बायबल नेमके काय शिकवते?
आज आपल्याला दुःख का सहन करावे लागते, मेल्यानंतर आपले काय होते, कौटुंबिक जीवन आनंदी कसे बनवायचे वगैरे वगैरे सारख्या विषयांवर बायबलमध्ये काय सांगितले आहे ते माहीत करून घेण्याकरता हे पुस्तक बनवण्यात आले आहे.
देवाचा हाच उद्देश होता का?
आज इतक्या समस्या का आहेत? असा प्रश्न कदाचित तुमच्या मनात येईल. बायबल आपल्याला सांगतं का लवकरच परिस्थिती बदलेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का?
अध्याय १
देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?
देव तुमची काळजी घेतो असे तुम्हाला वाटते का? त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि तुम्ही त्याच्या जवळ कसे जाऊ शकता त्याविषयी अधिक जाणून घ्या.
अध्याय २
बायबल—देवाकडून आलेले पुस्तक
तुमच्या वैयक्तिक समस्यांच्या बाबतीत बायबलमधील सल्ला कसा उपयोगी ठरू शकतो? बायबलमधील भविष्यवाणींवर तुम्ही भरवसा ठेवू शकता का?
अध्याय ३
पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
पृथ्वीला नंदनवन बनवण्याचा देवाचा उद्देश पूर्ण होईल का? होईल तर मग केव्हा होईल?
अध्याय ४
येशू ख्रिस्त कोण आहे?
येशू वचन दिलेला मशीहा का आहे, तो कोठून आला आणि यहोवाचा एकुलता एक पुत्र का आहे याबद्दल आणखी जाणून घ्या.
अध्याय ५
खंडणी—देवाची सर्वात अमूल्य भेट
खंडणी म्हणजे काय? येशूने दिलेल्या खंडणीचा तुम्हाला फायदा कसा होऊ शकतो?
अध्याय ६
मृत कोठे आहेत?
मृत लोक कोठे आहेत आणि मानव का मरतात याबद्दल बायबलमध्ये काय सांगितले आहे ते जाणून घ्या.
अध्याय ७
मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा
तुमच्या कोणा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे का? आपण त्यांना पुन्हा पाहू शकू का? पुनरुत्थानाबद्दल बायबलमध्ये काय सांगितले आहे ते जाणून घ्या.
अध्याय ८
देवाचे राज्य काय आहे?
पुष्कळ लोकांना ‘प्रभूची प्रार्थना’ माहीत आहे. त्या प्रार्थनेतील, “तुझं राज्य येवो” या शब्दांचा काय अर्थ होतो?
अध्याय ९
आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?
आपल्या आजूबाजूला आपण पाहत असलेली लोकांची वृत्ती आणि त्यांचे आचरण यावरून कसे सिद्ध होते की आपण बायबलमध्ये भाकीत करण्यात आलेल्या शेवटल्या दिवसांत राहत आहोत, त्याबद्दल आणखी जाणून घ्या.
अध्याय १०
आत्मिक प्राणी—आपल्यावर यांचा काय प्रभाव आहे
बायबलमध्ये देवदूत आणि दुरात्मे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे आत्मिक प्राणी खरे आहेत का? त्यांचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो का?
अध्याय ११
देव दुःख काढून का टाकत नाही?
आज लोकांना सहन करावे लागत असलेले दुःख देवामुळे आहे, असे पुष्कळ लोक मानतात. तुम्हीसुद्धा असेच मानता का? आपल्याला दुःख का सहन करावे लागते त्याची कोणती कारणे आहेत त्याबद्दल आणखी शिकून घ्या.
अध्याय १२
देव संतुष्ट होईल अशाप्रकारे जगणे
देव संतुष्ट होईल अशा प्रकारे जगणे शक्य आहे. आणि तुम्ही त्याचा मित्र बनू शकता.
अध्याय १३
जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन
गर्भपात, रक्त संक्रमण आणि प्राण्यांचे जीवन यांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?
अध्याय १४
कौटुंबिक जीवन सुखी बनवण्याचा मंत्र
येशूने जसे प्रेम दाखवले तसेच प्रेम पती, पत्नी आणि मुले दाखवू शकतात. आपण येशूकडून काय शिकू शकतो?
अध्याय १६
खऱ्या उपासनेची बाजू घ्या
इतरांना तुमचे धार्मिक विश्वास समजावून सांगताना तुम्हाला कोणत्या अडचणी येऊ शकतात? त्यांचे मन न दुखवता तुम्ही तुमच्या धार्मिक विश्वासांबद्दल कसे सांगाल?
अध्याय १७
प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का? या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर तुम्हाला आधी, आपण प्रार्थना कशी केली पाहिजे याबद्दल बायबलमध्ये काय सांगितले आहे ते माहीत करून घ्यावे लागेल.
अध्याय १८
बाप्तिस्मा आणि देवाबरोबर तुमचा नातेसंबंध
ख्रिस्ती बाप्तिस्मा घेण्यासाठी कोणती पावले उचलण्याची गरज आहे? हे कशाचे द्योतक आहे आणि ते कसे केले जाते त्याबद्दल आणखी शिकून घ्या.
अध्याय १९
देवाच्या प्रीतीत राहा
यहोवाने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?
परिशिष्ट
देवाचे नाव—त्याचा वापर आणि अर्थ
अनेक बायबल भाांतांमधून देवाचं नाव काढून टाकण्यात आलं आहे. का काढण्यात आलं आहे? देवाच्या नावाचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे का?
परिशिष्ट
दानीएलाची भविष्यवाणी मशीहाच्या आगमनाविषयी भाकीत करते
मशीहा केव्हा येईल हे देवाने ५०० पेक्षा अधिक वर्षांआधीच भाकीत केले होते. या रोमांचक भविष्यवाणीविषयी आणखी जाणून घ्या.
परिशिष्ट
येशू ख्रिस्त—भाकीत केलेला मशीहा
मशीहाबद्दल बायबलमध्ये सांगितलेली प्रत्येक भविष्यवाणी येशूवर पूर्ण झाली. या भविष्यवाण्या तंतोतंत कशा पूर्ण झाल्या याचे परिक्षण तुमच्या बायबलमधून करा.
परिशिष्ट
पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्याबद्दलचे सत्य
बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्रैक्याची शिकवण बायबलमध्ये दिली आहे. पण हे खरं आहे का?
परिशिष्ट
खरे ख्रिस्ती उपासनेत क्रूसाचा उपयोग का करीत नाहीत
येशूचा मृत्यू क्रूशवर झाला का? बायबलमधून या प्रश्नाचं उत्तर पाहा.
परिशिष्ट
प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण
ख्रिश्चनांना ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी पाळण्याची आज्ञा देण्यात आली आहे. हा विधी केव्हा आणि कसा साजरा केला पाहिजे?
परिशिष्ट
बायबलमध्ये वापरण्यात आलेला “प्राण” किंवा “आत्मा” या शब्दांचा काय अर्थ होतो?
मानवांच्या शरीराचा मृत्यू झाल्यानंतर, अदृश्य असे काहीतरी जिवंत राहते व ते अमर असते. देवाच्या वचनात याविषयावर काय म्हटले आहे?
परिशिष्ट
शेओल आणि हेडीस काय आहेत?
शेओल आणि हेडीस या शब्दांसाठी काही बायबल भाषांतरांमध्ये “कबर” किंवा “नरक” असे शब्द वापरले आहेत. या शब्दांचा खरा अर्थ काय आहे?
परिशिष्ट
न्यायाचा दिवस—म्हणजे काय?
न्यायाचा दिवस सर्व विश्वासू लोकांसाठी आशीर्वाद कसा ठरणार आहे त्याबद्दल आणखी जाणून घ्या.
परिशिष्ट
१९१४—बायबल भविष्यवाणीतील महत्त्वाचे वर्ष
बायबलवर आधारीत कोणते पुरावे दाखवतात की १९१४ एक महत्त्वाचं वर्ष होतं?
परिशिष्ट
आद्यदेवदूत मीखाएल कोण आहे?
बायबलमध्ये या शक्तिशाली आद्यदेवदूताची ओळख करून देण्यात आली आहे. त्याच्याविषयी आणि तो सध्या काय करत आहे याविषयी आणखी जाणून घ्या.
परिशिष्ट
“मोठी बाबेल” कोण आहे?
प्रकटीकरण नावाच्या पुस्तकात एका स्त्रीबद्दल सांगितले आहे जिचे नाव “मोठी बाबेल” असे आहे. ती खरोखरची स्त्री आहे का? बायबलमध्ये तिच्याविषयी काय सांगण्यात आले आहे?
परिशिष्ट
येशूचा जन्म डिसेंबर महिन्यात झाला होता का?
येशूचा जन्म झाला त्यावेळी हवामान कसे होते त्यावर विचार करा. यावरून आपल्याला काय समजते?
परिशिष्ट
आपण सण पाळावेत का?
तुम्ही राहता त्या ठिकाणी साजरे होत असलेल्या बहुतेक सणांचा उगम कोठून आहे? तुम्ही परिक्षण केलं तर तुम्हाला कदाचित धक्का बसेल.