अध्याय ३
टिकाऊ विवाहाकरता दोन गुरुकिल्ल्या
१, २. (अ) विवाहाची रचना किती काळ टिकण्यासाठी केली होती? (ब) ते कसे शक्य आहे?
देवाने पहिल्या पुरुष आणि स्रीला विवाहात बांधले तेव्हा, हे बंधन तात्पुरतेच असेल असे सुचवणारे कोणतेही चिन्ह नव्हते. आदाम आणि हव्वा जीवनभर एकत्र राहणार होते. (उत्पत्ति २:२४) एक पुरुष व एक स्री यांना एकत्र आणणे हा आदरणीय विवाहाकरता देवाचा दर्जा आहे. एका किंवा दोन्ही सोबत्यांनी केलेली घोर अनैतिकताच घटस्फोट घेण्यास शास्रवचनीय आधार पुरवते मग त्यानंतर पुनर्विवाह करण्याची शक्यता असते.—मत्तय ५:३२.
२ दोन व्यक्तींनी अनिश्चित अशा दीर्घ काळापर्यंत आनंदाने एकत्र राहणे शक्य आहे का? होय, हे शक्य करण्यासाठी बायबल दोन आवश्यक घटकांची अथवा गुरुकिल्ल्यांची ओळख देते. पती-पत्नीने यांचा वापर केल्यास ते सौख्यानंद आणि अनेक आशीर्वादांचा दरवाजा उघडतील. त्या गुरुकिल्ल्या कोणत्या आहेत?
पहिली गुरुकिल्ली
३. वैवाहिक सोबत्यांनी कोणत्या तीन प्रकारचे प्रेम विकसित केले पाहिजे?
३ पहिली गुरुकिल्ली प्रेम आहे. बायबलमध्ये विविध प्रकारच्या प्रेमाची ओळख देण्यात आली आहे, हे मनोरंजक आहे. एक प्रकार म्हणजे, एखाद्याबद्दल हार्दिक, वैयक्तिक आपुलकी असणे, हा जवळच्या मित्रांमध्ये असलेल्या प्रेमाचा प्रकार होय. (योहान ११:३) दुसरे, कौटुंबिक सदस्यांमध्ये असलेले प्रेम आहे. (रोमकर १२:१०) तिसरे, विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल एखाद्याला असणारे रोमँटिक प्रेम आहे. (नीतिसूत्रे ५:१५-२०) अर्थातच, या सर्व प्रकारच्या प्रेमास पती-पत्नीने विकसित केले पाहिजे. पण चवथ्या प्रकारचे देखील प्रेम आहे, ते इतर प्रेमापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे.
४. चवथ्या प्रकारचे प्रेम कोणते आहे?
४ ख्रिस्ती ग्रीक शास्रवचनांच्या मूळ भाषेत या चवथ्या प्रकारच्या प्रेमाकरता अगापे असा शब्द आहे. हा शब्द १ योहान ४:८, मध्ये वापरला आहे, जेथे “देव प्रीति आहे,” असे आपल्याला सांगण्यात आले आहे. खरोखर, “पहिल्याने [देवाने] आपणांवर प्रीति केली म्हणून आपण प्रीति करितो.” (१ योहान ४:१९) एखादा ख्रिस्ती अशाप्रकारचे प्रेम, प्रथम यहोवा देवाबद्दल आणि नंतर सहमानवांबद्दल विकसित करतो. (मार्क १२:२९-३१) अगापे हा शब्द इफिसकर ५:२ मध्ये देखील वापरला आहे ते म्हणते: ‘जशी ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि स्वतःला आपल्याकरता दिले त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चालत राहा.’ अशाप्रकारचे प्रेम येशूच्या खऱ्या अनुयायांची ओळख करून देईल असे त्याने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति [अगापे] असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) तसेच १ करिंथकर १३:१३ मध्ये वापरण्यात आलेल्या अगापे शब्दाकडे देखील लक्ष द्या: “विश्वास, आशा, प्रीति ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यात प्रीति [अगापे] श्रेष्ठ आहे.”
५, ६. (अ) विश्वास आणि आशा यापेक्षा प्रेम श्रेष्ठ का आहे? (ब) प्रेम, विवाहाला टिकाऊ बनवील याकरता कोणती काही कारणे आहेत?
५ कोणती गोष्ट या अगापे प्रेमाला विश्वास आणि आशा यापेक्षा श्रेष्ठ बनवते? ते देवाच्या वचनातील तत्त्वांद्वारे—योग्य तत्त्वांनी नियंत्रित केले जाते. (स्तोत्र ११९:१०५) देवाच्या दृष्टिकोनातून इतरांकरता योग्य आणि चांगले करणे म्हणजे ती निःस्वार्थ काळजी होय, मग ती ज्यांच्याविषयी केली जाते ते त्यास पात्र असोत अगर नसोत. अशा प्रकारचे प्रेम वैवाहिक सोबत्यांना बायबलचा सल्ला अनुकरण करण्यास मदत करते: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३) प्रेमळ वैवाहिक जोडप्यांची ‘एकमेकांवर एकनिष्ठ प्रीती [अगापे] असते’ आणि ते ती विकसित करतात कारण “प्रीति पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) याकडे लक्ष द्या की प्रीती चुकांना झाकून टाकते. ती चुकांना काढून टाकत नाही कारण कोणीही अपरिपूर्ण मानव चुकांपासून मुक्त नाही.—स्तोत्र १३०:३, ४; याकोब ३:२.
६ वैवाहिक जोडप्याने देवाबद्दल आणि एकमेकांबद्दल अशा प्रकारचे प्रेम विकसित केल्यास विवाह टिकेल आणि आनंदी होईल कारण “प्रीति कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:८) प्रेम “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सैकर ३:१४) तुम्ही विवाहित असल्यास, तुम्ही व तुमचा सोबती अशा प्रकारचे प्रेम कसे विकसित करू शकता? दोघे मिळून देवाचे वचन वाचा आणि त्याबद्दल बोला. प्रेमाबद्दल येशूच्या उदाहरणाचा अभ्यास करा आणि त्याचे अनुकरण करण्याचा त्याच्याप्रमाणे विचार करण्याचा व कार्य करण्याचा प्रयत्न करा. त्या व्यतिरिक्त, देवाचे वचन शिकवले जाते अशा ख्रिस्ती सभांना उपस्थित राहा. देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ असलेले अशा प्रकारचे उदात्त प्रेम विकसित करण्यासाठी देवाच्या मदतीकरता प्रार्थना करा.—नीतिसूत्रे ३:५, ६; योहान १७:३; गलतीकर ५:२२; इब्री लोकांस १०:२४, २५.
दुसरी गुरुकिल्ली
७. आदर काय आहे आणि विवाहात आदर कोणी दाखवला पाहिजे?
७ विवाहित जोडप्याचे एकमेकांवर खरोखर प्रेम असल्यास, ते एकमेकांना आदर देखील देतील आणि आदर ही आनंदी विवाहाची दुसरी गुरुकिल्ली आहे. आदर याची परिभाषा, “इतरांची कदर करणे, त्यांचा सन्मान करणे” अशी केली आहे. देवाचे वचन पती-पत्नींसहित सर्वांना सल्ला देते: ‘एकमेकांना आदर दाखवण्यात पुढाकार घ्या.’ (रोमकर १२:१०) प्रेषित पेत्राने लिहिले: “पतींनो, तसेच तुम्हीहि आपल्या स्त्रियांबरोबर, त्या अधिक नाजूक व्यक्ति आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा.” (१ पेत्र ३:७) पत्नीला “आपल्या पतीबद्दल गाढ आदर असला पाहिजे,” असा सल्ला देण्यात आला आहे. (इफिसकर ५:३३, NW) कोणाचा सन्मान करण्याची तुमची इच्छा असल्यास, त्या व्यक्तीसोबत तुम्ही दयाळू असता, त्याच्या माननीयतेचा आणि व्यक्त केलेल्या मतांचा आदर करता व तुमच्याबद्दल केलेल्या कोणत्याही वाजवी विनंत्या पूर्ण करण्यास तयार असता.
८-१०. विवाहातील ऐक्याला स्थिर आणि आनंदी बनविण्यास आदर मदत करील असे काही मार्ग कोणते आहेत?
८ सुखी विवाहाचा आनंद घेण्याची इच्छा बाळगणारे ‘आपलेच हित न पाहता [आपल्या सोबत्याचे] हित पाहून,’ त्याचा आदर करतात. (फिलिप्पैकर २:४) केवळ स्वतःसाठी काय चांगले आहे याचाच विचार ते करत नाहीत कारण असे करणे स्वार्थीपणाचे असेल. उलटपक्षी, त्यांच्या सोबत्यांसाठी देखील काय उत्तम आहे याचा विचार ते करतात. खरोखर, ते त्यांच्या सोबत्याच्या हिताला प्राधान्य देतात.
९ आदर, वैवाहिक जोडीदारांना दृष्टिकोनातील फरकांना कबूल करण्यासाठी मदत करील. प्रत्येक गोष्टीत दोन व्यक्तींचे एकसारखे दृष्टिकोन असण्याची अपेक्षा करणे वाजवीपणाचे नाही. पतीला जी गोष्ट महत्त्वाची वाटते ती कदाचित पत्नीला वाटत नसेल आणि जे पत्नीला आवडत असते ते पतीला कदाचित आवडणार नाही. परंतु, एकमेकांचे दृष्टिकोन आणि निवड जोवर यहोवाच्या नियम आणि तत्त्वांच्या सीमांमध्ये आहेत तोवर प्रत्येकाने या गोष्टींचा आदर केला पाहिजे. (१ पेत्र २:१६; पडताळा फिलेमोन १४.) त्या व्यतिरिक्त, सार्वजनिकरित्या अथवा खाजगीरित्या दुसऱ्याची मानहानी करणाऱ्या टीका करण्याचा किंवा एखाद्याला थट्टा करण्याचा विषय न बनवता प्रत्येकाने एकदुसऱ्याच्या मोठेपणाचा आदर केला पाहिजे.
१० होय, यशस्वी विवाहासाठी देवावरील व एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर या दोन महत्त्वपूर्ण गुरुकिल्ल्या आहेत. त्यांचा अवलंब वैवाहिक जीवनातील अधिक महत्त्वपूर्ण असलेल्या काही क्षेत्रांत कसा केला जाऊ शकतो?
ख्रिस्तासारखे मस्तकपद
११. शास्रवचनानुसार, विवाहात मस्तक कोण असतो?
११ बायबल आपल्याला सांगते की, पुरुषाची निर्मिती त्याला कुटुंबाचा यशस्वी मस्तक बनवील अशा गुणांसह केली होती. पुरुष हा त्याची पत्नी आणि मुलांच्या आध्यात्मिक आणि शारीरिक कल्याणाकरता यहोवासमोर जबाबदार असणार होता. यहोवाची इच्छा प्रदर्शित होईल असे संतुलित निर्णय त्याला घ्यावे लागणार होते आणि ईश्वरी वर्तनामध्ये चांगले उदाहरण मांडावयाचे होते. “स्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपआपल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पति पत्नीचे मस्तक आहे.” (इफिसकर ५:२२, २३) तथापि, बायबल सांगते की पतीला देखील एक मस्तक आहे ज्याचा त्याच्यावर अधिकार आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ११:३) सुज्ञ पती, त्याचा मस्तक, ख्रिस्त येशू याचे अनुकरण करून मस्तकपद कसे चालवावे हे शिकतो.
१२. अधीनता दाखवणे आणि मस्तकपद चालवणे या दोहोंबद्दल येशूने कोणते उत्तम उदाहरण मांडले?
१२ येशूचे देखील एक मस्तक म्हणजे यहोवा आहे आणि येशू उचितपणे त्याच्या अधीन आहे. येशूने म्हटले: “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो.” (योहान ५:३०) किती उत्तम उदाहरण! येशू “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे.” (कलस्सैकर १:१५) तो मशीहा बनला. तो सर्व देवदूतांपेक्षा श्रेष्ठ असून अभिषिक्त ख्रिश्चनांच्या मंडळीचे मस्तक आणि देवाच्या राज्याचा निवडलेला राजा असणार होता. (फिलिप्पैकर २:९-११; इब्री लोकांस १:४) असे उच्च स्थान आणि उदात्त भवितव्य असताना देखील, येशू हा पुरुष कठोर, निग्रही किंवा अवाजवीपणे मागणी करणारा नव्हता. तो त्याच्या शिष्यांना त्याचे आज्ञापालन केले पाहिजे याची सतत आठवण करून देणारा, असा जुलमी नव्हता. येशू विशेषपणे अपमानित जनांसाठी प्रेमाळू आणि दयाळू होता. त्याने म्हटले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवास विसावा मिळेल;’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.” (मत्तय ११:२८-३०) त्याच्या संगतीत असणे आनंदाचे होते.
१३, १४. येशूचे अनुसरण करून एक प्रेमळ पती आपले मस्तकपद कसे चालवील?
१३ आनंदी कौटुंबिक जीवनाची इच्छा बाळगणारा पती येशूच्या उत्तम गुणांचा विचार करतो तेव्हा तो बरे करतो. चांगला पती त्याच्या पत्नीला धाक दाखवून त्याच्या मस्तकपदाचा सोट्याप्रमाणे चुकीने वापर करून कठोर आणि हुकूमशहा होत नसतो. उलटपक्षी, तो तिच्यावर प्रेम करतो आणि तिचा सन्मान करतो. जर येशू ‘मनाचा लीन’ होता, मग पतीने लीन होणे अधिक रास्त आहे, कारण तो येशूसारखा नसल्यामुळे त्याच्या हातूनही चुका होतात. तो जेव्हा असे करतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीच्या समजबुद्धीची गरज असते. या कारणास्तव, “मला क्षमा कर; तुझे बरोबर होते,” हे बोलण्यास जड जात असले तरी नम्र पती त्याच्या चुका कबूल करतो. गर्विष्ठ आणि हट्टी पतीपेक्षा नम्र आणि लीन पतीच्या मस्तकपदास आदर देणे पत्नीला अधिक सोपे वाटेल. दुसऱ्या बाजूला पाहता, आदरणीय पत्नी चुकते तेव्हा ती देखील क्षमा मागते.
१४ देवाने स्रीची निर्मिती उत्तम गुणांसह केलेली असल्यामुळे आनंदी विवाहाला हातभार लावण्यासाठी ती यांचा वापर करू शकते. सुज्ञ पती हे ओळखून तिचा कोंडमारा करणार नाही. अनेक स्त्रियांना अधिक दया आणि संवेदनक्षमता असते, हे गुण कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि मानवी नातेसंबंधाचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असतात. सामान्यपणे घर राहण्याजोगे सुखदायक ठिकाण बनविण्यामध्ये स्री बरीच प्रवीण असते. नीतिसूत्राच्या ३१ व्या अध्यायात वर्णन केलेल्या ‘सद्गुणी स्रीकडे’ अनेक कौतुकास्पद गुण आणि उत्तम कौशल्य होते व याचा तिच्या कुटुंबाला पूर्णपणे लाभ झाला. का बरे? कारण तिच्या पतीचे मन ‘तिजवर भरवसा ठेवत होते.’—नीतिसूत्रे ३१:१०, ११.
१५. पती आपल्या पत्नीला ख्रिस्तासारखे प्रेम आणि आदर कसा दाखवू शकतो?
१५ काही संस्कृतीत पतीच्या अधिकारावर अधिक जोर दिला जात असल्यामुळे त्याला केवळ प्रश्न विचारणे देखील अनादराचे समजले जाते. तो त्याच्या पत्नीला जवळजवळ एखाद्या गुलामाप्रमाणेच वागवील. मस्तकपद असे चुकीने चालवल्यामुळे केवळ पत्नीसोबतच नव्हे तर देवाबरोबरील नातेसंबंध देखील कमकुवत बनतो. (पडताळा १ योहान ४:२०, २१.) दुसऱ्या बाजूला पाहता, काही पती पुढाकार घेण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या पत्नीला घरावर स्वामित्व गाजवू देतात. उचितपणे ख्रिस्ताच्या अधीन असणारा पती त्याच्या पत्नीची पिळवणूक करीत नाही किंवा तिची प्रतिष्ठा हिरावून घेत नाही. उलटपक्षी, तो ख्रिस्ताच्या आत्मत्यागी प्रेमाचे अनुकरण करतो आणि पौलाने सल्ला दिल्याप्रमाणे करतो: “पतीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली तशी तुम्हीहि आपआपल्या पत्नीवर प्रीति करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.” (इफिसकर ५:२५) ख्रिस्त येशूने आपल्या अनुयायांवर इतके प्रेम केले की तो त्यांच्यासाठी मरण पावला. चांगला पती अशा निःस्वार्थी मनोवृत्तीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करील, तो त्याच्या पत्नीकडून अवास्तव अपेक्षा करण्याऐवजी तिच्यात चांगले ते शोधत राहील. एखादा पती, ख्रिस्ताच्या अधीन असतो व ख्रिस्तासारखे प्रेम आणि आदर प्रदर्शित करतो तेव्हा पत्नी त्याच्या अधीन राहण्यास प्रवृत्त होईल.—इफिसकर ५:२८, २९, ३३.
पत्नीला साजेशी अधीनता
१६. पत्नीने आपल्या पतीसोबतच्या नातेसंबंधात कोणते गुण दाखवले पाहिजेत?
१६ आदामाची निर्मिती केल्याच्या काही काळानंतर, “परमेश्वर देव बोलला: ‘मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.’” (उत्पत्ति २:१८) देवाने हव्वेची निर्मिती एक प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे तर ‘अनुरूप व्यक्ती’ अशी केली. विवाह, दोन प्रतिस्पर्धी कप्तान असलेल्या जहाजाप्रमाणे असणार नव्हता. पतीने प्रेमळ मस्तकपदाचा वापर करावयाचा होता आणि पत्नीने प्रेम, आदर आणि स्वेच्छेने अधीनता दाखवावयाची होती.
१७, १८. पत्नी तिच्या पतीची खरी सहायक असू शकते याचे काही मार्ग कोणते आहेत?
१७ तथापि, गुणी पत्नी केवळ अधीन असण्यापेक्षाही अधिक आहे. ती खरी सहायक असण्याचा प्रयत्न करते, पती निर्णय घेतो तेव्हा त्याला आधार देते. अर्थातच, ती त्याच्या निर्णयांना सहमती दर्शवते तेव्हा ते तिच्यासाठी सोपे असते. पण ती असे करीत नसली, तरी त्याच्या निर्णयाला अधिक यशस्वी परिणाम घडवून आणण्यास तिचा सहयोगी पाठिंबा मदत करू शकतो.
१८ एक पत्नी तिच्या पतीला चांगला मस्तक असण्याकरता इतर मार्गांनी मदत करू शकते. त्याची टीका करण्याऐवजी किंवा तो तिला कधीही संतुष्ट करू शकत नाही असे त्याला वाटू देण्याऐवजी, पुढाकार घेत असलेल्या त्याच्या प्रयत्नांबद्दल ती गुणग्राहकता व्यक्त करू शकते. पतीसोबत सकारात्मक रीतीने व्यवहार करताना, केवळ पतीच्या नजरेत नव्हे तर “सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे,” त्याची आठवण तिने ठेवली पाहिजे. (१ पेत्र ३:३, ४; कलस्सैकर ३:१२) पती सत्य मानत नसला तर काय? तो मानत असला किंवा नसला, तरी शास्रवचने पत्नींना उत्तेजन देतात की, “त्यांनी आपल्या नवऱ्यांवर व मुलाबाळांवर प्रेम करावे; त्यांनी मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहणाऱ्या, मायाळू, आपआपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या, असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.” (तीत २:४, ५) विवेकाच्या काही बाबींना तोंड द्यावे लागते तेव्हा त्या “सौम्यतेने व भीडस्तपणाने” सादर केल्यास, सत्य न मानणारा पती त्याच्या पत्नीच्या भूमिकेचा आदर करण्याची अधिक शक्यता असते. सत्य न मानणाऱ्या काही पतींना “[त्यांच्या] भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले” आहेत.—१ पेत्र ३:१, २, १५; १ करिंथकर ७:१३-१६.
१९. एखादा पती त्याच्या पत्नीला देवाचा नियम तोडावयास सांगत असल्यास काय?
१९ एखादा पती देवाने मना केलेली एखादी गोष्ट करावयास त्याच्या पत्नीला सांगत असल्यास काय? असे घडते तेव्हा, देव सर्वोच्च शासक असल्याचे तिने लक्षात ठेवले पाहिजे. प्रेषितांना देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले तेव्हा त्यांनी जे केले त्यास तिने एक उदाहरण समजले पाहिजे. प्रेषितांची कृत्ये ५:२९ सांगते: “पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”
चांगले दळणवळण
२०. प्रेम आणि आदर आवश्यक असणारे महत्त्वपूर्ण क्षेत्र कोणते आहे?
२० प्रेम आणि आदर विवाहाच्या इतर क्षेत्रात—दळणवळणात आवश्यक आहे. प्रेमळ पती त्याच्या पत्नीच्या कार्यहालचाली, समस्या, विविध बाबतीत तिचे दृष्टिकोन यांविषयी चर्चा करील. तिला याची गरज असते. जो पती त्याच्या पत्नीसोबत बोलण्यासाठी वेळ काढतो आणि ती सांगत असलेले लक्षपूर्वक ऐकतो तेव्हा तो तिच्याबद्दल प्रेम आणि आदर प्रदर्शित करत असतो. (याकोब १:१९) पती, पत्नींसोबत फारच कमी बोलत असल्याचे गाऱ्हाणे काही पत्नीं करतात. ते दुःखप्रद आहे. हे खरे आहे की, अशा या व्यग्र काळात, पतीला बाहेर जादा वेळ काम करावे लागत असेल आणि आर्थिक परिस्थितींमुळे कदाचित काही पत्नींना देखील प्रापंचिक नोकरी करावी लागत असेल. परंतु वैवाहिक जोडप्याने एकमेकांसाठी वेळ राखून ठेवण्याची गरज आहे. नाहीतर, ते एकमेकांपासून स्वतंत्र होतील. विवाह व्यवस्थेबाहेर सहानुभूती दाखवणारे साहचर्य शोधण्यास त्यांना भाग पडल्याचे वाटल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.
२१. विवाह आनंदी ठेवण्यासाठी योग्य शब्द कशी मदत करतील?
२१ पती-पत्नी ज्यारीतीने दळणवळण राखतात ते महत्त्वपूर्ण आहे. “ममतेची वचने . . . मनाला गोड व हाडांस आरोग्य देणारी आहेत.” (नीतिसूत्रे १६:२४) सोबती, सत्य मानत असो अगर नसो बायबलचा सल्ला येथे लागू होतो: “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे,” म्हणजे चवदार असावे. (कलस्सैकर ४:६) एखाद्याचा दिवस चांगला गेला नसल्यास, त्याच्या सोबत्याकडील दयाळू, सहानुभूतीपूर्वक शब्दांमुळे बरेच काही चांगले साध्य होऊ शकते. “रुपेरी करंड्यांत सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय.” (नीतिसूत्रे २५:११) आवाजाचा सूर आणि शब्दांची निवड अतिशय महत्त्वपूर्ण आहे. उदाहरणार्थ, चिडून, अधिकारवाणीने एक जण दुसऱ्याला “दार बंद कर ते,” असे म्हणू शकेल. परंतु शांतचित्ताने, समजदारीच्या आवाजात “ते दार बंद करतेस का?” असे शब्द, ‘मिठाने किती रुचकर केलेले’ असतील.
२२. जोडप्यांना चांगले दळणवळण राखण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते?
२२ जेव्हा सौम्यपणाचे बोल, दयाळू नजर आणि हावभाव, चांगुलपणा, समजूतदारपणा आणि कोमलता असते तेव्हा चांगल्या दळणवळणाची वृद्धी होते. पती-पत्नीनी, चांगले दळणवळण राखण्यासाठी परिश्रमाने कार्य केल्याने, एकमेकांच्या गरजांची जाणीव करून देण्यात त्यांना मोकळे वाटेल आणि नैराश्येच्या किंवा तणावाच्या समयी ते एकमेकांस सांत्वनाचा आणि मदतीचा स्रोत असू शकतात. देवाचे वचन आर्जवते की, “खिन्न जिवांचे सांत्वन करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१४, NW) कधी पती तर काही वेळा पत्नी दुःखी असेल, असे काही प्रसंग असतील. ते “सांत्वन करून” एकमेकांची उभारणी करू शकतात.—रोमकर १५:२.
२३, २४. मतभेद होतात तेव्हा प्रेम आणि आदर कशी मदत करील? उदाहरण द्या.
२३ प्रेम आणि आदर दाखवत असणारे वैवाहिक सोबती प्रत्येक मतभेदाकडे एक आव्हान या दृष्टीने पाहणार नाहीत. ते एकमेकांसोबत “निष्ठुरतेने” न वागण्याचा अधिक प्रयत्न करतील. (कलस्सैकर ३:१९) “मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते,” हे दोघांनीही लक्षात ठेवले पाहिजे. (नीतिसूत्रे १५:१) एखादा सोबती त्याच्या मनातील भावना, बोलून दाखवत असल्यास त्याला कमी न लेखण्याची अगर नापसंती न दाखवण्याची खबरदारी घ्या. उलटपक्षी अशा वक्तव्यांकडे, इतरांच्या दृष्टिकोनावर सूक्ष्मदृष्टी मिळण्यासाठी ती एक संधी आहे असे पाहा. एकत्र मिळून मतभेदांवर कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि एकवाक्यतेतील समारोपाला या.
२४ साराने तिचा पती, आब्राहाम याला एका विशिष्ट समस्येवर तोडगा सांगितला तेव्हा तो तोडगा त्याच्या भावनांप्रमाणे नव्हता, त्या प्रसंगाची आठवण करा. तरीसुद्धा, देवाने आब्राहामला सांगितले: ‘तिचे ऐक.’ (उत्पत्ति २१:९-१२) आब्राहामने ऐकले आणि तो आशीर्वादित झाला. अशा रीतीने, पतीच्या मनात जे आहे त्यापेक्षा वेगळे काही पत्नी सुचवत असल्यास, त्याने निदान ऐकण्यास हवे. त्याचवेळी, पत्नीने संभाषणावर मक्ता मिळवू नये तर पतीला काय सांगावयाचे आहे ते लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. (नीतिसूत्रे २५:२४) पती किंवा पत्नी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मार्गाने करण्याचा आग्रह धरतात तेव्हा ही गोष्ट प्रेमरहित आणि अनादर करणारी असते.
२५. चांगले दळणवळण वैवाहिक जीवनातील अंतर्गत पैलूंमध्ये सौख्यानंदास कसा हातभार लावील?
२५ जोडप्याच्या लैंगिक संबंधात चांगले दळणवळण देखील असणे महत्त्वपूर्ण आहे. स्वार्थीपणा आणि आत्मसंयमाच्या उणिवेमुळे विवाहातील या घनिष्ट नातेसंबंधाचे गंभीररित्या नुकसान होऊ शकते. सहनशीलतेसह मनमोकळे दळणवळण आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येकजण निःस्वार्थीपणे दुसऱ्याचे हित पाहतो तेव्हा लैंगिक संबंध क्वचितच गंभीर समस्येचा बनतो. या आणि इतर बाबतीत, “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे.”—१ करिंथकर ७:३-५; १०:२४.
२६. प्रत्येक विवाहात चढउतार असले तरी देवाचे वचन ऐकत राहिल्याने वैवाहिक जोडप्यांना सौख्यानंद मिळवण्यास कशी मदत होईल?
२६ देवाचे वचन किती उत्तम सल्ला सादर करते! प्रत्येक विवाहात चढउतार असतील हे खरे आहे. पण पती-पत्नी बायबलमध्ये दिलेल्या यहोवाच्या विचारसरणीचा स्वीकार करतात आणि त्यांचा नातेसंबंध तत्त्वबद्ध प्रेम आणि आदर यावर आधारित राखतात तेव्हा त्यांचा विवाह टिकाऊ आणि आनंदी असण्याची खात्री त्यांना असू शकते. अशाप्रकारे ते केवळ एकमेकांचाच नव्हे तर विवाहाचा मूळ निर्माता, यहोवा देव याचा देखील सन्मान करतील.