देवाला माझी काळजी आहे का?
देवाला माझी काळजी आहे का?
लोक देत असलेली सर्वसामान्य उत्तरे:
▪ “माझ्या समस्यांचा विचार करायला देवाजवळ वेळ आहे का?”
▪ “मला नाही वाटत त्याला माझी काळजी आहे.”
येशूने काय म्हटले?
▪ “पाच चिमण्या दोन दमड्यांस विकतात की नाही? तरी त्यांपैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसहि मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” (लूक १२:६, ७) देवाला आपली काळजी आहे, असे येशूने शिकवले.
▪ “काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, असे म्हणत चिंता करीत बसू नका. कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” (मत्तय ६:३१, ३२) देवाला आपल्या गरजा ठाऊक आहेत, याची येशूला खातरी होती.
देवाला आपली काळजी असल्याचे बायबल खात्रीने सांगते. (स्तोत्र ५५:२२; १ पेत्र ५:७) जर देवाला आपली काळजी आहे तर मग आज आपल्याला इतके दुःख का सहन करावे लागते? देव जर प्रेमळ आणि सर्वशक्तिमान आहे तर दुःख काढून टाकण्यासाठी तो काही पावले का उचलत नाही?
या प्रश्नाच्या उत्तरात एक वस्तुस्थिती दडलेली आहे जी बहुतेक लोकांना माहीत नाही. ती वस्तुस्थिती म्हणजे, या दुष्ट जगावर दियाबल सैतानाचे राज्य आहे. येशूची परीक्षा घेताना सैतानाने त्याला जगातील सर्व राज्ये देऊ करत असे म्हटले: “ह्यावरचा सर्व अधिकार व ह्याचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो.”—लूक ४:५-७.
पण सैतानाला या जगाचा शासक कोणी बनवले? आदाम व हव्वा या आपल्या पहिल्या पालकांनी देवाकडे पाठ फिरवून सैतानाचे ऐकले व त्यांच्या या कार्यातून सैतानाला आपला शासक म्हणून निवडल्याचे दिसून आले. या बंडाळीनंतर यहोवा देवाने सैतानाला शासन करू दिले. दिलेल्या या वेळेतून सैतानाचे शासन ठार अपयशी झाल्याचे दिसून येते. लोकांनी आपली उपासना करावी म्हणून यहोवा त्यांना कधीही जबरदस्ती करत नाही पण त्याला जाणून घेण्याची संधी मात्र तो सर्वांना देतो.—रोमकर ५:१०.
देवाला आपली काळजी असल्यामुळेच तर त्याने सैतानाच्या शासनातून आपली सुटका करण्यासाठी येशूची व्यवस्था केली. लवकरच येशू ‘मरणावर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाला शून्यवत,’ करणार आहे. (इब्री लोकांस २:१४) असे करून तो “सैतानाची कृत्ये नष्ट” करणार आहे.—१ योहान ३:८.
पृथ्वीचे पुन्हा नंदनवन होणार आहे. तेव्हा देव “[लोकांच्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या [असतील].”—प्रकटीकरण २१:४, ५. * (w०९ २/१)
[तळटीप]
^ देव दुःख काढून का टाकत नाही याच्या अधिक माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.
[८ पानांवरील संक्षिप्त आशय]
पृथ्वीचे पुन्हा नंदनवन होणार आहे