“देवाबरोबर चाला” प्रांतीय अधिवेशनासाठी तुमचे स्वागत असो
“देवाबरोबर चाला” प्रांतीय अधिवेशनासाठी तुमचे स्वागत असो
◼ संपूर्ण जगभरातील शेकडो ठिकाणी, लाखो जण या प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहतील. शुक्रवार ते रविवार असलेल्या या तीन दिवसीय अधिवेशनांपैकी एक अधिवेशन कदाचित तुम्हाला जवळ पडणाऱ्या एखाद्या शहरात असेल.
बहुतेक ठिकाणी अधिवेशनाचा कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता एका संगीताने सुरू होईल. शुक्रवारचा विषय आहे: “हाच मार्ग आहे; याने चला.” “यहोवाकडून त्याच्या मार्गांचे शिक्षण घेण्यासाठी एकत्रित,” या स्वागतपर भाषणानंतर देवाबरोबर एकनिष्ठपणे चालणाऱ्यांच्या मुलाखती असलेला एक भाग असेल. “तुम्ही जे आहात ते सिद्ध करीत राहा,” आणि “देवाचे वचन दररोज तुम्हाला मार्ग दाखवत राहो,” या भाषणांनंतर, “संकटांनी भरलेल्या या काळात देवाबरोबर चालत राहा,” या मुख्य भाषणाने सकाळचा कार्यक्रम समाप्त होईल.
शुक्रवार दुपारच्या कार्यक्रमात, “होशेयची भविष्यवाणी आपल्याला देवाबरोबर चालत राहायला मदत करते” हा तीन भागांचा परिसंवाद असेल. त्यानंतर “‘देवाने जे जोडले आहे’ ते माणसाने तोडू नये” आणि “आपल्या पवित्र संमेलनांबद्दल आदर दाखवणे” ही भाषणे असतील. “सर्व राष्ट्रांतील लोकांसाठी सुवार्ता” हे शेवटले भाषण, सर्व भाषेच्या लोकांपर्यंत सुवार्ता घेऊन जाण्याचे उत्तेजन देईल.
“सभोवार नजर ठेवून जपून चाला” हा शनिवारचा विषय असेल. “प्रचार कार्यात पुढे जाणारे सेवक” या सकाळच्या परिसंवादात, इतर भाषा बोलणाऱ्या लोकांपर्यंत आपण कसे पोहंचू शकतो यासंबंधाने आणखी सूचना दिल्या जातील. सकाळचा कार्यक्रम “आपण दिलेल्या वचनाप्रमाणे यहोवाबरोबर चालणे,” या महत्त्वपूर्ण भाषणाने समाप्त होईल आणि त्यानंतर बाप्तिस्मा घेण्यास पात्र असलेल्यांना बाप्तिस्मा घेण्याची संधी मिळेल.
शनिवारी दुपारच्या कार्यक्रमात, “‘अडखळणास कारणीभूत’ असलेली कोणतीही गोष्ट टाळा” आणि “तजेला देणारी हितकारक कार्ये” ही भाषणे असतील. यानंतर, “यहोवा आमचा मेंढपाळ आहे,” “वेळेचा सदुपयोग करा,” आणि “दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रकाशात चालत राहणे” या प्रत्येक भाषणांत प्रोत्साहनदायक मुलाखती असतील. शनिवारचा कार्यक्रम, “‘जागृत राहा’—न्याय करण्याचा समय जवळ आला आहे,” या विचारप्रवर्तक भाषणाने समाप्त होईल.
“सत्याने चालत राहा” या रविवारच्या कार्यक्रमाच्या विषयावर “तरुणांनो—धार्मिकतेच्या मार्गावर चालत राहा” या भाषणात जोर दिला जाईल. यानंतर, प्रेषित पौलाच्या सेवेचे चित्रण करणारे व त्या काळातील वेश धारण करून सादर केलेले एक नाटक असेल. यानंतरचे भाषण, नाटकातून आपण कोणकोणते धडे शिकतो यांवर जोर देईल. दुपारच्या कार्यक्रमात, “देवाबरोबर चालल्याने आता आणि चिरकालासाठी आशीर्वाद मिळत राहतात,” हे जाहीर भाषण असेल.
तुम्हाला जवळ पडणाऱ्या अधिवेशन ठिकाणचा पत्ता मिळवण्यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहाशी संपर्क साधू शकता किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना लिहू शकता. (g०४ ६/८)