सांत्वन
निराशेच्या वेळी सांत्वन देणारी बायबलची वचनं
चिंता
पाहा: “चिंता”
दुःख; राग; चीड
बऱ्याच समस्यांचा आणि अन्यायांचा सामना करावा लागत असल्यामुळे काही जण आपला आनंद गमावून बसतात
हेसुद्धा पाहा: स्तो १४२:४; उप ४:१; ७:७
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
सांत्वन देणारी वचनं:
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
रूथ १:६, ७, १६-१८; २:२, १९, २०; ३:१; ४:१४-१६—देवाच्या लोकांमध्ये परत आल्यावर, मदत मिळाल्यावर आणि इतरांना मदत केल्यावर नामीला आपला गमावलेला आनंद परत मिळाला
-
ईयो ४२:७-१६; याक ५:११—यहोवाला विश्वासू राहून ईयोबने सगळं काही धीराने सहन केलं आणि त्यामुळे यहोवाने त्याला भरभरून आशीर्वाद दिला
-
वाईट वागणूक मिळाल्यामुळे काही जण आपला आनंद गमावून बसतात
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
१शमु १:६, ७, १०, १३-१६—हन्नाला पनिन्नाकडून वाईट वागणूक मिळाल्यामुळे आणि महायाजक एलीला तिच्याबद्दल गैरसमज झाल्यामुळे ती खूप दुःखी झाली
-
ईयो ८:३-६; १६:१-५; १९:२, ३—सांत्वन द्यायला आलेले ईयोबचे तीन मित्र स्वतःलाच खूप नीतिमान समजत होते. त्यांनी ईयोबवर खोटे आरोप लावले आणि यामुळे त्याला खूप दुःख झालं
-
-
सांत्वन देणारी वचनं:
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
१शमु १:९-११, १८—यहोवासमोर आपलं मन मोकळं केल्यावर हन्नाला खूप बरं वाटलं
-
ईयो ४२:७, ८, १०, १७—ईयोबने आपल्या तीन मित्रांना माफ केल्यावर यहोवाने त्याला चांगलं आरोग्य आणि आशीर्वाद दिला
-
दोषीपणाची तीव्र भावना
एज ९:६; स्तो ३८:३, ४, ८; ४०:१२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२रा २२:८-१३; २३:१-३—मोशेचं नियमशास्त्र मोठ्याने वाचून दाखवल्यावर योशीया राजाला आणि त्याच्या प्रजेला जाणवलं की त्यांनी खूप मोठं पाप केलंय
-
एज ९:१०-१५; १०:१-४—काही जणांनी यहोवाची आज्ञा मोडून इतर राष्ट्रांच्या स्त्रियांशी लग्न केल्यामुळे, एज्रा आणि तिथल्या लोकांना खूप वाईट वाटलं
-
लूक २२:५४-६२—प्रेषित पेत्रने येशूला तीन वेळा नाकारल्यामुळे त्याचं मन त्याला खाऊ लागलं आणि त्याला नंतर स्वतःचीच खूप लाज वाटली
-
-
सांत्वन देणारी वचनं:
-
हेसुद्धा पाहा: यश ३८:१७; मीख ७:१८, १९
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
२इत ३३:९-१३, १५, १६—यहूदाच्या राजांपैकी मनश्शे हा सगळ्यात दुष्ट होता, पण त्याने पश्चात्ताप केल्यामुळे यहोवाने त्याच्यावर दया केली
-
लूक १५:११-३२—आपल्या वडिलांना सोडून गेलेल्या मुलाचं उदाहरण देऊन येशूने समजवलं, की यहोवा खूप उदार आहे आणि तो पूर्णपणे क्षमा करायला तयार असतो
-
इतर जण आपल्यासोबत वाईट वागतात, आपल्याला दुखावतात किंवा धोका देतात तेव्हा येणारी निराशा
आपल्या कमतरता आणि पापांमुळे येणारी निराशा
आपली काही किंमत आहे का याबद्दल शंका
पाहा: “कमीपणाची भावना”
मोठ्या आव्हानाचा सामना करायला किंवा एखादी नेमणूक हाताळायला आपल्याला जमणार नाही असं वाटतं तेव्हा
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
निर्ग ३:११; ४:१०—देवाने मोशेला फारोशी जाऊन बोलायला आणि आपल्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणायला सांगितलं, तेव्हा ते आपल्याला जमणार नाही असं मोशे वाटलं
-
यिर्म १:४-६—यहोवाचं न ऐकणाऱ्या लोकांना संदेश सांगण्यासाठी आपल्याकडे काहीच अनुभव नाही आणि आपण खूप लहान आहोत असं यिर्मयाला वाटलं
-
-
सांत्वन देणारी वचनं:
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
निर्ग ३:१२; ४:११, १२—यहोवा मोशेला त्याची नेमणूक पूर्ण करायला मदत करेल याची त्याने त्याला वारंवार खातरी करून दिली
-
यिर्म १:७-१०—यहोवाने यिर्मयाला सांगितलं की घाबरू नकोस, कारण कठीण नेमणुकीत तो त्याला मदत करणार होता
-
ईर्ष्या; हेवा
पाहा: “ईर्ष्या”
आजारपणामुळे किंवा वाढत्या वयामुळे येणाऱ्या मर्यादा
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
२रा २०:१-३—हिज्कीया खूप आजारी पडला आणि मरायला टेकला तेव्हा तो ढसाढसा रडू लागला
-
फिलि २:२५-३०—एपफ्रदीत खूप निराश झाला. कारण त्याच्या आजारपणाबद्दल मंडळीला कळलं होतं. त्यामुळे आपण आपली नेमणूक पूर्ण करण्यात अपयशी ठरलो असं कदाचित मंडळीला वाटेल अशी चिंता त्याला वाटत होती
-
-
सांत्वन देणारी वचनं:
-
सांत्वन देणारे बायबल अहवाल:
-
२शमु १७:२७-२९; १९:३१-३८—दावीद राजाने वयस्कर बर्जिल्ल्यला खूप आदर दाखवला आणि त्याला एक नेमणूक दिली. पण खूप वय झाल्यामुळे आपण ती पूर्ण करू शकत नाही हे मान्य करून त्याने ती नम्रपणे नाकारली
-
स्तो ४१:१-३, १२—दावीद राजा खूप आजारी होता तेव्हा यहोवा आपली काळजी घेईल याची त्याला खातरी होती
-
मार्क १२:४१-४४—गरीब विधवेने दिलेल्या दानासाठी येशूने तिची प्रशंसा केली कारण तिने तिच्याजवळ होतं नव्हतं ते सगळं दिलं होतं
-
इतरांकडून वाईट वागणूक मिळाल्यामुळे होणारा भावनिक त्रास
पाहा: “वाईट वागणूक”
अयोग्य भीती; भय
पाहा: “भीती”
छळ
पाहा: “छळ”