“जेवणाची वेळ आम्हाला एकमेकांच्या जवळ आणते”
“जेवणाची वेळ आम्हाला एकमेकांच्या जवळ आणते”
तुमच्या घरी, दिवसातले एक भोजन तरी तुम्ही सर्व कुटुंब मिळून करता का? दुःखाची गोष्ट म्हणजे आजच्या धकाधकीच्या जगात अनेक कुटुंबात जेवणाची वेळ ठरवता येत नाही. पुष्कळ घरात, जो तो आपापल्या वेळेनुसार जेवतो. जेवणाच्या वेळेत फक्त शारीरिक गरजच पूर्ण होत नसते तर इतरही महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत असतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात प्रेमळ संवाद घडतो, त्यांच्यातील बंध आणखी घटट् विणले जातात.
अलगिरदास आपली पत्नी रिमा आणि आपल्या तीन मुलींसमवेत लिथुनियाच्या युरोपीय देशाच्या उत्तरेकडे राहतात. अलगिरदास म्हणतात, “मी कामाला जातो आणि मुली शाळेला जातात त्यामुळे आम्ही, रात्रीचं जेवण एकत्र करायचं ठरवलं आहे. जेवताना आम्ही सर्व जण मोकळ्या मनाने दिवसभरात झालेल्या घडामोडींविषयी बोलतो, आलेल्या समस्यांची चर्चा करतो, विचारांची देवाण-घेवाण होते, योजनांविषयी, आवडीनिवडींविषयी चर्चा होते. या वेळेत आम्ही आध्यात्मिक विषयांची देखील चर्चा करतो. एवढं मात्र खरं, की सोबत बसून जेवण केल्यामुळे आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत.”
रिमा म्हणते: “मुलींबरोबर स्वयंपाक करताना आमचं एकमेकींबरोबर हितगुज चाललेलं असतं. मुलींना स्वयंपाकघरात काम करायला आवडतं. त्याचबरोबर त्यांना पुढे उपयोगी पडतील अशी कौशल्ये शिकायला मिळतात. त्यामुळे आम्ही काम करता करता मजाही करतो.”
अलगिरदास, रिमा आणि त्यांच्या मुलींना अनेक लाभही मिळत आहेत कारण ते सर्व सोबत मिळून जेवायचा प्रयत्न करतात. तुमच्या घरात असे होत नसेल तर दिवसातून एकदा तरी, एक भोजन तुम्ही संपूर्ण कुटुंब मिळून करायचा प्रयत्न करू शकता. तुम्ही एक-पालक असला तरी, असे करायचा प्रयत्न करा. याचे प्रतिफळ, तुम्ही करत असलेल्या त्यागांपेक्षा कैकपटीने अधिक असेल. (g ११/०६)