चिरकालिक जीवन निवडा
चिरकालिक जीवन निवडा
आज लोकांसमोर जितक्या आवडी-निवडी आहेत तितक्या पूर्वी कधी कोणाकडे कदाचित नसतील. जसे की, कोणत्या प्रकारचा पेहराव करावा, काय खावे, कोणते काम करावे, कोठे राहावे हे सहसा लोक आपल्या आवडी-निवडींनुसार ठरवतात. जगातील अनेक भागांत, विवाह सोबती निवडणे देखील एक सामान्य प्रथा आहे. परंतु बायबलमध्ये एका अशा निवडीविषयी सांगितले आहे जी इतर सर्व आवडी-निवडींपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे—एक अशी निवड जी प्रत्येक मानवाला करता येते.
बायबल म्हणते: “ज्याच्या ठायी अढळ नीति असते त्याला जीवन प्राप्त होते; जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्यु आणितो.” (नीतिसूत्रे ११:१९) आणि येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
होय, आपल्या निर्माणकर्त्याने आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे मार्गाक्रमण निवडण्याची एक संधी दिली आहे! सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल?
बायबल म्हणते: “न्याय्यत्वाच्या मार्गांत जीवन आहे.” (नीतिसूत्रे १२:२८) सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर असलेल्या न्यायी अथवा धार्मिक लोकांपैकी आपण एक असू शकतो. ते कसे? आपले जीवन देवाच्या इच्छेच्या व त्याच्या आज्ञांच्या एकमतात आहे की नाही याची खात्री करण्याद्वारे. (मत्तय ७:१३, १४) तेव्हा आपण उचित निवड करून सार्वकालिक जीवनाचे देवाकडून मिळणारे बक्षीस प्राप्त करू या.—रोमकर ६:२३.