व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक सर्वसामान्य शिकवण

एक सर्वसामान्य शिकवण

एक सर्वसामान्य शिकवण

“मला एका धगधगत्या ठिकाणी फेकण्यात येतं आणि मी नरकात जळतेय, अशी भयानक स्वप्नं मला रात्रीची पडायचीत. त्यामुळे, माझ्या हातून काही पाप-बीप घडू नये म्हणून मी खूप काळजी घ्यायचे.”—ऑर्लिन.

पापकृत्यांचा भोग भोगावा लागतो असे विशेष स्थान म्हणजे नरक, असा तुम्ही देखील विश्‍वास करता का? पुष्कळ लोक करतात. उदाहरणार्थ, २००५ साली स्कॉटलंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रूज येथील धर्माच्या एका प्राध्यापकांनी एक सर्व्हे घेतला. देवापासून विभक्‍त झालेले पापी लोक “नरकात चिरकालासाठी मानसिक भोग भोगतील,” असा एक तृतीयांश स्कॉटीश पाळक विश्‍वास करतात आणि नरकात असलेल्यांना शारीरिक यातना भोगाव्या लागतात, असा एक पंचमांश पाळक विश्‍वास करतात, असे त्यांना दिसून आले.

अनेक देशात, नरकाची शिकवण सर्वसामान्य आहे. उदाहरणार्थ, संयुक्‍त संस्थानांत २००७ साली घेण्यात आलेल्या एका गॅलप लोकमतात, सुमारे ७० टक्के लोकांनी नरक आहे, असे म्हटले. धर्मनिरपेक्ष म्हटल्या जाणाऱ्‍या राष्ट्रांतील बहुतेक लोकांनीसुद्धा नरकावर विश्‍वास असल्याचे म्हटले. सन २००४ मध्ये घेण्यात आलेल्या एका गॅलप लोकमतात असे दिसून आले, की कॅनडात ४२ टक्के लोकांनी नरक आहे, असा विश्‍वास व्यक्‍त केला. आणि ग्रेट ब्रिटनमध्ये ३२ टक्के लोकांना तर नरक नक्की आहे, असा पक्का विश्‍वास होता.

पाळकांची शिकवण

पुष्कळ पाळकांनी, नरक हे ठिकाण, खरोखरच यातना देणारे ठिकाण आहे अशी शिकवण देण्याचे सोडून दिले आहे. त्याऐवजी ते, १९९४ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या कॅटकिझम ऑफ द कॅथलिक चर्च या पुस्तकात व्यक्‍त करण्यात आलेल्या विचारानुसार नरकाची शिकवण देतात. “नरकातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे, परमेश्‍वरापासून कायमचे विभक्‍त होणे,” असे त्या पुस्तकात म्हटले आहे.

तरीसुद्धा, पुष्कळ लोक अजूनही असाच विश्‍वास करतात, की नरक हे मानसिक किंवा शारीरिक यातना देणारे ठिकाण आहे. या शिकवणीचे समर्थन करणारे असा दावा करतात, की बायबलच अशी शिकवण देते. सदर्न बॅप्टिस्ट थिओलॉजिकल सेमिनरीचे अध्यक्ष, श्री. आर. अल्बर्ट मोलर आपला विश्‍वास स्पष्ट शब्दांत मांडतात. ते म्हणतात की “ही शिकवण पूर्णतः शास्त्रवचनांवर आधारित आहे.”

तुम्ही काय विश्‍वास करता हे महत्त्वाचे का आहे?

नरक खरोखरच एक यातना देणारे ठिकाण असेल तर आपण जरूर त्याची भीती बाळगली पाहिजे. पण जर ही शिकवण खोटी आहे तर मग, ही शिकवण देणारे धार्मिक पुढारी लोकांच्या मनात गोंधळ माजवत आहेत व नको तो मानसिक त्रास उत्पन्‍न करत आहेत. ते देवाचेही नाव खराब करत आहेत.

देवाचे वचन बायबल याविषयावर काय शिकवण देते? पुढील लेखांत, द कॅथलिक मराठी बायबल समितीने प्रकाशित केलेले मराठी कॉमन लँग्वेज या बायबल भाषांतराचा उपयोग करून, (१) मेल्यानंतर माणसाचे काय होते? (२) नरकाविषयी येशूने काय शिकवण दिली? (३) नरकाविषयीचे सत्य माहीत झाल्यावर तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? या तीन प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली आहेत. (w०८ ११/१)