“आवेशी राज्य उद्घोषक” आनंदित मनाने एकत्र जमतात
“आवेशी राज्य उद्घोषक” आनंदित मनाने एकत्र जमतात
नैतिक, आर्थिक आणि राजनैतिक संकटप्रसंगांनी जगात खळबळ माजली आहे. परंतु अशा अशांत परिस्थितीतही यहोवाचे साक्षीदार तीन दिवसांच्या “आवेशी राज्य उद्घोषक” या प्रांतीय अधिवेशनांकरता एकत्र जमले होते. मे २००२ पासून ही अधिवेशने संपूर्ण जगभरात भरवली गेली होती.
ही अधिवेशने आनंदाचे प्रसंग होते यात शंका नाही. त्यातील उभारणीकारक बायबल आधारित कार्यक्रमाची आपण संक्षिप्तरूपात उजळणी करू या.
पहिला दिवस येशूच्या आवेशावर जोर देतो
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे शीर्षक होते, “आपल्या प्रभू येशूच्या आवेशाचे अनुकरण करा.” (योहान २:१७) “राज्य उद्घोषक या नात्याने एकत्र येण्यात आनंद माना” या भाषणाने, देवाच्या लोकांच्या अधिवेशनांचे खास वैशिष्ट्य असलेल्या आनंदात सहभागी होण्यास उपस्थितांना आमंत्रण दिले. (अनुवाद १६:१५) या भाषणानंतर सुवार्तेच्या आवेशी प्रचारकांच्या मुलाखती होत्या.
“यहोवाच्या ठायी आनंद माना” या भाषणात स्तोत्र ३७:१-११ यातील प्रत्येक वचनावर चर्चा करण्यात आली. दुष्ट लोक यशस्वी ठरत आहेत असे दिसत असल्यास आपण ‘जळफळू नये’ असे आपल्याला उत्तेजन देण्यात आले. दुष्ट व्यक्ती आपल्याविषयी खोटी माहिती पसरवत असले तरी कालांतराने यहोवा स्पष्टपणे दाखवून देईल की त्याचे विश्वासू लोक कोण आहेत. “कृतज्ञ असा” या भाषणात देवाला कृतज्ञता कशी दाखवता येईल याची चर्चा करण्यात आली. सर्व ख्रिश्चनांनी यहोवाला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण केला पाहिजे. (इब्री लोकांस १३:१५) अर्थात, यहोवाच्या सेवेकरता आपण देत असलेला वेळ, आपली कृतज्ञता आणि आपली परिस्थिती यांवर अवलंबून असतो.
मुख्य भाषणाचे शीर्षक होते, “राज्य उद्घोषकांचा ज्वलंत आवेश.” त्यात, आवेशाचे सर्वात उत्तम उदाहरण मांडलेल्या येशू ख्रिस्तावर जोर देण्यात आला. १९१४ साली स्वर्गीय राज्याची स्थापना झाल्यावर, खऱ्या ख्रिश्चनांना सुवार्तेची घोषणा करण्यासाठी आवेशाची गरज होती. वक्त्याने अमेरिकेतील सिडर पॉइंट, ओहायो येथील १९२२ सालच्या अधिवेशनाला संबोधून “राजा आणि त्याच्या राज्याची घोषणा करा” या ऐतिहासिक आवाहनाची आठवण करून दिली. कालांतराने, देवाच्या विश्वासू सेवकांच्या आवेशाने त्यांना सर्व राष्ट्रांतील लोकांस राज्याची अद्भुत सत्ये घोषित करण्यास प्रेरित केले.
पहिल्या दिवशी दुपारी दिलेल्या, “यहोवा आपल्यासोबत आहे हे जाणून निडर राहा” या भाषणात दाखवण्यात आले की, देवाचे लोक सैतानाचे खास लक्ष्य आहेत. परंतु, आपल्याला कितीही विरोधाचा सामना करावा लागला तरी बायबलमधील तसेच आधुनिक विश्वासाच्या अनेक उदाहरणांचा विचार केल्याने आपल्याला निडरतेने परीक्षांना व मोहपाशांना तोंड देण्यास धैर्य मिळते.—यशया ४१:१०.
कार्यक्रमात नंतर तीन-भागांचा परिसंवाद होता, ज्याचे शीर्षक होते, “मीखाची भविष्यवाणी यहोवाच्या नामात चालत राहण्यास आपल्याला दृढ करते.” पहिल्या वक्त्याने मीखाच्या २ पेत्र ३:११, १२.
दिवसातील नैतिक ऱ्हास, धर्मत्याग आणि भौतिकवाद यांची तुलना आपल्या दिवसाशी केली. ते म्हणाले: “आपण आज्ञाधारक हृदय निर्माण केले, आपले वर्तन पवित्र राखण्याची व आपले जीवन ईश्वरी भक्तीच्या कार्यांनी भरण्याची खात्री केली व यहोवाचा दिवस अवश्य येईल हे कधीही विसरलो नाही तर भविष्याची आशा आपल्याला निश्चित प्राप्त होईल.”—परिसंवादातील दुसऱ्या वक्त्याने, मीखाने यहुदी पुढाऱ्यांची निंदा कशी केली त्याविषयी सांगितले. त्यांनी गरीब, असहाय लोकांवर अत्याचार केला. परंतु मीखाने खऱ्या उपासनेचा विजय होईल याचेही भाकीत केले होते. (मीखा ४:१-५) यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेचा हा चैतन्य देणारा संदेश घोषित करण्याचा आपला पक्का निर्धार आहे. परंतु, आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे आपण फारसे काही करू शकत नाही असे आपल्याला वाटत असल्यास काय? तिसऱ्या वक्त्याने म्हटले: “यहोवाच्या अपेक्षा वाजवी आणि साध्य करण्याजोग्या आहेत.” त्यांनी मीखा ६:८ मधील विविध पैलूंची चर्चा केली; त्या वचनात म्हटले आहे: “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्वर तुजजवळ काय मागतो?”
जगाच्या खालावलेल्या नैतिक स्तराचा ख्रिश्चनांवर परिणाम होऊ शकत असल्यामुळे, “आपल्या हृदयाचे रक्षण करून शुद्धाचरण ठेवा” या भाषणाचा सर्वांना फायदा झाला. उदाहरणार्थ, शुद्धाचरण ठेवल्याने आपल्याला आनंदी विवाहाची खात्री मिळेल. ख्रिस्ती यानात्याने, आपण लैंगिक अनैतिकतेत गुरफटण्याचा विचारही करू नये.—१ करिंथकर ६:१८.
“भुलथापांपासून सावधान” या भाषणात दाखवले की, धर्मत्यागी लोक पसरवत असलेले विपर्यास, अर्ध-सत्ये आणि उघड असत्ये विष आहेत असे मानण्यातच सुज्ञता आहे. (कलस्सैकर २:८) त्याचप्रमाणे, कसलाही दुष्परिणाम न भोगता आपण आपल्या पापी इच्छा पूर्ण करू शकतो या विचारसरणीने आपण फसवले जाऊ नये.
पहिल्या दिवसाच्या शेवटल्या भाषणाचे शीर्षक होते, “एकमेव खऱ्या देवाची उपासना करा.”
जगाची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत असता, यहोवा लवकरच आपले नीतिमान नवे जग आणील हा विचार किती सांत्वनदायक ठरतो! त्यात कोण राहतील? केवळ यहोवाची उपासना करणारे. हे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपली, आपल्या मुलांची व आपल्या बायबल विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी वक्त्याने एकमेव खऱ्या देवाची उपासना करणे या नवीन अभ्यासाच्या पुस्तकाचे अनावरण केले. याचा आपल्याला किती आनंद झाला!दुसऱ्या दिवशी, चांगल्यासाठी आवेशी असण्यावर जोर
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे शीर्षक होते, “चांगल्यासाठी आवेशी असा.” (१ पेत्र ३:१३, NW) पहिल्या वक्त्याने त्या दिवसाच्या बायबल वचनाची चर्चा केली. त्यांनी जोर देऊन सांगितले की, दैनिक वचनावर नियमित, अर्थपूर्ण विचार केल्याने आपला आवेश द्विगुणित होतो.
त्यानंतरचा परिसंवाद होता, “आपल्या सेवाकार्याचा सन्मान करणारे राज्य उद्घोषक.” पहिल्या भागात, देवाचे वचन नीट सांगणारा व्हावे यावर जोर देण्यात आला. (२ तीमथ्य २:१५) बायबलचा परिणामकारकपणे उपयोग केल्याने लोकांच्या जीवनात ते “सक्रिय” ठरेल. (इब्री लोकांस ४:१२) आपण बायबलकडे लोकांचे लक्ष वेधून खात्री पटेल अशाप्रकारे कारणमीमांसा केली पाहिजे. परिसंवादाच्या दुसऱ्या भागात, आस्थेवाईक लोकांना वारंवार पुनर्भेट देण्यास आर्जवण्यात आले. (१ करिंथकर ३:६) आस्थेचा लागलीच मागोवा घेण्याकरता तयारी आणि धैर्याची गरज आहे. तिसऱ्या भागात असा सल्ला देण्यात आला की, आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण भावी शिष्य समजावे. तसेच हे दाखवण्यात आले की, पहिल्याच भेटीत बायबल अभ्यास सादर केल्याने लोकांना शिष्य बनवण्याचा आनंद प्राप्त होऊ शकतो.
पुढच्या भाषणाचा विषय होता, “‘प्रार्थनेत तत्पर’ का असावे.” ख्रिश्चनांनी जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये देवाचे मार्गदर्शन मिळवावे असे उत्तेजन बायबलमध्ये दिले आहे. खासगी प्रार्थनेसाठी आपण वेळ काढला पाहिजे. शिवाय, आपण प्रार्थनेत तत्पर असले पाहिजे, कारण आपल्याला उत्तर देण्याआधी यहोवा काही काळापर्यंत आपल्याला प्रार्थना करू देतो.—“आध्यात्मिक संभाषण उभारणीकारक आहे” या भाषणात, आपल्या बोलण्याच्या क्षमतेचा उपयोग स्वतःच्या आणि इतरांच्या फायद्याकरता करण्याचे उत्तेजन देण्यात आले. (फिलिप्पैकर ४:८) विवाहसोबती आणि मुलांना दररोज आध्यात्मिक संभाषणाची गरज आहे. उभारणीकारक संभाषण करायला मिळावे म्हणून कुटुंबांनी दिवसातील निदान एक भोजन एकत्र करावे.
सकाळच्या कार्यक्रमाचा शेवट, “समर्पण आणि बाप्तिस्म्याने तारण प्राप्त होते” या हृदयस्पर्शी भाषणाने झाला. बाप्तिस्मा घेणाऱ्या उमेदवारांनी ज्ञान घेतले होते, विश्वास दाखवला होता, पश्चात्ताप केला होता, अपराधापासून वळाले होते आणि स्वतःला देवाला समर्पित केले होते. वक्त्याने म्हटले की बाप्तिस्मा झाल्यावरही त्यांनी आध्यात्मिकरित्या प्रगती करत राहावी आणि त्यांचा आवेश व उत्तम आचरण टिकवून ठेवावे.—फिलिप्पैकर २:१५, १६.
दुपारी, “मर्यादशील असा आणि आपला डोळा निर्दोष ठेवा” या भाषणात दोन मुद्दे ठळक मांडण्यात आले. मर्यादशील असण्याचा अर्थ, आपल्या मर्यादांविषयी आणि देवासमोरील आपल्या स्थानाविषयी वास्तविक दृष्टिकोन बाळगणे. मर्यादशीलता आपल्याला निर्दोष डोळा राखण्यास, अर्थात भौतिक गोष्टींवर नव्हे तर देवाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. आपण हे केल्यास, आपल्याला चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण यहोवा आपल्या गरजा भागवेल.—मत्तय ६:२२-२४, ३३, ३४.
पुढील वक्त्याने, “संकटकाळी यहोवावर पूर्ण भरवसा” का ठेवावा ते दाखवले. व्यक्तिगत कमतरता, आर्थिक अडचणी किंवा शारीरिक समस्या अशा गोष्टींना आपण तोंड कसे देऊ शकतो? यहोवाकडे आपण व्यावहारिक बुद्धी मागू या आणि इतरांना मदत करण्याची विनंती करू या. गोंधळून जाण्याऐवजी किंवा निराश होण्याऐवजी देवाच्या वचनाचे वाचन करून आपण त्याच्यावरील आपला भरवसा दृढ बनवला पाहिजे.—रोमकर ८:३५-३९.
अधिवेशनातील शेवटल्या परिसंवादाचे शीर्षक होते, “विविध परीक्षांनी आपल्या विश्वासाचा दर्जा पारखला जातो.” पहिल्या भागात आपल्याला आठवण करून देण्यात आली की, सर्व खऱ्या ख्रिश्चनांना छळाचा सामना करावा लागतो. त्यामुळे लोकांना साक्ष मिळते, आपला विश्वास मजबूत होतो आणि देवाला आपण निष्ठावान आहोत हे दाखवण्याची संधी मिळते. आपण अनावश्यक जोखीम पत्करत नसलो तरी १ पेत्र ३:१६.
गैरशास्त्रवचनीय पद्धतींचा उपयोग करून आपण छळ टाळत नाही.—या परिसंवादातील दुसऱ्या वक्त्याने तटस्थतेसंबंधी प्रश्न हाताळले. प्रारंभिक ख्रिस्ती युद्धविरोधी मताचे नव्हते तरीपण सर्वप्रथम त्यांनी देवाला निष्ठावान राहावे हे त्यांना ठाऊक होते. त्याचप्रमाणे, यहोवाचे साक्षीदारही या तत्त्वाला जडून राहतात: “तुम्ही जगाचे नाही.” (योहान १५:१९) तटस्थतेसंबंधी परीक्षा केव्हाही येऊ शकत असल्यामुळे कुटुंबांनी या विषयावर बायबलमधील मार्गदर्शकांची उजळणी करण्यासाठी वेळ काढावा. या परिसंवादातील तिसऱ्या भाषणात दाखवण्यात आले त्याप्रमाणे, आपल्याला ठार मारणे हा सैतानाचा हेतू नसून अविश्वासू होण्याकरता आपल्यावर दबाव आणणे हा आहे. उपहास, अनैतिक गोष्टींकरता दबाव, भावनिक दुःख आणि आजारपण यांना विश्वासूपणे तोंड दिल्याने आपण यहोवाची स्तुती करतो.
“यहोवाजवळ या” हे प्रेमळ आमंत्रण, त्या दिवसाच्या शेवटल्या भाषणाचा विषय होते. यहोवाचे प्रमुख गुण समजून घेतल्याने आपण त्याच्याकडे आकर्षित होऊ. तो आपल्या अमर्याद शक्तीचा वापर करून त्याच्या लोकांना संरक्षण देतो; हे संरक्षण खासकरून आध्यात्मिक स्वरूपाचे असते. त्याचा न्याय कठोर नाही तर नैतिक कृत्ये करणाऱ्या सर्वांकरता सार्वकालिक जीवन देण्यास त्याला प्रेरित करतो. देवाने बायबलचे लिखाण करण्यासाठी अपरिपूर्ण मानवांना ज्याप्रकारे उपयोगात आणले त्यातून त्याची बुद्धी दिसून येते. त्याचा सर्वात आकर्षक गुण आहे, प्रीती ज्यामुळे प्रेरित होऊन त्याने येशू ख्रिस्ताद्वारे मानवजातीच्या तारणाची तरतूद केली. (योहान ३:१६) वक्त्याने यहोवाजवळ या ह्या नवीन पुस्तकाचे अनावरण करून समारोप केला.
तिसऱ्या दिवसाचा मुख्य विषय होता सत्कर्मे करण्यासाठी आवेशी
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे शीर्षक होते, “सत्कर्मे करण्यासाठी आवेशी असे लोक.” (तीत २:१४, NW) दैनिक वचनावर कौटुंबिक चर्चा दाखवून सकाळच्या कार्यक्रमाची चांगली सुरवात झाली. त्यानंतरचे भाषण होते, “यहोवावर तुमचा भरवसा आहे का?” राष्ट्रांनी स्वतःच्या बुद्धीवर आणि शक्तीवर अवलंबून चुकीच्या गोष्टीवर भरवसा ठेवला आहे. याच्या उलट, यहोवाचे सेवक संकटातही धैर्याने आणि आनंदाने त्याच्यावर विसंबून राहतात.—स्तोत्र ४६:१-३, ७-११.
“युवकहो—यहोवाच्या संघटनेसोबत आपले भविष्य बनवा” या भागात पुढील प्रश्न विचारण्यात आला: एका तरुणाला आपल्या जीवनाचा खरा लाभ कसा मिळू शकेल? पैशांच्या, धनसंपत्तीच्या आणि प्रसिद्धीच्या मागे लागून हे शक्य नाही. आपला निर्माणकर्ता, तरुणांना आपल्या तारुण्यातच त्याची आठवण करण्याचे प्रेमळपणे उत्तेजन देतो. आपल्या तारुण्यात ख्रिस्ती सेवेला प्राधान्य दिलेल्या काहींची वक्त्याने मुलाखत घेतली आणि त्यांचा आनंद झळकत असल्याचे दिसत होते. शिवाय, तरुणांनो—आपल्या जीवनाचे तुम्ही काय कराल? ही नवीन पत्रिका मिळणे किती फायद्याचे होते! ही पत्रिका, तरुण साक्षीदारांना यहोवाच्या संघटनेसोबत सार्वकालिक भविष्याचा पाया घालण्यात मदत करण्याकरता तयार करण्यात आली आहे.
त्यानंतर, “संकटकाळी स्थिर राहा” हे चित्तवेधक बायबल नाटक सादर करण्यात आले. त्यात, यिर्मयाच्या तरूणपणापासून जेरूसलेमच्या नाशापर्यंतच्या त्याच्या दीर्घ कारकीर्दीचे वर्णन होते ज्याविषयी त्याने आवेशाने भाकीत केले होते. आपल्या नेमणुकीकरता आपण लायक नाही असे यिर्मयाला वाटले पण विरोध असूनही त्याने ती पूर्ण केली आणि यहोवाने त्याला वाचवले.—यिर्मया १:८, १८, १९.
या नाटकानंतर “यिर्मयासारखे व्हा—देवाच्या वचनाची निडरतेने घोषणा करा” हे भाषण होते. सद्यकाळातील राज्याच्या उद्घोषकांवर सहसा खोटे आरोप लावले जातात आणि त्यांच्याविषयी द्वेषपूर्ण माहिती पसरवली जाते. (स्तोत्र १०९:१-३) परंतु यिर्मयाप्रमाणे यहोवाच्या वचनात आनंद मानून आपण निराशेचा सामना करू शकतो. आणि आपल्या विरोधात असणारे टिकाव धरणार नाहीत याची आपल्याला खात्री आहे.
“या जगाचे दृश्य बदलत आहे” हे जाहीर भाषण अगदी समयोचित होते. आपल्या काळात नाट्यमय बदल घडले आहेत. बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते की, अशा परिस्थितींव्यतिरिक्त “शांति आहे, निर्भय आहे” या घोषणेची परिणती देखील देवाच्या भयप्रेरक न्यायाच्या दिवसात होईल. (१ थेस्सलनीकाकर ५:३) तो दिवस अद्भुत बदल घडवून आणेल—युद्धे, गुन्हेगारी, हिंसा आणि रोगराईचाही अंत करील. तर मग, या व्यवस्थीकरणावर भरवसा ठेवण्याऐवजी, ईश्वरी भक्ती आचरण्याचा आणि शुद्ध वर्तणूक ठेवण्याचा हा काळ आहे.
सदर सप्ताहाच्या टेहळणी बुरूज लेखाच्या सारांशानंतर अधिवेशनातील शेवटले भाषण होते. त्याचे शीर्षक होते, “आवेशी राज्य उद्घोषक या नात्याने भरपूर सत्कृत्ये करा.” कार्यक्रमाने आपल्याला आध्यात्मिकरित्या ताजेतवाने करून यहोवावर विसंबून राहण्यास कसे उत्तेजन दिले होते याकडे वक्त्याने लक्ष वेधले. समारोपात, आपल्याला शुद्ध, प्रेमळ आणि देवाच्या राज्याचे आवेशी उद्घोषक असण्यास उत्तेजन देण्यात आले.—१ पेत्र २:१२.
नहेम्याच्या दिवसातील यहोवाच्या सेवकांची मनोवृत्ती होती त्याप्रमाणे आपणही “आवेशी राज्य उद्घोषक” या प्रांतीय अधिवेशनांमध्ये प्राप्त झालेल्या आध्यात्मिक आशीर्वादांमुळे आनंदित होऊन घरी परतलो. (नहेम्या ८:१२) या उत्तेजक अधिवेशनाने, आवेशी राज्य उद्घोषक या नात्याने चालत राहण्याकरता तुम्हाला आनंदी आणि दृढनिश्चयी बनवले नाही का?
[२३ पानांवरील चौकट/चित्र]
अभ्यासाचे नवीन साधन!
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या शेवटी, उपस्थितांना एकमेव खऱ्या देवाची उपासना करा (इंग्रजी) या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनामुळे आनंद झाला. ज्यांनी सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाचा अभ्यास पूर्ण केला आहे त्यांच्यासोबत अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक तयार करण्यात आले आहे आणि यामुळे निश्चितच ‘सार्वकालिक जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असलेल्यांचा’ विश्वास मजबूत होईल.—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW.
[चित्राचे श्रेय]
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चित्र: U.S. Navy photo
[२४ पानांवरील चौकट/चित्रे]
देवाजवळ जाण्यासाठी मदत
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटल्या वक्त्याने यहोवाजवळ या (इंग्रजी) हे नवीन पुस्तक अनावृत केले. यात चार मुख्य भाग आहेत, प्रत्येक भाग यहोवाच्या प्रमुख गुणांची चर्चा करतो—शक्ती, न्याय, बुद्धी आणि प्रीती. या पुस्तकाच्या प्रत्येक भागातील एका अध्यायात येशू ख्रिस्ताने देवाच्या गुणांना कार्यात उतरवून कशाप्रकारे जिवंत उदाहरण मांडले ते दाखवले आहे. या नवीन पुस्तकाचा मुख्य उद्देश, आपल्याला आणि आपल्या बायबल विद्यार्थ्यांना यहोवा देवासोबत निकटचा नातेसंबंध निर्माण करण्यास मदत करणे हा आहे.
[२६ पानांवरील चौकट/चित्रे]
तरुणांकरता आध्यात्मिक मार्गदर्शन
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी तरुणांनो—आपल्या जीवनाचे तुम्ही काय कराल? (इंग्रजी) या खास पत्रिकेचे प्रकाशन केले गेले. ही पत्रिका तरुण साक्षीदारांना भविष्यासंबंधी योग्य निर्णय घेण्याकरता तयार करण्यात आली असून त्यात यहोवाच्या सेवेत सार्वकालिक करियर बनवण्यासंबंधी शास्त्रवचनीय सल्ला देण्यात आला आहे.