बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
बायबलचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या पुस्तकात, आपल्याला दुःख का सहन करावं लागतं, मेल्यानंतर काय होतं, कुटुंब सुखी कसं बनवायचं, वगैरे विविध विषयांवर बायबलची काय शिकवण आहे ते समजावून सांगितलं आहे.
देवाची आपल्यासाठी काय इच्छा आहे?
आज जगात इतकं दुःख का आहे, हा प्रश्न कदाचित तुम्हाला सतावत असेल. मानवजातीचे दुःख, आजारपण आणि मृत्यू काढून टाकण्यासाठी देव पृथ्वीवर आश्चर्यकारक गोष्टी करणार आहे, अशी शिकवण बायबलमध्ये दिली आहे.
अध्याय १
देवाबद्दलचं सत्य
देवाला खरंच तुमची काळजी आहे का? त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणखी जाणून घ्या आणि त्याचे मित्र कसे बनता येईल ते माहीत करून घ्या.
अध्याय २
बायबल—देवाकडून आलेलं पुस्तक
तुमच्या वैयक्तिक समस्यांवर तुम्हाला बायबलमध्ये तोडगा मिळेल, अशी खातरी तुम्ही का बाळगू शकता? बायबलमधील भविष्यवाण्यांवर तुम्ही भरवसा का ठेवू शकता?
अध्याय ४
येशू ख्रिस्ताबद्दलचं सत्य
येशूच मसीहा आहे हे आपल्याला कशावरून कळतं, पृथ्वीवर येण्याआधी तो कुठं होता आणि त्याला यहोवाचा एकुलता एक पुत्र का म्हटलं आहे, त्याबद्दल आणखी जाणून घ्या.
अध्याय ६
मेल्यावर आपण कुठे जातो?
मेलेले लोक कुठे आहेत आणि आपण का मरतो याविषयी बायबलमध्ये काय सांगितलं आहे ते जाणून घ्या.
अध्याय ७
मृत लोक पुन्हा जिवंत होतील!
तुमच्या कोणा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे का? त्यांना पुन्हा भेटणं शक्य आहे का? मेलेल्या लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल, याविषयी बायबलमध्ये काय सांगितलं आहे ते जाणून घ्या.
अध्याय ८
देवाचं राज्य काय आहे?
पुष्कळ लोकांना ‘प्रभूची प्रार्थना’ तोंडपाठ आहे. मग त्यातल्या, “तुझं राज्य येवो,” या वाक्याचा काय अर्थ होतो?
अध्याय ९
जगाचा अंत जवळ आहे का?
लोकांची मनोवृत्ती पाहून आपली खातरी कशी पटते, की आपण बायबलमध्ये सांगितलेल्या शेवटल्या दिवसांत जगत आहोत, याबद्दल आणखी जाणून घ्या.
अध्याय १०
देवदूत आणि दुरात्मे यांच्याबद्दलचं सत्य
बायबलमध्ये देवदूत आणि दुरात्मे यांच्याबद्दलची खरी माहिती दिली आहे. हे आत्मिक प्राणी खरोखरच अस्तित्वात आहेत का? ते आपल्याला मदत किंवा इजा करू शकतात का?
अध्याय ११
आज इतकं दुःख का आहे?
जगातल्या दुःखासाठी देव जबाबदार आहे, असं अनेक लोकांना वाटतं. तुम्ही काय विचार करता? दुःखाची कोणकोणती कारणं आहेत, याबद्दल देव काय म्हणतो ते पाहा.
अध्याय १२
तुम्ही देवाचे मित्र कसे बनू शकता?
यहोवाला संतुष्ट करणारं जीवन जगणं शक्य आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही त्याचा मित्रदेखील बनू शकता.
अध्याय १३
जीवनाच्या देणगीचा आदर करा
गर्भपाताबद्दल, रक्त संक्रमणाबद्दल, प्राण्यांच्या जीवनाबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे?
अध्याय १४
तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!
येशूच्या प्रेमाच्या उदाहरणाचं पती, पत्नी, पालक आणि मुलं अनुकरण करू शकतात. आपण त्याच्याकडून काय शिकतो?
अध्याय १५
देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग
खऱ्या धर्माचं पालन करणाऱ्यांची ओळख करून देणाऱ्या सहा मुद्द्यांवर विचार करा.
अध्याय १६
देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग निवडा
इतरांना आपल्या धार्मिक विश्वासांबद्दल सांगताना आपल्यासमोर कोणत्या अडचणी येऊ शकतात? त्यांच्या भावना न दुखावता तुम्ही त्यांना तुमच्या विश्वासाबद्दल कसं सांगू शकता?
अध्याय १७
देवाला प्रार्थना करण्याचा बहुमान
देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी तुम्हाला आधी हे माहीत करून घ्यावं लागेल, की बायबलमध्ये प्रार्थनेबद्दल काय सांगितलं आहे.
अध्याय १८
मी माझं जीवन देवाला समर्पित करून बाप्तिस्मा घेतला पाहिजे का?
ख्रिस्ती बाप्तिस्मा घेण्यासाठी कोणकोणती पावलं उचलणं महत्त्वाचं आहे? बाप्तिस्म्यावरून काय दिसून येतं आणि बाप्तिस्मा कसा दिला जातो याबद्दल आणखी जाणून घ्या.
अध्याय १९
यहोवाच्या जवळ राहा
देवाने आपल्यासाठी जे काही केलं आहे त्याबद्दल आपण प्रेम आणि कदर कशी दाखवू शकतो?
अंत्यटिपा
बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पुस्तकात वापरलेल्या शब्दांचे व वाक्यांशांचे अर्थ