प्रेम
यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हे कसं दिसून येतं?
यिर्म ३१:३; योह ३:१६; रोम ५:८; १यो ४:८, १९
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
उत्प १:१, २६-३१; २:८, ९, १५, १६—यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला बनवण्याआधी पृथ्वी तयार केली, आणि प्रेमाने एदेन बागेत त्यांच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी बनवल्या
-
स्तो १०४:२७-३०—यहोवा सगळ्या सजीव सृष्टीची किती प्रेमाने काळजी घेतो याबद्दल स्तोत्रकर्त्याने त्याची स्तुती केली
-
आपण प्रेम कसं दाखवू शकतो?
योह १३:३४, ३५; १५:१२, १३; १पेत्र ४:८; १यो ४:१०, ११; ५:३
-
उपयोगी बायबल अहवाल:
-
मत्त २२:३६-३९—येशूने म्हटलं की देवावर आणि इतरांवर प्रेम करणं या दोन सगळ्यात महत्त्वाच्या आज्ञा आहेत
-
१कर १३:१-८—प्रेषित पौलने समजावून सांगितलं, की प्रेम खूप महत्त्वाचंय; आणि आपण प्रेम कसं दाखवू शकतो हेही त्याने सांगितलं
-