व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आई

आई

आईकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्‍या असतात?

नीत ३१:१७, २१, २६, २७; तीत २:४

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प २१:८-१२—साराने जेव्हा पाहिले, की इश्‍माएल तिच्या लहान मुलाला, इसहाकला छळतोय तेव्हा त्याचं संरक्षण करण्यासाठी तिने अब्राहामला विनंती केली

    • १रा १:११-२१—बथशेबाला जेव्हा कळलं की आपल्या मुलाचं, शलमोनचं राज्यपद आणि जीव धोक्यात आहे, तेव्हा तिने दावीद राजाला हस्तक्षेप करायची विनंती केली

आपण आपल्या आईचं का ऐकलं पाहिजे आणि तिला आदर का दिला पाहिजे?

निर्ग २०:१२; अनु ५:१६; २७:१६; नीत १:८; ६:२०-२२; २३:२२

हेसुद्धा पाहा: १ती ५:९, १०

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • १पेत्र ३:५, ६—प्रेषित पौलने म्हटलं, की आपल्या मजबूत विश्‍वासामुळे सारा अनेक बहिणींसाठी आईसारखी बनली

    • नीत ३१:१, १५, २१, २८—लमुएल राजाच्या आईने त्याला लग्नाबद्दल, तसंच एका पत्नीच्या आणि आईच्या भूमिकेबद्दल चांगला सल्ला दिला

    • २ती १:५; ३:१५—प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने तिमथ्यच्या आईची, युनीकेची प्रशंसा केली. कारण तिचा पती सत्यात नसतानाही तिने आपल्या मुलाला बालपणापासून शास्त्रवचनांबदद्‌ल शिकवलं होतं