व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला देवाला काय विचारायला आवडेल?

तुम्हाला देवाला काय विचारायला आवडेल?

तुम्हाला देवाला काय विचारायला आवडेल?

जगभरात अनेक लोकांच्या मनात जीवनाविषयी गंभीर प्रश्‍न येतात. तुमच्या मनात असेच प्रश्‍न येतात का? अनेकांनी आपले हे प्रश्‍न धार्मिक गुरूंसमोर मांडले आहेत पण त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. इतरांनी स्वतःच या प्रश्‍नांवर मनन केले आहे. काहींनी मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आहे. तुम्हाला गोंधळविणाऱ्‍या गोष्टींबाबत देवाकडून उत्तरे मिळवणे शक्य आहे का? आपल्याला संधी मिळाल्यास पुढील प्रश्‍न देवाला विचारायला आवडतील असे अनेकांनी म्हटले आहे.

देवा, तू आहेस तरी कोण?

मानवांचा देवाबद्दलचा दृष्टिकोन त्यांची संस्कृती, त्यांच्या आईवडिलांचा धर्म आणि त्यांची स्वतःची निवड यांनी प्रभावित झाला आहे. काही लोक देवाला नावाने बोलवतात; काहीजण त्याला फक्‍त देव असे संबोधतात. याने खरोखर काही फरक पडतो का? असा एकच खरा देव आहे का जो स्वतःविषयी व त्याच्या नावाविषयी आपल्याला सांगतो?

आज इतके दुःख का आहे?

एखाद्या व्यक्‍तीच्या निष्काळजीपणामुळे किंवा अनैतिक जीवनशैलीमुळे त्याची प्रकृती बिघडल्यास किंवा त्याच्यावर दारिद्र्‌य ओढवल्यास तो तक्रार करील. पण तो दुःख का भोगत आहे हे त्याला बऱ्‍यापैकी ठाऊक असेल.

परंतु, इतर अनेक जण स्वतःची काही चूक नसतानाही पुष्कळ दुःख भोगतात. काहींना कायमचे आजारपण असते. इतरजणांना, डोक्यावर छत आणि कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी काहीतरी मिळवायला पुष्कळ संघर्ष करावा लागतो. कोट्यवधी लोकांना गुन्हेगारी, युद्ध, तारतम्यहीन हिंसा, नैसर्गिक आपत्ती किंवा अधिकाऱ्‍यांच्या हातून झालेला अन्याय सहन करावा लागतो.

साहजिकच अनेकजण विचारतात: ‘ही परिस्थिती का वाढत आहे? देव दुःखाला अनुमती का देतो?’

मी का जगत आहे? जीवनाचा काय उद्देश आहे?

ज्या व्यक्‍तीला दररोजच्या कामातून समाधान मिळत नाही अशा जीवनाला कंटाळून गेलेल्या व्यक्‍तीच्या मनात असे प्रश्‍न येत असतात—आणि ही गोष्ट बहुतेक लोकांच्या बाबतीत खरी आहे. लाखो लोकांचा असा विश्‍वास आहे की, देवाने प्रत्येक व्यक्‍तीचे जीवन पूर्व नियोजित केले आहे. हे खरे आहे का? देवाला तुमच्याविषयी काही खास उद्देश असलाच तर तुम्हाला निश्‍चितच तो जाणून घ्यावासा वाटेल.

जगातील सर्व पुस्तकांमध्ये, एक पुस्तक स्पष्टपणे म्हणते की, ते देवाकडून प्रेरित आहे. सर्व मानवजातीसाठी खरोखरच देवाकडून असलेल्या संदेशाच्या बाबतीत तुम्ही देखील अपेक्षा कराल त्याचप्रमाणे, हे पुस्तक इतर कोणत्याही पुस्तकापेक्षा सर्वाधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. ते पुस्तक म्हणजे पवित्र बायबल. त्यामध्ये, स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता, खुद्द देव, स्वतःची ओळख करून देतो आणि स्वतःचे नावही सांगतो. ते नाव तुम्हाला ठाऊक आहे का? देव कशाप्रकारची व्यक्‍ती आहे याविषयी बायबल काय म्हणते हे तुम्हाला माहीत आहे का? देव तुमच्याकडून काय अपेक्षा करतो याविषयी ते काय म्हणते हे तुम्हाला माहीत आहे का?

[२ पानांवरील चित्राचे श्रेय]

मुखपृष्ठ: Chad Ehlers/Index Stock Photography

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

पर्वत: Chad Ehlers/Index Stock Photography