व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४४

सगळेच समारंभ देवाला आवडतात का?

सगळेच समारंभ देवाला आवडतात का?

यहोवाची इच्छा आहे की आपण जीवनाचा आनंद घ्यावा आणि काही खास प्रसंगी हा आनंद साजराही करावा. पण सगळेच समारंभ आणि सणवार त्याला आवडतात का? आणि याबाबतीत निर्णय घेताना आपलं यहोवावर प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?

१. बरेच समारंभ आणि सणवार यहोवाला का आवडत नाहीत?

कदाचित तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य होईल, की बरेचसे सणवार आणि समारंभ बायबलच्या विरोधात असलेल्या शिकवणींवर किंवा यहोवाला मान्य नसलेल्या उपासनेवर आधारित आहेत. त्यांचा संबंध भूतविद्येशी किंवा मेल्यानंतर माणसाचा एक अंश अमर राहतो या कल्पनेशी असू शकतो. दुसरीकडे पाहता, काही सणावारांची सुरुवात अंधश्रद्धेतून किंवा शुभ-अशुभ याच्याशी संबंधित विश्‍वासांतून झाली आहे. (यशया ६५:११) म्हणूनच यहोवा आपल्या उपासकांना सांगतो: “स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करा, आणि अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका.”२ करिंथकर ६:१७. a

२. ज्या समारंभात माणसांना गरजेपेक्षा जास्त सन्मान दिला जातो त्याबद्दल यहोवाला कसं वाटतं?

यहोवा आपल्याला “माणसावर भरवसा” ठेवण्याच्या धोक्याबद्दल सावध करतो. (यिर्मया १७:५ वाचा.) काही सणवार नेत्यांच्या किंवा सैनिकांच्या सन्मानासाठी साजरे केले जातात. आणि इतर समारंभ देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी किंवा राष्ट्रीय प्रतिकांच्या सन्मानासाठी साजरे केले जातात. (१ योहान ५:२१) तर आणखी काही समारंभ राजकीय किंवा सामाजिक चळवळींच्या प्रसारासाठी साजरे केले जातात. जर आपण एखाद्या व्यक्‍तीला किंवा संघटनेला गरजेपेक्षा जास्त सन्मान दिला तर यहोवाला कसं वाटेल? खासकरून अशांना जे यहोवाच्या उद्देशाच्या विरोधात असलेल्या विचारांचं समर्थन करतात?

३. कोणत्या प्रकारच्या वागणुकीमुळे काही सोहळे यहोवाला आवडत नाहीत?

बायबलमध्ये सांगितलंय की “प्रमाणाबाहेर पिणं, बेलगाम मौजमस्ती, [आणि] दारूबाजी” यांसारख्या गोष्टी यहोवाला आवडत नाहीत. (१ पेत्र ४:३) काही सोहळ्यांत लोक मानमर्यादा सोडून वागतात आणि अनैतिक गोष्टी करतात. पण यहोवाशी आपली मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आपण अशा अशुद्ध आणि अनैतिक गोष्टींपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे.

आणखी जाणून घेऊ या

सणावारांच्या आणि समारंभांच्या बाबतीत योग्य निर्णय घेऊन आपण यहोवाचं मन आनंदित कसं करू शकतो, हे जाणून घेऊ या.

४. यहोवाचा अनादर करणाऱ्‍या समारंभांमध्ये भाग घेऊ नका

इफिसकर ५:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • एखादा सण साजरा करावा की नाही हे ठरवण्याआधी आपण कोणत्या गोष्टींची खातरी केली पाहिजे?

  • तुम्ही राहता त्या ठिकाणी कोणकोणते सण साजरे केले जातात?

  • हे सण यहोवाला आवडतात असं तुम्हाला वाटतं का?

उदाहरणार्थ, वाढदिवस साजरा करण्याबद्दल यहोवाला काय वाटतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? बायबलमध्ये यहोवाच्या कोणत्याही उपासकाने वाढदिवस साजरा केल्याचा उल्लेख नाही. पण त्यात अशा दोन वाढदिवसांचा उल्लेख आहे, जे यहोवाची उपासना न करणाऱ्‍या लोकांनी साजरे केले होते. उत्पत्ती ४०:२०-२२ आणि मत्तय १४:६-१० वाचा. मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या दोन्ही वाढदिवसांच्या सोहळ्यांमध्ये कोणत्या गोष्टी सारख्या आहेत?

  • बायबलच्या या अहवालांवरून तुम्हाला काय वाटतं, वाढदिवस साजरा करण्याबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे?

तरी कदाचित तुमच्या मनात हा प्रश्‍न येईल, ‘मी जर वाढदिवसाच्या कार्यक्रमात, किंवा बायबल तत्त्वांनुसार नसलेल्या दुसऱ्‍या एखाद्या समारंभात भाग घेतला, तर यहोवाला खरंच काही फरक पडेल का?’ निर्गम ३२:१-८ वाचा. मग, व्हिडिओ पाहा, आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • यहोवाच्या नजरेत कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत याची आपण खातरी का केली पाहिजे?

  • आपण ही खातरी कशी करू शकतो?

एखाद्या समारंभात भाग घेणं यहोवाच्या नजरेत योग्य आहे की नाही हे कसं ठरवायचं?

  • तो समारंभ बायबलच्या विरोधात असलेल्या शिकवणींवर आधारित आहे का? हे जाणून घेण्यासाठी त्याची सुरुवात कशी झाली याची माहिती शोधून काढा.

  • त्यात माणसांना, संघटनांना किंवा राष्ट्रीय प्रतीकांना गरजेपेक्षा जास्त सन्मान दिला जातो का? आपण इतर कोणाहीपेक्षा यहोवाला जास्त सन्मान देतो. आणि तोच जगातल्या सगळ्या समस्या सोडवेल असा भरवसा आपल्याला आहे.

  • त्यात केल्या जाणाऱ्‍या गोष्टी बायबलच्या स्तरांच्या विरोधात आहेत का? आपण अनैतिक आणि अशुद्ध गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे.

५. इतर जण आपल्या विश्‍वासांचा आदर करतील अशा प्रकारे वागा

यहोवाला न आवडणाऱ्‍या समारंभात भाग घ्यायला जेव्हा इतर जण आपल्यावर दबाव आणतात, तेव्हा त्याचा सामना करणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. तुम्ही त्या समारंभात भाग घेणार नाही हे त्यांना स्पष्टपणे सांगा. पण त्यांच्याशी रागाने बोलू नका आणि त्यांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. हे कसं करता येईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

मत्तय ७:१२ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • एखादा सण साजरा करू नका, असं तुमच्या घरच्यांना सागणं योग्य राहील का? या वचनावरून तुम्हाला काय वाटतं?

  • तुम्ही तुमच्या घरच्यांना हे कसं दाखवू शकता, की जरी तुम्ही त्यांच्यासोबत सण साजरे करत नसला, तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर मनापासून प्रेम करता?

६. यहोवाची इच्छा आहे की आपण आनंदी असावं

यहोवाची अशी इच्छा आहे की आपण आपल्या घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत खास क्षणांचा आनंद लुटावा. उपदेशक ८:१५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • आपण आनंदी राहावं अशी यहोवाची इच्छा आहे हे या वचनातून कसं कळतं?

यहोवाची अशी इच्छा आहे की त्याच्या लोकांनी खास प्रसंगांचा आनंद घ्यावा आणि सोबत मिळून मौजमजा करावी. ही गोष्ट आपल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांतून कशी दिसून येते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

गलतीकर ६:१० वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • इतरांचं ‘भलं करण्यासाठी’ सणावारांत भाग घेणं गरजेचं आहे का?

  • कोणाला भेटवस्तू देताना तुम्हाला सर्वात जास्त आनंद केव्हा होईल, सणासुदीला द्यावं लागतं म्हणून देताना, की एखाद्या वेळी फक्‍त तुम्हाला मनापासून द्यावंसं वाटतं तेव्हा?

  • साक्षीदारांपैकी बरेच जण आपल्या मुलांसाठी अधूनमधून काही खास प्लॅन बनवतात आणि कोणताही विशेष प्रसंग नसतानाही त्यांना गिफ्ट देतात. तुम्ही तुमच्या मुलांसाठी कोणत्या खास गोष्टी करू शकता?

काही जण म्हणतात: “सणाची सुरुवात कशी झाली याच्याशी काय घेणंदेणं? ते तर फक्‍त सोबत मिळून एन्जॉय करण्याचं निमित्त असतं.”

  • तुम्ही त्यांना काय म्हणाल?

थोडक्यात

यहोवाची इच्छा आहे की आपण घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत खास क्षणांचा आनंद घ्यावा. पण त्याची अशीही इच्छा आहे, की त्याला न आवडणाऱ्‍या समारंभांमध्ये आपण भाग घेऊ नये.

उजळणी

  • एखाद्या समारंभात भाग घेणं यहोवाच्या नजरेत योग्य आहे की नाही, हे ठरवताना आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार करू शकतो?

  • समारंभांमध्ये भाग घेण्याबद्दल आपल्या घरच्यांनी आणि मित्रांनी आपल्या निर्णयाचा आदर करावा, म्हणून आपण काय करू शकतो?

  • आपण आनंदी असावं आणि मौजमजा करावी अशी यहोवाची इच्छा आहे, हे आपल्याला कशावरून कळतं?

ध्येय

हेसुद्धा पाहा

काही विशिष्ट सणावारांमध्ये खरे ख्रिस्ती का भाग घेत नाहीत हे जाणून घ्या.

“यहोवा के साक्षी कुछ त्योहार क्यों नहीं मनाते?” (वेबसाईटवरचा लेख)

वाढदिवस साजरा करणं देवाच्या नजरेत योग्य नाही असं आम्ही का मानतो, याची चार कारणं पाहा.

“यहोवाचे साक्षीदार वाढदिवस का करत नाहीत?” (वेबसाईटवरचा लेख)

यहोवावर प्रेम करणारी लहान मुलं सणांच्या दिवसांमध्ये यहोवाला कशी खूश करू शकतात, ते पाहा.

तुम्ही यहोवासाठी अनमोल आहात  (११:३५)

लाखो ख्रिश्‍चनांनी नाताळ साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल त्यांना कसं वाटतं?

“त्यांनी खूप काही मिळवलं” (ऑनलाईन लेख)

a काही सणावारांबद्दल काय निर्णय घ्यावा हे जाणून घेण्यासाठी काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. ५ पाहा.