अजूनही देवाचा ताबा आहे का?
तुमचे स्वागत आहे. . .
अजूनही देवाचा ताबा आहे का?
नैसर्गिक आपत्ती, घातक आजार, वरच्या श्रेणीतील लोकांमधील भ्रष्टाचार, दहशतवाद्यांचे हल्ले, युद्धे, गुन्हेगारी. वरीलपैकी कोणती एक बातमी आपण ऐकली नाही असा एकही दिवस जात नाही. अशा गोष्टींचा व्यक्तिशः तुमच्यावर परिणाम झाला असेल अथवा नसेल, पण हे जग कुठे चालले आहे आणि या जगाची परिस्थिती कधी सुधारेल का हा प्रश्न मात्र सर्वांच्या मनात येतो.
संपूर्ण जगभरात २०० पेक्षा अधिक देशांतील यहोवाचे साक्षीदार “अजूनही देवाचा ताबा आहे का?” हे समयोचित भाषण सादर करणार आहेत. आपल्या खात्रीलायक वचनात अर्थात बायबलमध्ये देव खाली दिलेल्या प्रश्नांविषयी काय म्हणतो व कोणते अभिवचन देतो त्याची चर्चा या भाषणात केली जाईल. जसे की:
पृथ्वीवर चाललेल्या घडामोडींमध्ये देवाला काही स्वारस्य आहे का?
मानवजातीबद्दल त्याला काय वाटते?
तुमच्या कल्याणाविषयी त्याला चिंता आहे का?
बहुतेक ठिकाणी, हे भाषण रविवार, एप्रिल ३०, २००६ रोजी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात दिले जाईल. तुमच्या क्षेत्रातील साक्षीदारांना तुम्हाला राज्य सभागृहाचा वेळ आणि पत्ता सांगायला आनंद वाटेल.
या उत्तेजनदायक मोफत बायबल आधारित जाहीर भाषणाला उपस्थित राहण्याचे आम्ही आपल्याला आमंत्रण देत आहोत. अजूनही देवाचा ताबा आहे का? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तुम्हाला या भाषणात मिळेल. (w०६ ४/१)