येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचा समाजाला कसा लाभ होतो?
येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचा समाजाला कसा लाभ होतो?
खरे ख्रिस्ती समाजाची नैतिक मूल्ये सुधारण्याचा प्रयत्न करतात. कशा प्रकारे? येशू ख्रिस्ताच्या आज्ञेचे पालन करण्याद्वारे. येशूने त्याच्या अनुयायांना आज्ञा दिली: “तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”—मत्तय २८:१९, २०.
“शिष्य करा” ही जी आज्ञा येशूने दिली होती ती पाळणे आणि मिठासारखे बनण्याचा व या जगात प्रकाशासारखे चमकण्याचा जो सल्ला येशूने दिला तो पाळणे या दोन गोष्टींमध्ये जवळचा संबंध आहे. (मत्तय ५:१३, १४) तो कसा? आणि शिष्य बनवण्याच्या कार्याचा लोकांना कसा लाभ होतो?
ख्रिस्ताचा संदेश—आपला बचाव करणारा आणि जीवनात प्रकाश पाडणारा
मिठामध्ये अन्नपदार्थ टिकवून ठेवण्याचा गुणधर्म असतो. त्याच प्रकारे येशूने त्याच्या अनुयायांना सर्व राष्ट्रांमध्ये जो संदेश सांगण्याची आज्ञा दिली तो संदेश आपला बचाव करतो. जे लोक येशूच्या शिकवणींचा जीवनात स्वीकार करून त्या लागू करतात त्यांचा जगातील खालावलेल्या नैतिक स्तरांपासून बचाव होतो. कोणत्या अर्थाने? ते लोक शरीराला हानीकारक असलेल्या गोष्टी, जसे की धूम्रपान यांसारख्या गोष्टींपासून दूर राहण्यास शिकतात, आणि ते आपल्यात प्रेम, शांती, सहनशीलता, सौम्यता आणि चांगुलपणा यांसारखे चांगले गुण विकसित करतात. (गलतीकर ५:२२, २३) त्यांच्या या चांगल्या गुणांचा समाजाला फायदा होतो. जे ख्रिस्ती, लोकांचा बचाव करणारा हा संदेश आपल्या शेजाऱ्यांना सांगतात ते या समाजाला एक चांगले योगदान देतात.
प्रकाश या शब्दचित्राविषयी काय? ज्या प्रकारे चंद्र सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो, त्याच प्रकारे ख्रिस्ताचे अनुयायी यहोवा देवाकडून येणारा “प्रकाश” प्रतिबिंबित करतात. हा संदेश इतरांना सांगण्याद्वारे आणि चांगली कार्ये करण्याद्वारे ते यहोवाकडून येणाऱ्या प्रकाशाला प्रतिबिंबित करतात.—येशूने पुढे, प्रकाशासारखे होणे आणि त्याचे अनुयायी होणे यामध्ये काय समानता आहे याविषयी आणखी माहिती दिली. त्याने म्हटले: “दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो; त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” एका चमकणाऱ्या दिव्याला जेव्हा एखाद्या उंच ठिकाणी ठेवले जाते तेव्हा त्याच्या जवळ असणाऱ्या प्रत्येकाला त्याचा प्रकाश स्पष्टपणे दिसतो. त्याच प्रकारे खरे ख्रिश्चन जे साक्षकार्य करतात आणि इतरांना मदत करण्यासाठी जी चांगली कार्ये करतात ती कार्ये त्यांच्या जवळपास राहणाऱ्या प्रत्येकाला दिसली पाहिजेत. असे का? येशूने म्हटले की जे लोक तुमची चांगली कार्ये पाहतील ते तुमची नाही तर देवाची स्तुती करतील.—मत्तय ५:१४-१६.
एक सामूहिक जबाबदारी
येशूने जेव्हा असे म्हटले की “तुम्ही जगाचा प्रकाश आहा” आणि “तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या” तेव्हा तो त्याच्या शिष्यांना उद्देशून बोलत होता. येशूने जी कामगिरी आपल्यावर सोपवली आहे ती वेगवेगळ्या धर्मांमध्ये पसरलेले फक्त काही लोक पूर्ण करू शकत नाहीत. त्याउलट येशूचे सर्व अनुयायी “प्रकाश” आहेत. सत्तर लाख यहोवाचे साक्षीदार जे २३५ पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये राहतात ते असे मानतात की ख्रिस्ताने दिलेला संदेश त्यांच्या शेजाऱ्यांना जाऊन सांगणे ही त्यांची सामूहिक जबाबदारी आहे.
यहोवाचे साक्षीदार जो संदेश लोकांना सांगतात त्याचा मुख्य विषय काय आहे? येशूने जेव्हा त्याच्या अनुयायांवर प्रचार करण्याची कामगिरी सोपवली तेव्हा त्याने लोकांना सामाजिक किंवा राजनैतिक सुधारणेविषयी, चर्च आणि राजकारण यांच्या एकत्र येण्याविषयी किंवा इतर कोणत्याही जगीक विचारसरणीविषयी शिकवण्यास सांगितले नाही. त्याउलट येशूने त्यांना सांगितले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४) आज खरे ख्रिस्ती या आज्ञेचे पालन करून त्यांच्या शेजाऱ्यांना देवाच्या राज्याविषयी सांगतात. देवाचे राज्य असे एकमेव सरकार आहे जे सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा विनाश करेल आणि या पृथ्वीवर एक धार्मिक नवीन जग आणेल.
खरेतर शुभवर्तमानाचे अहवाल वाचताना येशूच्या सेवाकार्यातून दोन गोष्टी ठळकपणे दिसून येतात, आणि त्यांचा आज खरे ख्रिस्ती जे कार्य करत आहेत त्यावर प्रभाव पडतो. या दोन्ही गोष्टींवर पुढच्या लेखात चर्चा करण्यात आली आहे. (w१२-E ०५/०१)
[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]
ख्रिस्ताने दिलेला संदेश मिठासारखा कसा आहे?
[१७ पानांवरील संक्षिप्त आशय]
ख्रिस्ताने दिलेला संदेश अंधार असलेल्या ठिकाणी दिव्यासारखा कसा आहे?