पावसाचे आभार माना
पावसाचे आभार माना
पाऊस! पाऊस! जर तो पडलाच नाही तर? आणि पडतच राहिला तर? नद्या नाल्यांना पूर येऊ शकतो, पुष्कळ हानी होऊ शकते. शिवाय, जे लोक थंड, पावसाळी वातावरणात किंवा सतत ओल असलेल्या ठिकाणी राहतात त्यांना पाऊस आवडतोच असे नाही. (एज्रा १०:९) पण, त्या कोट्यवधी लोकांचा विचार करा, ज्यांना वर्षातील अनेक महिने उष्ण व कोरड्या हवामानात राहावे लागते. पावसाच्या सरी पडू लागतात तेव्हा त्यांना किती आल्हाददायक वाटत असेल याची कल्पना करा!
बायबलमध्ये वर्णन केलेल्या प्रदेशांची अशीच स्थिती होती. प्रेषित पौलाने त्याचे मिशनरी कार्य केले तो आशिया मायनरचा अगदी आंतरिक भाग कोरडा व शुष्क होता. पौलाने प्राचीन लुकवनी लोकांना असे म्हटले: “[देवाने] स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.” (प्रेषितांची कृत्ये १४:१७) पौलाने आधी पर्जन्याचा अर्थात पावसाचा उल्लेख केला. कारण, पाऊस नसेल तर काहीच पिकणार नाही व त्यामुळे तेथे “फलदायक ऋतु” देखील असणार नाहीत.
बायबलमध्ये पावसाबद्दल अनेकदा उल्लेख केलेला आढळतो. त्यात, पावसासाठी असलेले हिब्रू व ग्रीक शब्द शंभरपेक्षा जास्त वेळा आले आहेत. पावसाच्या अमोल देणगीविषयी तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे का? तसेच, वैज्ञानिकदृष्ट्या बायबल किती अचूक आहे हेही जाणून तुम्हाला तुमचा विश्वास आणखी मजबूत करायला आवडेल का?
बायबलमध्ये पावसाचा उल्लेख
पावसासाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वपूर्ण घटकाकडे येशू ख्रिस्त आपले लक्ष वेधतो. तो म्हणतो: ‘तुमचा पिता वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.’ (मत्तय ५:४५) पावसाचा उल्लेख करण्याआधी येशूने सूर्याचा उल्लेख केल्याचे तुमच्या ध्यानात आले का? हे उचितच आहे, कारण सूर्यामुळे फक्त वनस्पतींनाच वाढण्याची उर्जा मिळत नाही तर, सूर्यामुळे पृथ्वीचे जलचक्रही चालते. होय, सूर्याच्या उष्णतेमुळे ४,००,००० क्यूबिक किलोमीटर समुद्रपाण्याचे दर वर्षी गोड्या पाण्यात बाष्पीभवन होते. यहोवा देवाने सूर्याची निर्मिती केली असल्यामुळे, जलबिंदू आकर्षित करणारा म्हणून त्याला उचितरीत्या संबोधले जाऊ शकते.
बायबलमध्ये जलचक्राचे पुढील प्रकारे वर्णन केले आहे: “देव . . . जलबिंदु आकर्षितो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात; मेघ त्यांची वृष्टि करितात; ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करितात.” (ईयोब ३६:२६-२८) वैज्ञानिकरीत्या अचूक ठरलेल्या या शब्दांना लिहून हजारो वर्षे पूर्ण झाली आहेत व मानवाने जलचक्राची प्रक्रिया समजून घेण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न केला आहे. वॉटर सायन्स ॲण्ड इंजिनियरींग नावाच्या २००३ पाठ्यपुस्तकात असे म्हटले आहे: “पावसाचा एक थेंब कसा तयार होतो, त्याचे कोडे सध्या तरी पूर्णपणे उलगडलेले नाही.”
वैज्ञानिकांना फक्त इतकेच माहीत झाले आहे, की हवेतील अतिसूक्ष्म कण व पाण्याचे रेणू एकत्र येऊन पावसाचे थेंब तयार होतात आणि अशा अनेक थेंबांचे मिळून ढग तयार होतात. पाण्याचे असे सूक्ष्म थेंब एकमेकांत मिसळून पावसाचा एक थेंब तयार होतो. ही एक जटील प्रक्रिया आहे जिला अनेक तास लागतात. हायड्रोलॉजी इन प्रॅक्टीस नावाच्या एका विज्ञान पाठ्यपुस्तकात असे म्हटले आहे: “ढगांचे थेंब मोठे होऊन पावसाचे थेंब कसे बनतात ते सांगणारे अनेक सिद्धांत आहेत व या प्रक्रियेत कोणकोणते टप्पे आहेत ते ठरवण्यात संशोधक भरपूर वेळ खर्च करत आहेत.”
ईयोब ३८:२८, ३६, ३७) हे शब्द लिहून ३,५०० वर्षे पूर्ण झाली आहेत व वैज्ञानिक अजूनही या अवघड प्रश्नांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ज्या प्रक्रियांमुळे पाऊस तयार होतो त्या प्रक्रियांच्या निर्माणकर्त्याने त्याचा सेवक ईयोब याला असे काही प्रश्ने विचारले ज्यामुळे ईयोबाला, आपण देवापुढे किती लीन झाले पाहिजे त्याची जाणीव झाली. जसे की, देवाने त्याला विचारले: “पर्जन्यास कोणी पिता आहे काय? दहिंवरबिंदूस कोण जन्म देतो? . . . अभ्रांस समज कोणी दिली? कोणास आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हजिरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओतितो?” (जलचक्र कसे फिरते?
ग्रीक तत्त्वज्ञानी अशी शिकवण देत, की नदीचे पाणी हे पावसाचे नसून समुद्राचे आहे. समुद्राचे पाणी, जमिनीच्या खालून कसे तरी डोंगरमाथ्यावर पोहंचते व तेथे त्याचे झऱ्यात रूपांतर होऊन ते वाहू लागते. एका बायबल कॉमेंट्रीचा असा दावा आहे, की शलमोनाचेही असेच मत होते. शलमोनाने ईश्वरप्रेरणेने काय लिहिले ते पाहा: “सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनः पुनः वाहत राहतात.” (उपदेशक १:७) समुद्राचे पाणी कसे तरी करून डोंगरमाथ्यावर पोहंचते व तेथूनच नद्यांचा उगम होतो, असा शलमोनाच्या बोलण्याचा अर्थ होता का? या प्रश्नाचे उत्तर मिळण्याकरता आपण, शलमोनाच्या देशात राहणारे लोक जलचक्राविषयी काय मानायचे ते पाहू या. त्यांचाही चुकीच्या कल्पनांवर विश्वास होता का?
शलमोनानंतर, शंभर वर्षांच्या आतच देवाचा संदेष्टा एलिया याने, पाऊस कोणत्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्याविषयी त्याला असलेले ज्ञान प्रकट केले. त्याच्या दिवसांत एकदा, तीन पेक्षा अधिक वर्षांपासून मोठा दुष्काळ पडला होता. (याकोब ५:१७) यहोवाचे लोक, कनानी लोकांचे पर्जन्य दैवत बआल याची उपासना करू लागले होते. त्यामुळे यहोवानेच त्याच्या लोकांवर हा दुष्काळ आणला होता. पण एलियाने या इस्राएल लोकांना ताळ्यावर आणून त्यांना पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केले व पाऊस पडावा म्हणून यहोवाला प्रार्थना करायला तो तयार झाला. प्रार्थना करत असतानाच, एलियाने त्याच्या सेवकाला “समुद्राकडे दृष्टी” लावण्यास सांगितले. त्याच्या सेवकाने जेव्हा त्याला, “समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे” असे दिसत असल्याचे सांगितले तेव्हा, आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळाल्याची जाणीव एलियाला झाली. त्यानंतर लगेचच, “मेघ व तुफान याहीकरून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला.” (१ राजे १८:४३-४५) अशा प्रकारे एलियाने, त्याला जलचक्राचे ज्ञान आहे हे दाखवून दिले. त्याला माहीत होते, की समुद्रावर ढग तयार होतात व वाऱ्यामुळे हे ढग वचनयुक्त देशावरून पूर्वेकडे वाहत जातात व त्यामुळे तेथे पाऊस पडतो. आजही, तेथे अशाच प्रकारे पाऊस पडतो.
एलियाने पावसासाठी प्रार्थना केल्याच्या सुमारे शंभर आमोस ५:६, ८) आमोसने नंतर जलचक्राच्या या अद्भुत वस्तुस्थितीविषयी व हे चक्र कसे फिरते त्याविषयी पुन्हा एकवार बोलून दाखवले. (आमोस ९:६) अशा प्रकारे आमोसने दाखवून दिले, की पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाचे मुख्य स्रोत महासागरे आहेत.
वर्षांनंतर, आमोस नावाच्या एका गरीब शेतकऱ्याने, जलचक्राच्या स्रोताची एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. इस्राएल लोक गरिबांवर जुलूम करत होते व खोट्या दैवतांच्या नादी लागले होते. त्यामुळे त्यांना ताकीद देण्याकरता देवाने आमोसचा उपयोग केला. देवाच्या हातात सापडू नये म्हणून आमोसने लोकांना, “परमेश्वरास शरण जा, म्हणजे वाचाल” असे आर्जवले. त्याने त्यांना असे सांगितले, की त्यांनी फक्त यहोवाचीच उपासना केली पाहिजे, कारण तो निर्माणकर्ता आहे व तोच “समुद्राच्या जलास बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओतितो.” (एडमंड हॅले यांनी १६८७ साली ही वस्तुस्थिती वैज्ञानिकरीत्या खरी असल्याचे सिद्ध केले. पण हॅलेंचे म्हणणे इतरांनी लगेचच मान्य केले नाही. “पृथ्वीच्या आत एक चक्र आहे ज्यात समुद्राचे पाणी डोंगरमाथ्यांवर नेले जाते व तेथून सोडले जाते, ही संकल्पना १८ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत लोक मानत असत,” असे एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका ऑनलाईन यात म्हटले आहे. आज, जलचक्रात पाणी कसे फिरते ते सर्वांना माहीत आहे. याच पुस्तकात पुढे असे म्हटले आहे: “समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते, ते वातावरणात गोठले जाते, नंतर पृथ्वीवर त्याची पर्जन्यवृष्टी होऊन नद्यांतून वाहत जाऊन पुन्हा समुद्राला मिळते.” तेव्हा, उपदेशक १:७ मध्ये जलचक्राविषयी शलमोनाने लिहिलेले शब्द याच प्रक्रियेला लागू होतात.
ही माहिती तुम्हाला काय करण्यास प्रवृत्त करते?
बायबलच्या विविध लेखकांनी जलचक्राची अगदी अचूक माहिती दिली आहे. ही माहिती, बायबल हे मानवजातीचा निर्माणकर्ता यहोवा देव याचे ईश्वरप्रेरित वचन असल्याचा इतर अनेक उल्लेखनीय पुराव्यांपैकी एक पुरावा आहे. (२ तीमथ्य ३:१६) हे खरे आहे, की मानवाने पृथ्वीच्या कार्यात ढवळाढवळ केल्यामुळे, हवामानाचे संतुलन पूर्णपणे बिघडून गेले आहे. त्यामुळेच, काही भागात पूर येतात तर काही भागात पावसाचा एक थेंब नसतो. पण जलचक्राचा निर्माणकर्ता यहोवा देव याने फार पूर्वी असे वचन दिले होते, की तो फार काळ ही नासधूस चालू देणार नाही तर लवकरच “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करेल.—प्रकटीकरण ११:१८.
पण असे होईपर्यंत देवाने दिलेल्या पावसाच्या देणगीबद्दल तुम्ही कदर कशी दाखवू शकता? त्याचे वचन बायबल याचा अभ्यास करून व शिकलेल्या गोष्टींचे आपल्या जीवनात अवलंबन करून तुम्ही ही कदर दाखवू शकता. असे केले तरच तुम्हाला, देवाच्या नवीन जगात अनंतकाळ जगण्याची आशा मिळू शकेल. या जगात तुम्हाला देवाच्या इतर सर्व देणग्यांचा पुरेपूर उपभोग घेता येईल. कारण, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” पावसाचा उगम असलेल्या यहोवा देवाकडून येते.—याकोब १:१७. (w०९ १/१)
[१६, १७ पानांवरील रेखाचित्र/चित्र]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
← ←
संद्रवण ←↓ ↑ ↑
पर्जन्य वनस्पती बाष्पीत्सर्जन बाष्पीभवन
↓ पाणलोट ↑
भूमिजल ↓
↓ → →
[२६ पानांवरील चित्रे]
एलिया प्रार्थना करत असतानाच त्याच्या सेवकाने “समुद्राकडे दृष्टी” लावली