोणत्या आहेत?
११ आपण कशाविषयी प्रार्थना करू शकतो? बायबल म्हणते: “आपण त्याच्या [यहोवाच्या] इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.” (१ योहान ५:१४) तेव्हा आपण देवाच्या इच्छेच्या अनुषंगात असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी प्रार्थना करू शकतो. आपल्या व्यक्तिगत गोष्टींविषयी त्याला प्रार्थना करणे हे त्याच्या इच्छेच्या अनुषंगात आहे का? होय! यहोवाला प्रार्थना करणे एखाद्या अगदी जिवलग मित्राशी बोलण्यासारखे आहे. आपण “त्याच्यापुढे आपले मन मोकळे” करू. (स्तोत्र ६२:८) पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना करणे उचित आहे कारण पवित्र आत्मा आपल्याला योग्य ते करण्यास मदत करतो. (लूक ११:१३) सुज्ञ निर्णय घेण्याकरता बुद्धी द्यावी व समस्यांचा सामना करण्यासाठी शक्ती द्यावी अशी देखील आपण प्रार्थना करू शकतो. (याकोब १:५) आपण पाप करतो तेव्हा येशूच्या बलिदानाच्या आधारावर क्षमा मागू शकतो. (इफिसकर १:३, ७) अर्थात आपण फक्त स्वतःसाठीच प्रार्थना करू नये. आपण कुटुंबातील इतर सदस्यांसाठी, सहउपासकांसाठी देखील प्रार्थना केली पाहिजे.—प्रेषितांची कृत्ये १२:५; कलस्सैकर ४:१२.
१२. आपल्या प्रार्थनांत आपण आपल्या स्वर्गीय पित्याशी संबंधित असलेल्या गोष्टींना प्राधान्य कसे देऊ शकतो?
१२ यहोवा देवाशी संबंधित असलेल्या गोष्टींना आपल्या प्रार्थनेत प्राधान्य दिले पाहिजे. यहोवाची मनापासून स्तुती करण्यासाठी आणि त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याचे आभार मानण्याचे आपल्याकडे निश्चितच कारण आहे. (१ इतिहास २९:१०-१३) मत्तय ६:९-१३ मध्ये लिहून ठेवण्यात आलेल्या येशूच्या आदर्श प्रार्थनेत त्याने आपल्याला, देवाचे नाव पवित्र मानण्यास शिकवले. त्यानंतर, देवाचे राज्य येवो आणि जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही त्याच्या इच्छेप्रमाणे होवो म्हटले आहे. यहोवा देवाशी संबंधित असलेल्या या महत्त्वाच्या गोष्टींनंतरच येशूने व्यक्तिगत गोष्टींविषयी प्रार्थना करण्यास शिकवले. तसेच आपणही आपल्या प्रार्थनांत यहोवा देवाला प्राधान्य देतो तेव्हा आपण हे दाखवतो की आपल्याला, फक्त आपल्याच कल्याणाची जास्त काळजी नाही.
१३. स्वीकारयोग्य प्रार्थना किती मोठ्या असाव्यात याविषयी शास्त्रवचनांत काय म्हटले आहे?
१३ आपल्या प्रार्थना किती मोठ्या असाव्यात? खासगी प्रार्थना किंवा जनसभेत केल्या जाणाऱ्या प्रार्थना किती मोठ्या असाव्यात यावर बायबल काही मर्यादा घालत नाही. काही प्रार्थना लहान असू शकतात, जसे भोजनाआधीच्या प्रार्थना; किंवा काही प्रार्थना मोठ्या असू शकतात, जसे की यहोवासमोर आपण आपले मन मोकळे करतो तेव्हा. (१ शमुवेल १:१२, १५) परंतु, येशूने धार्मिकतेचा आव आणणाऱ्या लोकांची टीका केली जे लोकांना दाखवण्यासाठी लांबलचक प्रार्थना करायचे. (लूक २०:४६, ४७) अशा प्रार्थनांनी यहोवा प्रभावीत होत नाही. आपण आपल्या मनापासून प्रार्थना केली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे. तेव्हा, गरजांनुसार व परिस्थितीनुसार स्वीकारयोग्य प्रार्थना मोठ्या असू शकतात किंवा लहान असू शकतात.
१४. “सर्वदा प्रार्थना” करा, असे जेव्हा बायबल आपल्याला उत्तेजन देते त्याचा अर्थ काय होतो आणि हे दिलासा देणारे का आहे?
१४ आपण किती वेळा प्रार्थना करू शकतो? बायबल आपल्याला लूक १८:१; रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) अर्थात, या विधानांवरून असे समजू नये, की आपण दिवसांतील प्रत्येक घडीला प्रार्थना केली पाहिजे. तर बायबल आपल्याला, नियमित प्रार्थना करायला सांगते; यहोवाने आपल्याला दाखवलेल्या चांगुलपणाविषयी आपण सतत त्याचे आभार मानून, मार्गदर्शन, सांत्वन व शक्ती मिळण्यासाठी त्याच्याकडे पाहिले पाहिजे, असे आर्जवते. आपण किती वेळ आणि कितींदा यहोवाला प्रार्थना करू शकतो, यावर त्याने कसलेही बंधन घातलेले नाही हे किती दिलासा देणारे आहे, नाही का? प्रार्थनेच्या सुहक्काची आपण मनापासून कदर केली तर आपल्या स्वर्गीय पित्याला प्रार्थना करण्यासाठी आपल्याला अनेक संधी मिळतील.
“सर्वदा प्रार्थना करावी,” “प्रार्थनेत तत्पर राहा,” व “निरंतर प्रार्थना करा,” असे उत्तेजन देते. (१५. व्यक्तिगत व सार्वजनिक प्रार्थनेच्या शेवटी आपण “आमेन” का म्हटले पाहिजे?
१५ प्रार्थनेच्या शेवटी आपण “आमेन” का म्हटले पाहिजे? “आमेन” या शब्दाचा अर्थ “खात्रीने,” किंवा “असेच होवो” असा होतो. शास्त्रवचनातील उदाहरणे दाखवतात, की व्यक्तिगत आणि सार्वजनिक प्रार्थनांच्या शेवटी “आमेन” म्हणणे उचित आहे. (१ इतिहास १६:३६; स्तोत्र ४१:१३) आपल्या स्वतःच्या प्रार्थनेनंतर आपण जेव्हा “आमेन” म्हणतो तेव्हा, आपण जे जे व्यक्त केले ते पूर्ण मनापासून होते, याची पुष्टी देतो. सार्वजनिक प्रार्थनेच्या शेवटी जेव्हा आपण मनातल्या मनात किंवा मोठ्याने “आमेन” म्हणतो तेव्हा आपण दाखवत असतो, की प्रार्थनेत जे जे म्हटले गेले त्याजशी आपण सहमत आहोत.—१ करिंथकर १४:१६.
देव आपल्या प्रार्थनांचे उत्तर कसे देतो
१६. प्रार्थनेच्या बाबतीत आपण कोणती खात्री बाळगू शकतो?
१६ यहोवा खरोखरच प्रार्थनांचे उत्तर देतो का? होय. ‘जो प्रार्थना ऐकणारा’ आहे तो लाखो मानवांनी केलेल्या प्रामाणिक प्रार्थनांचे उत्तर देतो, असा विश्वास बाळगण्यासाठी आपल्याकडे ठोस कारण आहे. (स्तोत्र ६५:२) यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर वेगवेगळ्या मार्गांनी देतो.
१७. प्रार्थनांचे उत्तर देण्याकरता यहोवा आपल्या देवदूतांचा आणि पृथ्वीवरील आपल्या सेवकांचा उपयोग करतो, असे आपण का म्हणू शकतो?
इब्री लोकांस १:१३, १४) अशी अनेक लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी, बायबल समजण्यासाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर लगेच यहोवाच्या सेवकांशी त्यांची गाठ पडली. हे अनुभव, राज्य प्रचार कार्याला देवदूतांचे मार्गदर्शन असते, हा पुरावा देतात. (प्रकटीकरण १४:६) आपण खरोखर अडचणीत असतो तेव्हा केलेल्या प्रार्थनेचे उत्तर देण्याकरता यहोवा एखाद्या ख्रिस्ती बंधूला किंवा भगिनीला आपल्याला साहाय्य करण्यास प्रवृत्त करेल.—नीतिसूत्रे १२:२५; याकोब २:१६.
१७ प्रार्थनांचे उत्तर देण्याकरता यहोवा आपल्या देवदूतांचा आणि पृथ्वीवरील आपल्या सेवकांचा उपयोग करतो. (१८. आपल्या सेवकांच्या प्रार्थनांचे उत्तर देण्याकरता यहोवा आपला पवित्र आत्मा आणि त्याचे वचन यांचा उपयोग कसा करतो?
१८ आपल्या सेवकांच्या प्रार्थनांचे उत्तर देण्याकरता यहोवा देव त्याचा पवित्र आत्मा आणि त्याचे वचन बायबल यांचाही उपयोग करतो. परीक्षांचा सामना करण्यासाठी पवित्र आत्म्याकरवी मार्गदर्शन व शक्ती देऊन तो आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल. (२ करिंथकर ४:७) मार्गदर्शनासाठी आपण करत असलेल्या प्रार्थनेचे उत्तर सहसा बायबलमधून मिळते. बायबलद्वारे यहोवा देव आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करतो. आपल्या व्यक्तिगत बायबल अभ्यासादरम्यान किंवा मग या पुस्तकासारखे इतर ख्रिस्ती प्रकाशने वाचत असताना साहाय्यक ठरणारी वचने आपल्याला आढळतील. ख्रिस्ती सभांत जे शिकवले जाते त्याद्वारे किंवा मग मंडळीतील एखाद्या हितचिंतक वडिलांच्या उत्तराद्वारे काही शास्त्रवचनीय मुद्दे आपल्या लक्षात आणून दिली जातील.—गलतीकर ६:१.
१९. आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळत नाही, असे जेव्हा कधीकधी आपल्याला वाटते तेव्हा आपण काय लक्षात ठेवले पाहिजे?
१९ आपल्या प्रार्थनांचे उत्तर देण्यास यहोवा विलंब करत आहे, असे कधीकधी आपल्याला वाटत असते तेव्हा, त्याला उत्तर देता येत नाही, हे त्यामागचे कारण आहे असे नाही. तर, यहोवा त्याच्या इच्छेनुरूप आणि त्याच्या नियुक्त वेळी प्रार्थनांचे उत्तर देतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याला आपल्या गरजा माहीत आहेत व त्या गरजा कशा पूर्ण करायच्या हे आपल्यापेक्षा त्याला जास्त चांगल्याप्रकारे माहीत आहे. बरेचदा तो आपल्याला ‘मागत राहायला, शोधत राहायला आणि ठोकत राहायला लावतो.’ (लूक ११:) आपल्या चिकाटीवरून देवाला दिसते, की आपली इच्छा तीव्र आहे आणि आपला विश्वास खरा आहे. शिवाय, आपल्याला दिसत नाही अशाप्रकारे कधीकधी यहोवा आपल्या प्रार्थनांचे उत्तर देईल. जसे की, एखाद्या विशिष्ट परीक्षेविषयी आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तो आपल्यावरील ते संकट काढून टाकणार नाही तर त्या संकटात टिकून राहायला तो आपल्याला शक्ती देईल.— ५-१०फिलिप्पैकर ४:१३.
२०. प्रार्थना करण्याच्या अमूल्य विशेषाधिकाराचा आपण पुरेपूर लाभ का घेतला पाहिजे?
२० या अफाट विश्वाचा निर्माणकर्ता, जे त्याला उचितरीत्या प्रार्थना करतात त्या सर्वांच्या निकट आहे, याबद्दल आपण त्याचे किती आभारी आहोत! (स्तोत्र १४५:१८) तेव्हा, प्रार्थना करण्याच्या या अमूल्य विशेषाधिकाराचा पुरेपूर लाभ आपण घेऊ या! असे केल्यास आपल्याला, प्रार्थना ऐकणाऱ्या यहोवा देवाच्या आणखी जवळ येण्याची आनंदी प्रत्याशा आहे.