व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विवाह व्यवस्था मोडकळीस का येत आहे?

विवाह व्यवस्था मोडकळीस का येत आहे?

विवाह व्यवस्था मोडकळीस का येत आहे?

“परूशी [येशूजवळ] आले, ते त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाले, पुरुषाने आपल्या बायकोला कोणत्याहि कारणावरून टाकावे हे योग्य आहे काय?”—मत्तय १९:३, पं.र.भा.

येशूच्या दिवसांतील काही लोकांच्या मनात असा प्रश्‍न होता, की विवाह टिकू शकतात का किंवा ते टिकून राहिले पाहिजेत का? अशा लोकांना येशूने उत्तर दिले: “तुम्ही वाचले नाही काय की, उत्पन्‍नकर्त्याने सुरुवातीलाच नरनारी अशी ती निर्माण केली, व म्हटले, ह्‍याकरिता पुरुष आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील? ह्‍यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.” * (मत्तय १९:४-६) येशूच्या उत्तरावरून स्पष्ट कळते, की विवाह टिकून राहिले पाहिजेत, असा देवाचा उद्देश होता.

आज अनेक देशांत, सुमारे ४० टक्के किंवा त्याहूनही अधिक विवाह घटस्फोटामुळे ‘तुटत’ आहेत. विवाह टिकवण्याकरता बायबलमध्ये असलेला सल्ला आजही लागू होतो का? विवाह व्यवस्थेतच काहीतरी खोट असल्यामुळे विवाह मोडत आहेत का?

या उदाहरणाचा जरा विचार करा: दोन जोडपी, एकाच मॉडलची कार विकत घेतात. एक जोडपे, आपल्या कारची देखभाल करते, ती काळजीपूर्वक चालवते. यामुळे त्यांची कार कधी बिघडत नाही. पण दुसरे जोडपे आपल्या कारची देखभाल करायला बिलकूल वेळ काढत नाहीत, ते बेफामपणे ती चालवते. यामुळे त्यांची कार बिघडते आणि ते ती टाकून देतात. दुसऱ्‍या जोडप्याच्या कारच्या बाबतीत जे घडले ते कोणामुळे? गाडीमुळे की गाडीच्या मालकामुळे? गाडीचे मालक तिची नीट काळजी घेत नव्हते म्हणूनच त्यांची गाडी बिघडते, हे उत्तर तर्काला पटणारे वाटते, नाही का?

तसेच, आज अनेक जोडप्यांचा विवाह मोडतो तो, विवाह संस्थेतच काहीतरी खोट असल्यामुळे नव्हे. कारण, आज लाखो असेही विवाह आहेत जे टिकून राहिले आहेत. अशा सुखी विवाहातील पती-पत्नी आनंदी बनतात, त्यांना, त्यांच्या कुटुंबांना व समाजाला स्थैर्य लाभते. पण ज्याप्रमाणे एका कारची देखभाल केल्यामुळे, वेळच्या वेळी तिचे मेंटेनंस केल्यामुळे ती खूप वर्षांपर्यंत चांगल्या स्थितीत राहते त्याचप्रमाणे विवाह टिकवण्याकरताही वेळच्या वेळी त्याची देखभाल करणे आवश्‍यक आहे.

तुमचा विवाह होऊन काही दिवसच झालेले असोत किंवा मग खूप वर्ष, विवाह टिकवण्याकरता व तो मजबूत करण्याकरता बायबलमध्ये असलेला सल्ला खरोखरच कामी येतो. पुढच्या लेखात याची काही उदाहरणे दिली आहेत ज्यांची तुम्ही नोंद घेऊ शकता. (w११-E ०२/०१)

[तळटीप]

^ पती किंवा पत्नीपैकी कोणी, लैंगिक अनैतिकता आचरली असेल तर निर्दोष सोबती बायबलनुसार घटस्फोट घेऊ शकतो.—मत्तय १९:९.