आजचे कठीण दिवस
आजचे कठीण दिवस
मानवजातीवर ‘कठीण दिवस’ येतील असे बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते. या कठीण काळाला बायबलमध्ये ‘शेवटला काळ’ म्हटले आहे. (२ तीमथ्य ३:१-५; २ पेत्र ३:३-७) येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी त्याला ‘युगाच्या समाप्तीविषयी’ एक प्रश्न विचारला, तेव्हा त्याने देखील या शेवटल्या कठीण दिवसांविषयी सांगितले. (मत्तय २४:३) आज आपण त्या शेवटल्या काळात राहात आहोत का? बायबलमध्ये जे भाकीत करण्यात आले होते त्याची अलीकडील वृत्तांशी तुलना करून पाहा आणि मग स्वतःच ठरवा.
बायबलमध्ये काय भाकीत करण्यात आले होते?: जागतिक पातळीवर युद्धे—लूक२१:१०;प्रकटीकरण ६:४.
अलीकडील वृत्ते काय दाखवतात?: ख्रिस्ताच्या जन्मापासून आतापर्यंतच्या तब्बल १९०० वर्षांच्या तुलनेत, मागील
१०० वर्षांत युद्धांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या तिप्पट होती.—वर्ल्डवॉच इंस्टिट्यूट.बायबलमध्ये काय भाकीत करण्यात आले होते?: अन्नटंचाई व रोगराई—लूक २१:११; प्रकटीकरण ६:५-८.
अलीकडील वृत्ते काय दाखवतात?: २००४ साली पृथ्वीवरील अंदाजे ८६ कोटी ३० लाख लोक कुपोषित होते. सन २००३ च्या तुलनेत या संख्येत ७० लाख लोकांची भर पडल्याचे दिसून आले.—संयुक्त राष्ट्रसंघाची अन्न व कृषी संघटना.
जवळजवळ १०० कोटी लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात; २६० कोटी लोकांना सांडपाणी वाहून नेण्याची सोय उपलब्ध नाही; ११० कोटी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही.—वर्ल्डवॉच इंस्टिट्यूट.
२००५ साली ५० कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली; ४ कोटी लोक एचआयव्ही-एड्सने ग्रस्त होते; टीबीने १६ लाख लोकांचा बळी घेतला.—जागतिक आरोग्य संघटना.
बायबलमध्ये काय भाकीत करण्यात आले होते?: पृथ्वीचा दुर्दशा—प्रकटीकरण ११:१८.
अलीकडील वृत्ते काय दाखवतात?: “मानवी कार्यहालचालींमुळे आज अनेक प्रकारचे प्राणी व वनस्पती नामशेष होण्याच्या बेतात आहेत.” “मानवाला ज्यांपासून फायदा होतो अशा निम्म्याअधिक नैसर्गिक गोष्टींचा जगभरात ऱ्हास होताना दिसत आहे.”—मिलेनियम ईकोसिस्टम असेसमेंट.
“मानवनिर्मित हरितगृह वायूंनी वातावरणातील व हवामानातील संतुलन इतके बिघडवून टाकले आहे की पृथ्वीवर मानवांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.”—नासा, गॉडार्ड इंस्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीज.
बायबलमध्ये काय भाकीत करण्यात आले होते?: देवाच्या राज्याची सुवार्ता सबंध पृथ्वीवर घोषित केली जाईल—मत्तय २४:१४; प्रकटीकरण १४:६, ७.
अलीकडील वृत्ते काय दाखवतात?: २००७ सालादरम्यान ६९,५७,८५४ यहोवाच्या साक्षीदारांनी, २३६ देशांत देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात १४० कोटी पेक्षा जास्त तास खर्च केले.—२००८ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक.
वर सांगितल्यानुसार, बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले की अनेक दुःखदायक घडामोडी घडत असूनही आपण आशावादी राहू शकतो. येशूने देवाच्या राज्याच्या ‘सुवार्तेबद्दल’ म्हणजेच आनंदाच्या बातमीबद्दल सांगितले. पण देवाचे राज्य काय आहे? मानवजातीला चांगले भविष्य मिळू शकेल अशी आशा बाळगण्याशी त्याचा काय संबंध आहे? आणि देवाच्या राज्याचा तुमच्या जीवनाशी काय संबंध आहे? (w०८ ८/१)
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
आजच्या काळातील घडामोडींविषयी बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते