अध्याय १४
उतारवयात जोडीने प्रवेश करणे
१, २. (अ) वृद्धापकाळ जवळ येतो तसे कोणते बदल घडतात? (ब) बायबल काळातील ईश्वरी पुरुषांना वृद्धापकाळात कसे समाधान मिळाले?
आपण वृद्ध होतो तसे अनेक बदल घडून येतात. शारीरिक कमतरता आपला जोम कमी करतात. आरशात पाहिल्यावर, नवीन सुरकुत्या पडलेल्या आणि हळूवारपणे केस पांढरे झालेले इतकेच नव्हे तर टक्कल पडत असलेले दिसते. कदाचित आपली स्मरणशक्तीही कमी झाली असेल. मुलांचे विवाह झाल्यावर तसेच नातवंडांचा जन्म झाल्यावरही नवीन नातेसंबंध विकसित होतात. प्रापंचिक कार्यातून निवृत्त झाल्यामुळे काहींकरता जीवनाचा एक वेगळा नित्यक्रम सुरू होतो.
२ वास्तविक पाहता, उतारवय त्रासदायक असू शकते. (उपदेशक १२:१-८) तसे असले तरीही, बायबल समयातील देवाच्या सेवकांचा जरा विचार करा. त्यांना शेवटी मृत्यूला वश व्हावे लागले, तरी बुद्धी आणि समज प्राप्त केल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना मोठी संतुष्टी मिळाली. (उत्पत्ति २५:८; ३५:२९; ईयोब १२:१२; ४२:१७) त्यांनी आनंदाने उतारवयावर कसे यश मिळवले? नक्कीच, आज आपल्याला बायबलमध्ये नमूद केलेली जी तत्त्वे सापडतात त्यांच्या एकवाक्यतेत राहण्याद्वारे त्यांनी हे यश मिळवले.—स्तोत्र ११९:१०५; २ तीमथ्य ३:१६, १७.
३. पौलाने वृद्ध पुरुष आणि स्त्रियांना कोणता सल्ला दिला?
३ प्रेषित पौलाने तीताला लिहिलेल्या पत्रात, उतारवयात पदार्पण करणाऱ्यांना उत्तम मार्गदर्शन दिले. त्याने लिहिले: “वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीति व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे; त्या चहाडखोर मद्यपानासक्त नसाव्या; सुशिक्षण देणाऱ्या असाव्या.” (तीत २:) हे शब्द ऐकल्याने उतारवयातील आव्हानांना तोंड देण्याची मदत तुम्हाला मिळू शकते. २, ३
तुमच्या मुलांच्या स्वावलंबनाशी जुळवून घ्या
४, ५. अनेक पालक, त्यांची मुले घर सोडून जातात तेव्हा कशी प्रतिक्रिया दाखवतात आणि काही जण या नवीन परिस्थितीबरोबर कसे जुळवून घेतात?
४ बदलणाऱ्या भूमिका जुळवून घेण्याची मागणी करतात. ही गोष्ट, प्रौढ मुलांचे विवाह होऊन ते घराबाहेर पडतात तेव्हा किती खरी ठरते! अनेक पालकांना, ते वृद्ध होत असल्याची ही पहिली स्मरणिका असते. त्यांचे अपत्य प्रौढ झाल्याचा आनंद वाटत असला, तरी त्यांनी स्वावलंबनासाठी शक्य असलेले सर्व काही केले का याबद्दलची काळजी त्यांना अनेकदा लागते. मुले घरात नसल्यामुळे त्यांना कदाचित त्यांची आठवण येईल.
५ मुलांनी घर सोडल्यावर देखील, पालक मुलांच्या हिताबद्दल काळजी करण्याचे चालूच ठेवतात, हे समजण्याजोगे आहे. एका मातेने म्हटले, “ते मजेत असल्याची स्वतःला खातरी पटवण्याकरता मला त्यांच्याकडून केवळ ऐकावयास मिळू शकले, तरी त्याचा आनंद मला वाटेल.” एक पिता सांगतो: “आमच्या मुलीने घर सोडले तेव्हा तो आमच्यासाठी फार कठीण समय होता. आम्ही प्रत्येक गोष्ट नेहमीच एकत्र मिळून केलेली असल्यामुळे, ती गेल्यामुळे आमच्या कुटुंबात एक मोठी दरी निर्माण झाली.” या पालकांनी मुलांच्या गैरहजेरीला कसे तोंड दिले? अनेक बाबतीत, इतर लोकांप्रत पोहंचण्याद्वारे आणि त्यांना मदत करण्याद्वारे.
६. कौटुंबिक नातेसंबंधांना उचित दृष्टिकोनातून पाहण्यासाठी काय मदत करते?
६ मुले विवाहित होतात तेव्हा पालकांची भूमिका बदलते. उत्पत्ति २:२४ म्हणते: “पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” मस्तकपदाची ईश्वरी तत्त्वे ओळखल्याने आणि सुव्यवस्था ओळखल्याने सर्व गोष्टींचा उचित दृष्टिकोन बाळगण्यास पालकांना मदत मिळेल. (तिरपे वळण आमचे.)—१ करिंथकर ११:३; १४:३३, ४०.
७. मुलींचे विवाह झाल्यावर त्यांनी घर सोडले तेव्हा एका पित्याने कोणती उत्तम मनोवृत्ती विकसित केली?
७ एका जोडप्याच्या दोन्ही मुलींचे विवाह होऊन त्या दुसरीकडे गेल्यावर या जोडप्याला आपल्या जीवनांत उणीव भासू लागली. प्रथमतः, पती त्याच्या जावयांवर संतापला. परंतु, त्याने मस्तकपदाच्या तत्त्वावर विचार केल्यावर आपल्या मुलींचे पती त्यांच्या स्वतःच्या घरासाठी जबाबदार असल्याची जाणीव त्याला झाली. या कारणास्तव, मुलींनी आपल्या वडिलांचा सल्ला मागितला तेव्हा त्यांचे पती काय विचार करतात असे त्यांनी विचारले आणि शक्यतो त्यांना पाठिंबा देण्याची हमी दिली. आता त्यांचे जावई त्यांना मित्राप्रमाणे समजतात व त्यांचा सल्ला स्वीकारतात.
८, ९. काही पालकांनी त्यांच्या प्रौढ मुलांच्या स्वावलंबनाशी कसे जुळवून घेतले?
८ तथापि, नवविवाहित कोणतीही अशास्रवचनीय गोष्ट करत नसले, तरी पालकांना जे उत्तम वाटते ते करत नसल्यास काय? विवाहित मुले असलेले एक जोडपे सांगते, “आम्ही त्यांना नेहमीच यहोवाचा दृष्टिकोन पाहण्याची मदत करतो, परंतु त्यांच्या निर्णयाला आमची सहमती नसली तरी आम्ही तो स्वीकारतो आणि त्यांना पाठिंबा व उत्तेजन देतो.”
९ आशियातील काही देशांमध्ये, काही मातांना आपल्या मुलांच्या स्वावलंबनाचा स्वीकार करणे विशेषपणे कठीण वाटते. तथापि, त्यांनी ख्रिस्ती व्यवस्था आणि मस्तकपदाचा आदर केल्यास, त्यांच्या सुनांबरोबर खटके उडणे कमी होत असल्याचे दिसून येते. एका ख्रिस्ती स्त्रीला तिच्या मुलांचे कुटुंबातून वेगळे होणे हे “सतत वाढणारी कृतज्ञता याचा एक स्रोत” असल्याचे दिसते. त्यांची नवीन घरांना चालवण्याची क्षमता पाहण्यात तिला आनंद होतो. यामुळे उतारवयात तिला व तिच्या पतीला सोसावा लागणारा शारीरिक आणि मानसिक भार देखील कमी झाला आहे.
तुमच्या वैवाहिक बंधनाला पुनः बळकटी आणणे
१०, ११. मध्यम वयातील काही पाश टाळण्यासाठी कोणता शास्रवचनीय सल्ला लोकांना मदत करील?
१० लोक मध्यम वयोमान गाठतात तेव्हा विविध प्रकारे प्रतिक्रिया दाखवतात. काही पुरुष तरुण दिसण्यासाठी वेगळ्याच प्रकारचा पेहराव करून आव आणतात. पुष्कळ स्त्रिया रजोनिवृत्तीमुळे होणाऱ्या बदलांबद्दल चिंता करतात. काही मध्यमवयीन व्यक्ती विरुद्ध लिंगी तरुण सदस्यांसोबत प्रणय-चेष्टा करण्याद्वारे त्यांच्या सोबत्यांना चीड आणून ईर्ष्येस पेटवतात, हे दुःखाचे आहे. तथापि, देवभिरू पुरुष अनुचित अभिलाषांवर ताबा ठेवून “मर्यादेने” राहत आहेत. (१ पेत्र ४:७) अशाच रीतीने, प्रौढ स्त्रिया देखील पतींवरील त्यांच्या प्रेमाखातर आणि यहोवाला खूष करण्याच्या इच्छेखातर विवाहातील स्थायीपणा राखण्यासाठी कार्य करतात.
११ प्रेरित होऊन लमुएल राजाने, पतीचे ‘अहित न करता आमरण हित करणाऱ्या’, ‘सद्गुणी स्त्रीची’ स्तुती नमूद केली. एक ख्रिस्ती पती, भावनात्मक अस्वस्थतेला तोंड देत असलेल्या त्याच्या मध्यमवयीन पत्नीची कदर बाळगण्यास विसरणार नाही. त्याचे प्रेम “तिची प्रशंसा” करण्यास त्याला प्रवृत्त करील.—नीतिसूत्रे ३१:१०, १२, २८.
१२. वर्षे उलटतात तशी जोडप्यामध्ये जवळीक कशी येऊ शकते?
१२ मुलांचे संगोपन करण्याच्या व्यग्र वर्षांदरम्यान, मुलांच्या गरजा पुरवण्यासाठी तुम्ही तुमच्या वैयक्तिक इच्छांना आनंदाने बाजूला केले असेल. त्यांनी घर सोडल्यावर आता ही वेळ, तुमच्या वैवाहिक जीवनावर पुनः केंद्रित होण्याची आहे. एक पती सांगतो, “माझ्या मुलींनी घर सोडले तेव्हा मी पुन्हा माझ्या पत्नीबरोबर प्रियाराधना करू लागलो.” दुसरा पती सांगतो, “आम्ही एकमेकांच्या आरोग्याकडे लक्ष देतो आणि व्यायामाच्या गरजेची आठवण करून देतो.” एकाकी वाटू नये म्हणून ते मंडळीतील इतर सदस्यांचे आदरातिथ्य करतात. होय, इतरांबद्दल रसिकता बाळगल्याने आशीर्वाद मिळतात. याशिवाय, त्यामुळे यहोवा खूष होतो.—फिलिप्पैकर २:४; इब्री लोकांस १३:२, १६.
१३. एखादे जोडपे उतारवयात जोडीने प्रवेश करत असताना मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा कोणती भूमिका बजावतात?
१३ तुमच्या दोघांमध्ये दळणवळणाची दरी विकसित होऊ देऊ नका. मोकळेपणाने एकमेकांशी बोला. (नीतिसूत्रे १७:२७) एक पती सांगतो, “आम्ही एकमेकांबद्दल काळजी घेऊन आणि विचारशील राहून समजबुद्धी वाढवतो.” त्याची पत्नी याजशी सहमत होऊन म्हणते: “आम्ही वयस्कर झाल्यावर, एकत्र मिळून चहा घेणे, चर्चा करणे आणि एकमेकांना सहयोग देण्याचा आनंद घेऊ लागलो.” तुमचा मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे वैवाहिक बंधन मजबूत होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे विवाह अशा पूर्वस्थितीत येईल की विवाह मोडणाऱ्या सैतानाच्या हल्ल्यांना उलथून पाडले जाईल.
तुमच्या नातवंडांसोबत आनंद करा
१४. ख्रिश्चन या नात्याने तीमथ्याचे संगोपन होत असताना त्याच्या आजीने स्पष्टपणे कोणती भूमिका पार पाडली?
१४ नातवंडे वृद्धांचा “मुकुट” आहेत. (नीतिसूत्रे १७:६) नातवंडांसोबतचा सहवास खरोखर आनंदविणारा—मूर्तिमंत आणि तजेला देणारा असू शकतो. बायबल लोईस आजीबद्दल चांगले मत देते, तिने आपली धार्मिक मते आपली मुलगी युनीके हिच्यासोबत आपला नातू तीमथ्य याला देखील सांगितली. हा तरुण त्याची आई आणि आजी बायबलला मोलाचे समजत असल्याची जाणीव बाळगतच मोठा झाला.—२ तीमथ्य १:५; ३:१४, १५.
१५. नातवंडांच्या बाबतीत, आजी-आजोबा कोणता अनमोल हातभार लावू शकतात, परंतु कोणती गोष्ट त्यांनी टाळली पाहिजे?
१५ या खास क्षेत्रात आजी-आजोबा अनमोल हातभार लावू शकतात. आजी-आजोबांनो, तुम्ही यहोवाच्या उद्देशांच्या ज्ञानाची सहभागिता तुमच्या मुलांसोबत आधीच केलेली आहे. अशाच रीतीने, आता तुम्ही दुसऱ्या पिढीसाठी करू शकता! अनेक मुलांना त्यांचे आजी-आजोबा सांगत असलेल्या बायबल कथा ऐकण्यास आनंद वाटतो. अर्थातच, मुलांमध्ये बायबल सत्य बिंबवण्यासाठी तुम्ही पित्याची जबाबदारी घेत नाही. (अनुवाद ६:७) उलटपक्षी, तुम्ही पूरक असता. तुमची प्रार्थना स्तोत्रकर्त्याप्रमाणे असो: “मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांस तुझ्या पराक्रमांचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी हे देवा, मला सोडू नको.”—स्तोत्र ७१:१८; ७८:५, ६.
१६. आजी-आजोबा त्यांच्या कुटुंबात तणाव वाढविण्यास कारणीभूत होण्याचे कसे टाळू शकतात?
१६ अनेक आजी-आजोबा चिमुकल्यांचे फाजील लाड पुरवत असल्यामुळे आजी-आजोबा आणि मोठ्या मुलांमध्ये तणाव निर्माण होतो. तथापि, नातवांची पालकांना काही गोष्टी सांगण्याची इच्छा नसते तेव्हा तुमचा प्रांजळ दयाळुपणा त्या सांगण्यासाठी कदाचित सोपे बनवील. काहीवेळा, किशोरवयीनांना वाटते की त्यांचे लाड पुरवणारे आजी-आजोबा, पालकांची बाजू न घेता त्यांची बाजू घेतील. असे असल्यास काय? सुज्ञता दाखवा आणि नातवंडांनी त्यांच्या पालकांसोबत मोकळेपणाने बोलण्यासाठी त्यांना उत्तेजन द्या. यामुळे यहोवा खूष होतो, हे त्यांना सांगू शकता. (इफिसकर ६:१-३) आवश्यकता असल्यास, किशोरवयीनांच्या पालकांशी आधीच बोलून किशोरवयीनांकरता मार्ग सुलभ करण्याची मदत तुम्ही करू शकता. इतक्या वर्षांदरम्यान तुम्ही जे काही शिकला आहात त्याबद्दल तुमच्या नातवंडांसोबत मोकळेपणाने बोला. त्यांना तुमच्या प्रामाणिकपणाचा आणि मनमोकळेपणाचा फायदा होऊ शकतो.
वृद्ध होता तसे जुळवून घ्या
१७. उतारवयातील ख्रिश्चनांनी स्तोत्रकर्त्याच्या कोणत्या निर्धाराचे अनुकरण केले पाहिजे?
१७ वर्षे उलटतात तसे, पूर्वी करत होता त्याप्रमाणे किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे सर्वकाही करता येऊ शकत नाही असे दिसून येईल. एखादी व्यक्ती वृद्धापकाळाशी कसे जुळवून घेते? तुम्ही ३० वर्षांचे आहात असे तुम्हाला वाटत असेल, परंतु आरशातील एक ओझरती नजर, एक वेगळीच वास्तविकता दाखवते. निराश होऊ नका. स्तोत्रकर्त्याने यहोवाला याचना केली: “उतारवयात माझा त्याग करू नको; माझी शक्ति क्षीण होत चालली असता मला सोडू नको.” स्तोत्रकर्त्याच्या निर्धाराचे अनुकरण करण्याचा निश्चय करा. त्याने म्हटले: “मी तर नित्य आशा धरून राहीन आणि तुझे स्तवन अधिकाधिक करीत जाईन.”—स्तोत्र ७१:९, १४.
१८. एखादा प्रौढ ख्रिश्चन त्याच्या सेवानिवृत्तीचा मोलवान उपयोग कसा करून घेऊ शकतो?
१८ अनेकांनी प्रापंचिक कार्यातून निवृत्त झाल्यावर यहोवाच्या स्तुतीत वाढ करण्याची आगाऊ तयारी केली. सेवानिवृत्त झालेला एक पिता सांगतो: “माझी मुलगी शाळा सोडील तेव्हा काय करावे याची आगाऊ योजना मी केली. मी पूर्ण वेळेचे प्रचारकार्य सुरू करण्याचा निश्चय केला आणि यहोवाची सेवा करण्यास पूर्णपणे मोकळे राहण्यासाठी मी माझा व्यापार विकून टाकला. देवाच्या मार्गदर्शनासाठी मी प्रार्थना केली.” तुमचे वय सेवानिवृत्त होण्याच्या बेताला आलेले असल्यास, आपल्या महान निर्माणकर्त्याने जे म्हटले त्यापासून सांत्वन मिळवा: “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतहि मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हास वागवीन.”—यशया ४६:४.
१९. उतारवय होत असलेल्यांना कोणता सल्ला दिला आहे?
१९ लौकिक कार्यानंतर, सेवानिवृत्तीशी जुळवून घेणे सोपे नसेल. प्रेषित पौलाने वृद्ध पुरुषांना “मर्यादशील” राहण्याचा सल्ला दिला. यासाठी सोप्या जीवनपद्धतीकडे झोक जाऊ न देता सामान्य निर्बंधाची जरूरी असते. सेवानिवृत्तीनंतर नित्यक्रम आणि स्वतःला शिस्त लावण्याची कदाचित पूर्वीपेक्षा अधिक गरज असेल. तर मग, व्यस्त राहा, “प्रभूच्या कामात सर्वदा पुष्कळ करत राहून स्थिर व अढळ व्हा आणि हे जाणून घ्या की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.” (१ करिंथकर १५:५८) इतरांना मदत करण्यासाठी तुमचे कार्य विस्तृत करा. (२ करिंथकर ६:१३) अनेक ख्रिश्चन, आपल्या मर्यादा ओळखून सुवार्तेचा प्रचार आवेशाने करण्याद्वारे असे करतात. तुम्ही वयस्कर होता तसे “विश्वास, प्रीति व सहनशीलता ह्यांमध्ये दृढ” राहा.—तीत २:२.
वैवाहिक सोबती गमावण्याला तोंड देणे
२०, २१. (अ) सद्य व्यवस्थीकरणात, एखाद्या वैवाहिक जोडप्याला कालांतराने कोणती गोष्ट वेगळी करते? (ब) हन्ना, शोकित वैवाहिक सोबत्यांकरता उत्तम उदाहरण कशी मांडते?
२० सद्य व्यवस्थीकरणात वैवाहिक जोडपी, कालांतराने मृत्यूमुळे वेगळी होतात, ही गोष्ट दुःखाची असली तरी वास्तविक आहे. शोकित असलेल्या ख्रिस्ती वैवाहिक सोबत्यांना त्यांचे प्रियजण आता झोपेत असल्याची जाणीव असते आणि ते त्यांना पुन्हा पाहतील हा आत्मविश्वास त्यांना असतो. (योहान ११:११, २५) परंतु, तरीही हानी दुःखदायक आहे. याला जिवंत व्यक्ती कसे तोंड देऊ शकते? *
२१ बायबलच्या एका विशिष्ट व्यक्तीने काय केले हे लक्षात घेतल्याने मदत होऊ शकेल. हन्ना तिच्या विवाहाच्या केवळ सातच वर्षांनंतर विधवा झाली होती आणि आपण तिच्याविषयी वाचतो तेव्हा ती ८४ वर्षांची होती. तिने आपल्या पतीला गमावले तेव्हा शोक केला असेल ही खातरी आपल्याला असू शकते. तिने याला कसे तोंड दिले? तिने मंदिरात रात्रंदिवस यहोवा देवाची पवित्र सेवा केली. (लूक २:३६-३८) निःसंशये, हन्नाचे प्रार्थनापूर्वक सेवेचे जीवन, विधवा म्हणून असलेले दुःख आणि एकाकीपणा यावर एक उत्तम उपाय ठरले.
२२ काही विधवा आणि विधुरांनी एकाकीपणाला कसे तोंड दिले आहे?
२२ दहा वर्षांपूर्वी विधवा झालेली एक ७२ वर्षीय विधवा सांगते की, “ज्याच्यासोबत मी बोलू शकते असा कोणी सोबती नाही, हे माझ्यासाठी एक सर्वात मोठे आव्हान आहे. माझा पती चांगला ऐकणारा होता. आम्ही मंडळीबद्दल तसेच ख्रिस्ती सेवेतील आमच्या सहभागाविषयी बोलत असू.” आणखी एक विधवा सांगते: “काळ मानसिक व्यथा बरा करणारा असला, तरी एखादी व्यक्ती तिच्या वेळेचा वापर ज्यारीतीने करते ते तिला बरे होण्याची मदत करत असते, हे मला अधिक उचित असल्याचे दिसून आले आहे. इतरांची मदत करण्यासाठी तुम्ही उत्तम स्थितीत असता.” एक ६७ वर्षीय वृद्ध असे म्हणून सहमती दाखवतात: “मृत्यूमुळे झालेल्या हानीला तोंड देण्याचा एक उत्तम मार्ग, इतरांना सांत्वन देण्यात स्वतःला खर्ची पाडणे हा आहे.”
वृद्धापकाळात देवाकडून मोलाचे समजले जाणारे
२३, २४. बायबल वृद्ध जणांना, विशेषकरून विधवा झालेल्यांना कोणते मोठे सांत्वन देते?
२३ मृत्यू एखाद्या प्रिय व्यक्तीला हिरावून घेत असला, तरी यहोवा सर्वदा विश्वासू, सर्वदा खात्रीलायक असतो. वृद्ध दावीद राजाने असे गायिले, “परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.”—स्तोत्र २७:४.
२४ प्रेषित पौल, “ज्या विधवा खरोखरीच्या विधवा आहेत त्यांचा सन्मान कर,” असे आर्जवतो. (१ तीमथ्य ५:३) हा बोध दिल्यानंतरचा सल्ला, जवळचे नातेवाईक नसलेल्या लायक विधवांना मंडळीकडून भौतिक साह्याची गरज भासली असेल असे सुचवतो. तरीपण, “सन्मान” या बोधाच्या अर्थात त्यांना मोलाचे समजणे या कल्पनेचा समावेश होतो. यहोवा धार्मिक विधवा आणि विधूर यांना मोलाचे समजतो व तो त्यांना आधार देईल या ज्ञानामुळे त्यांना किती सांत्वन मिळू शकते!—याकोब १:२७.
२५. वयस्करांसाठी अद्यापही कोणते ध्येय आहे?
२५ देवाचे प्रेरित वचन सांगते, “पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.” हा ‘शोभेचा मुकुट धर्ममार्गाने चालल्याने प्राप्त होतो.’ (नीतिसूत्रे २०:२९; १६:३१) मग, तुम्ही विवाहित असा अथवा पुन्हा एकदा सडे झालेले असा तुमच्या जीवनात यहोवाच्या सेवेला सतत प्रथम स्थानी ठेवा. अशा प्रकारे, देवासोबत आता तुमचे चांगले नाव असेल आणि कधीही वृद्धापकाळाचे दुखणे नसणाऱ्या जगातील सार्वकालिक जीवनाचे भवितव्य तुमच्यासाठी असेल.—स्तोत्र ३७:३-५; यशया ६५:२०.
^ परि. 20 या विषयावर विस्तृत चर्चेकरता वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी द्वारा प्रकाशित केलेले एखादी प्रिय व्यक्ती मरते तेव्हा (इंग्रजी) हे माहितीपत्रक पाहा.