व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘आम्हाला आणखी सांग!’

‘आम्हाला आणखी सांग!’

‘आम्हाला आणखी सांग!’

रशियातील निझलोबन्या शहरातील एका उच्च शाळेतल्या वाङमय वर्गात, मिखायल बुलगाकफ या रशियन लेखकाच्या पुस्तकांवर चर्चा चालली होती. या पुस्तकांपैकी एक कांदबरी होती जिच्यात येशू ख्रिस्ताचे अतिशय अपमानास्पदरीत्या वर्णन करण्यात आले होते; पण सैतानाचे मात्र नायक म्हणून वर्णन करण्यात आले होते. चर्चेनंतर, शिक्षिकेने वर्गाला या कांदबरीवर आधारित एक लेखी परीक्षा दिली. पण, विद्यार्थ्यांपैकी एक १६ वर्षीय यहोवाचा साक्षीदार ज्याचे नाव ॲन्ड्रे होते त्याने आदरपूर्वक शिक्षिकेला सांगितले की तो ही परीक्षा देऊ शकणार नाही कारण त्याचा विवेक त्याला अशाप्रकारच्या साहित्याचा अभ्यास करण्याची अनुमती देत नाही. पण त्याऐवजी तो, येशू ख्रिस्ताविषयी त्याचा काय दृष्टिकोन आहे त्याचे वर्णन करणारा एक निबंध लिहू इच्छितो, असे त्याने शिक्षिकेला सांगितले. शिक्षिकेने त्याला परवानगी दिली.

या निबंधात ॲन्ड्रेने स्पष्टीकरण दिले, की तो इतरांच्या मतांचा आदर करत असला तरी, येशूविषयी शिकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे चार शुभवर्तमानांपैकी कोणताही एक शुभवर्तमान अहवाल वाचणे. असे केल्याने, तुम्ही “येशूला प्रत्यक्ष पाहणाऱ्‍यांनी लिहिलेल्या अहवालांच्या आधारावर त्याच्या जीवनाविषयी व शिकवणींविषयी आणखी शिकू शकाल.” ॲन्ड्रेने पुढे म्हटले: “आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे या कादंबरीत सैतानाचे दिलेले वर्णन. सैतानाला नायक म्हणून सादर करणारे पुस्तक काहींना मनोरंजक वाटेल, पण मला तसे वाटत नाही.” सैतान वास्तविकतेत एक शक्‍तिशाली दुष्ट आत्मिक प्राणी आहे जो देवाच्या विरुद्ध झाला आहे व त्यानेच मानवजातीवर दुष्टाई, पीडा, दुःख आणले आहे, असे ॲन्ड्रेने आपल्या निबंधात लिहिले. समारोपात त्याने लिहिले: “ही कादंबरी वाचल्याने मला काही फायदा होईल असे मला वाटत नाही. बुलगाकफ यांच्याबद्दल माझ्या मनात काही अढी नाही. पण तुम्ही जर मला विचाराल तर, मी म्हणेन की येशू ख्रिस्ताविषयी ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याकरता मी बायबल वाचणे पसंत करेन.”

ॲन्ड्रेच्या शिक्षिकेला त्याचा निबंध इतका आवडला, की तिने त्याला येशू ख्रिस्तावर एक तोंडी रिपोर्ट तयार करण्यास सांगितले. ॲन्ड्रे यासाठी तयार झाला. मग पुढील वाङमय वर्गात ॲन्ड्रेने संपूर्ण वर्गासमोर आपला रिपोर्ट वाचून दाखवला. येशू सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य होता, असे आपल्याला का वाटते, याचे त्याने स्पष्टीकरण दिले. मग त्याने बायबलमधील मत्तयाच्या पुस्तकातून येशूच्या मृत्यूचा अहवाल देणारा अध्याय वाचला. रिपोर्ट वाचून दाखवण्याकरता जितका वेळ त्याला दिला होता तो पूर्ण होत आल्यामुळे ॲन्ड्रेला थांबायचे होते पण त्याचे वर्गमित्र त्याला म्हणत राहिले: “आम्हाला आणखी सांग ना! पुढे काय झाले?” तेव्हा ॲन्ड्रेने मत्तयाच्या अहवालातून येशूच्या पुनरुत्थानाविषयी वाचून दाखवले.

ॲन्ड्रेचे वाचून झाल्यावर त्याच्या वर्गमित्रांनी त्याला येशू आणि यहोवा यांच्याविषयी खूप प्रश्‍न विचारले. ॲन्ड्रे म्हणतो: “मी यहोवाला मला बुद्धी दे म्हणून प्रार्थना केली होती. आणि यहोवाने माझी प्रार्थना ऐकली. मी त्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकलो.” वर्गानंतर ॲन्ड्रेने आपल्या शिक्षिकेला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य * पुस्तक दिले. तिने ते आनंदाने स्वीकारले. ॲन्ड्रे म्हणाला: “शिक्षिकेने मला माझ्या रिपोर्टबद्दल उच्च मार्क दिले व माझीही काही मते आहे व ती व्यक्‍त करायला मी लाजलो नाही, म्हणून तिने माझी प्रशंसा केली. तिने असेही म्हटले, की माझे काही धार्मिक विश्‍वास तिलाही पटले.”

ॲन्ड्रेला, यहोवा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांचा अनादर करणारे साहित्य न वाचण्याद्वारे आपल्या बायबल प्रशिक्षित विवेकाचे ऐकण्याचे ठरवल्याबद्दल आनंद वाटतो. यामुळे त्याचे फक्‍त अशास्त्रवचनीय दृष्टिकोनांपासून संरक्षण झाले नाही तर इतरांना महत्त्वपूर्ण बायबल सत्ये सांगण्याची सुसंधी देखील खुली झाली. (w०६ ३/१)

[तळटीप]

^ परि. 5 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.