बायबल प्रश्नांची उत्तरे
देव कशा प्रकारची व्यक्ती आहे?
देव एक अदृश्य आत्मिक व्यक्ती आहे. त्याने आकाश, पृथ्वी आणि सर्व सजीव वस्तू निर्माण केल्या आहेत. देवाला कोणीही निर्माण केले नाही; त्याला सुरुवात नाही. (स्तोत्र ९०:२) देवाची अशी इच्छा आहे की लोकांनी त्याला जाणून घ्यावे व त्याच्याबद्दलचे सत्य शिकून घ्यावे.—प्रेषितांची कृत्ये १७:२४-२७ वाचा.
आपण देवाला त्याच्या नावाने ओळखू शकतो. त्याने ज्या ज्या गोष्टी बनवल्या आहेत त्यांवर मनन केल्याने आपल्याला त्याचे काही गुण पाहायला मिळतात. (रोमकर १:२०) पण देवाला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण त्याच्या वचनाचा अर्थात बायबलचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्यामुळे, देव किती प्रेमळ आहे हे आपल्याला कळते.—स्तोत्र १०३:७-१० वाचा.
अन्यायाबद्दल देवाला कसे वाटते?
आपला निर्माणकर्ता यहोवा देव याला अन्याय मुळीच आवडत नाही. (अनुवाद २५:१६) त्याने मानवांना त्याच्या प्रतिरूपात बनवले आहे. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच लोकांनादेखील अन्याय झालेला आवडत नाही. आपल्या अवतीभोवती जो अन्याय होत आहे त्याला देव जबाबदार नाही. देवाने मानवांना इच्छा-स्वातंत्र्य दिले आहे. पण, दुःखाची गोष्ट म्हणजे आज अनेक लोक त्यांच्या इच्छा-स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात आणि इतरांवर अन्याय करतात. हे पाहून यहोवाला खूप दुःख होते.—उत्पत्ति ६:५, ६; अनुवाद ३२:४, ५ वाचा.
यहोवाला न्याय प्रिय आहे, आणि तो अन्याय कायमचे खपवून घेणार नाही. (स्तोत्र ३७:२८, २९) बायबल असे अभिवचन देते की देव लवकरच सर्व अन्याय मिटवून टाकेल.—२ पेत्र ३:७-९, १३ वाचा. (w14-E 01/01)
बायबल असे अभिवचन देते की देव लवकरच सर्वांना न्याय देईल