व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

२ देवाविषयी अचूक ज्ञान मिळवा

२ देवाविषयी अचूक ज्ञान मिळवा

२ देवाविषयी अचूक ज्ञान मिळवा

“सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.

आक्षेप: देव अस्तित्वातच नाही असे काहींचे म्हणणे आहे. देव व्यक्‍ती नसून फक्‍त एक शक्‍ती आहे असेही काहींचे मत आहे. देव एक खरीखुरी व्यक्‍ती आहे असे मानणारे, देवाबद्दल व त्याच्या गुणांबद्दल परस्परविरोधी शिकवणी देतात.

तुम्ही काय करू शकता? देवाविषयी ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याने निर्मिलेल्या गोष्टीचे निरीक्षण करणे. प्रेषित पौलाने म्हटले: “सृष्टीच्या निर्मितीपासून [देवाच्या] अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) निसर्गाचे बारकाईने निरीक्षण केल्याने आपल्याला आपल्या निर्माणकर्त्याची सुज्ञता व सामर्थ्य याबद्दल पुष्कळ काही शिकायला मिळेल.—स्तोत्र १०४:२४; यशया ४०:२६.

देव नक्की कसा आहे याविषयी अचूक ज्ञान मिळवण्यासाठी प्रत्येकाने देवाचे वचन, बायबल वाचले पाहिजे व त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या विचारसरणीवर इतरांचा प्रभाव पडू देऊ नका. त्याऐवजी बायबलचा सल्ला माना: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोमकर १२:२) उदाहरणार्थ बायबलमध्ये देवाबद्दल दिलेल्या खालील काही वस्तुस्थितींचा विचार करा.

देवाला एक वैयक्‍तिक नाव आहे. बायबल मुळात ज्या भाषांमध्ये लिहिण्यात आले होते त्यात देवाचे वैयक्‍तिक नाव हजारो वेळा होते. अनेक भाषांतरात स्तोत्र ८३:१८ या वचनात हे नाव आढळते. “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—पंडिता रमाबाई भाषांतर.

यहोवा देवाला भावना आहेत व मानवांच्या कार्यांचा त्याच्या भावनांवर परिणाम होतो. यहोवाने इस्राएली लोकांची इजिप्तच्या गुलामगिरीतून मुक्‍तता केल्यानंतर त्यांनी अनेकदा त्याच्या सूज्ञ सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. त्यांच्या बंडखोर कृत्यांमुळे “त्याला दु:ख” झाले व त्यांनी आपल्या कार्यांद्वारे “इस्राएलाच्या पवित्र प्रभूस चिडविले.”—स्तोत्र ७८:४०, ४१.

यहोवा आपल्या प्रत्येकाची काळजी घेतो. आपल्या शिष्यांबरोबर बोलताना येशूने म्हटले: “दोन चिमण्या दमडीला विकतात की नाही? तथापि तुमच्या पित्यावाचून त्यातून एकहि भूमीवर पडणार नाही. तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.”—मत्तय १०:२९-३१.

देवाच्या नजरेत एक जात किंवा संस्कृती दुसऱ्‍या जातीपेक्षा किंवा संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ नाही. प्रेषित पौलाने अथेन्समधील ग्रीक लोकांशी बोलताना म्हटले की देवाने “एकापासून माणसांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या सबंध पाठीवर राहावे असे केले आहे.” पुढे त्याने असेही म्हटले की “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७) प्रेषित पेत्राने सांगितले: “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.

बायबलवर भरवसा ठेवल्यामुळे कोणते फायदे मिळतात? काहींना “देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही.” (रोमकर १०:२) बायबल देवाबद्दल काय शिकवते हे तुम्ही समजून घेतल्यास तुमची दिशाभूल होणार नाही व तुम्ही “देवाजवळ” याल.—याकोब ४:८. (w०९ ५/१)

अधिक माहितीसाठी “देवाबद्दलची खरी शिकवण काय आहे?” हा बायबल नेमके काय शिकवते? * या पुस्तकातील अध्याय १ पाहा.

[तळटीप]

^ यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले.

[६ पानांवरील चित्र]

देवाविषयी ज्ञान मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे त्याने निर्मिलेल्या गोष्टींचे निरीक्षण करणे