येशू ख्रिस्त
यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यात येशूची कोणती महत्त्वाची भूमिका आहे?
प्रेका ४:१२; १०:४३; २कर १:२०; फिलि २:९, १०
हेसुद्धा पाहा: नीत ८:२२, २३, ३०, ३१; योह १:१०; प्रक ३:१४
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त १६:१३-१७—प्रेषित पेत्रने म्हटलं की येशू हा ख्रिस्त आणि देवाचा मुलगा आहे
-
मत्त १७:१-९—भविष्यात येशूचं वैभव कसं असेल याचा येशूच्या तीन शिष्यांनी दृष्टान्त पाहिला, आणि ‘हा माझा मुलगा आहे’ असं यहोवाने म्हटलेलं त्यांनी ऐकलं
-
येशू इतर माणसांपेक्षा वेगळा कसा होता?
योह ८:५८; १४:९, १०; कल १:१५-१७; १पेत्र २:२२
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त २१:१-९—येशूने जेव्हा यरुशलेममध्ये एका राजाप्रमाणे प्रवेश केला, तेव्हा यहोवाने निवडलेल्या मसीही राजाबद्दलची भविष्यवाणी पूर्ण झाली
-
इब्री ७:२६-२८—प्रेषित पौलने स्पष्ट केलं की महायाजक असलेला येशू हा इतर महायाजकांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे
-
येशूने केलेल्या चमत्कारांवरून आपल्याला येशूबद्दल आणि त्याच्या पित्याबद्दल काय शिकायला मिळतं?
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त ४:२३, २४—येशूने दाखवून दिलं की दुष्ट स्वर्गदूतांपेक्षा तो जास्त शक्तिशाली आहे आणि कोणताही आजार बरा करण्याची त्याच्याकडे ताकद आहे
-
मत्त १४:१५-२१—येशूने पाच भाकरी आणि दोन मासे यांचा वापर करून एक चमत्कार केला आणि हजारो लोकांना जेवू घातलं
-
मत्त १७:२४-२७—पेत्रला मंदिराचा कर भरता यावा आणि कोणालाही अडखळण होऊ नये म्हणून येशूने एक चमत्कार केला
-
मार्क १:४०, ४१—येशूला एका कुष्ठरोग्याचा कळवळा आला आणि त्याने त्याला बरं केलं; यावरून दिसतं की आजारी लोकांना बरं करायची येशूची मनापासून इच्छा आहे
-
मार्क ४:३६-४१—येशूने एका जोरदार वादळाला शांत केलं. यावरून दिसतं की यहोवाने त्याला नैसर्गिक गोष्टींवरसुद्धा अधिकार दिलाय
-
योह ११:११-१५, ३१-४५—आपला मित्र लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशू रडला. मग त्याने लाजरचं पुनरुत्थान करून दाखवून दिलं, की त्याला मृत्यू आणि त्यामुळे होणारं दुःख मुळीच आवडत नाही
-
येशूच्या शिकवणीचा मुख्य विषय काय होता?
पृथ्वीवर असताना येशूने कोणते सुंदर गुण दाखवले? लक्ष द्या, त्याने पुढे दिलेले गुण कसे दाखवले:
मनमिळाऊ—मत्त १३:२; मार्क १०:१३-१६; लूक ७:३६-५०
दयाळूपणा; कनवाळू—मार्क ५:२५-३४; लूक ७:११-१५
धैर्य—मत्त ४:२-११; योह २:१३-१७; १८:१-६
नम्रता—मत्त ११:२९; २०:२८; योह १३:१-५; फिलि २:७, ८
प्रेम—योह १३:१; १४:३१; १५:१३; १यो ३:१६
आज्ञाधारकता—लूक २:४०, ५१, ५२; इब्री ५:८
बुद्धी आणि सुज्ञपणा—मत्त १२:४२; १३:५४; कल २:३
येशूने आपलं जीवन बलिदान का केलं आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?
येशू स्वर्गात राजा म्हणून राज्य करतोय या गोष्टीचा आपल्याला आनंद का आहे?
स्तो ७२:१२-१४; दान २:४४; ७:१३, १४; प्रक १२:९, १०
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
स्तो ४५:२-७, १६, १७—या स्तोत्रातून दिसून येतं, की देवाने निवडलेला राजा त्याच्या शत्रूंवर विजय मिळवेल आणि तो सत्य, नम्रता आणि नीतीने राज्य करेल
-
यश ११:१-१०—येशू जेव्हा पृथ्वीवर राज्य करेल तेव्हा संपूर्ण पृथ्वी सुंदर नंदनवन होईल आणि लोक शांतीने राहतील
-
लवकरच येशू काय करणार आहे?