तुम्हाला आठवते का?
तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• खरे ख्रिस्ती, देवाच्या नावात चमत्कारिक शक्ती आहे असे मानून त्याचा उपयोग करतात का?
एखाद्या वस्तूत किंवा चिन्हात आपले संरक्षण करण्याची चमत्कारिक शक्ती आहे या दृष्टिकोनातून काही लोक त्याकडे पाहतात. पण, देवाच्या नावात अशा प्रकारची शक्ती आहे असे देवाचे लोक मानत नाहीत. ते यहोवावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात व अशा प्रकारे ते त्याच्या नावात आश्रय घेतात. (सफ. ३:१२, १३)—१/१५, पृष्ठे ५-६.
• यहोवाने शौल राजाचा त्याग का केला?
देवाचा संदेष्टा येऊन बलिदान अर्पण करेपर्यंत शौल राजाला थांबायचे होते, पण त्याने आज्ञेचे उल्लंघन करून स्वतःच बलिदान अर्पण केले. नंतर, देवाने त्याला शत्रूंचा नाश करण्याची आज्ञा दिली होती; त्या आज्ञेचे त्याने पालन केले नाही.—२/१५, पृष्ठे २२-२३.
• आपण स्वैराचाराचा द्वेष करतो हे आपण कसे दाखवू शकतो?
मद्याचा दुरुपयोग न करण्याद्वारे, भूतविद्येत भाग न घेण्याद्वारे, आणि अनैतिकतेबद्दल येशूने दिलेल्या इशाऱ्याचे पालन करण्याद्वारे आपण हे दाखवू शकतो. उदाहरणार्थ, आपण पोर्नोग्राफी पाहण्याचे आणि अनैतिक गोष्टींचे स्वप्नरंजन टाळू. (मत्त. ५:२७, २८) तसेच, आपण बहिष्कृत लोकांशीदेखील सहवास करणार नाही.—२/१५, पृष्ठे २९-३२.
• कशा प्रकारे यिर्मया, ‘जलाशयाजवळ लाविलेल्या वृक्षासारखा’ होता ज्याची ‘मुळे नदी किनारी पसरतात’? (यिर्म. १७:७, ८)
यिर्मयाने कधीही फळ देण्याचे सोडले नाही; आणि त्याने कधीही आपली थट्टा करणाऱ्या लोकांचा स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. त्या उलट, तो जीवनदायी पाण्याच्या स्रोताला जडून राहिला व देवाने त्याला जे काही सांगितले होते त्याचे त्याने पालन केले.—३/१५, पृष्ठ १४.