व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव किती सहनशील आहे?

देव किती सहनशील आहे?

बायबलचा दृष्टिकोन

देव किती सहनशील आहे?

‘आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्‍त करावे असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने वागवून घेतले.’—रोमकर ९:२२.

देवाने, संपूर्ण इतिहासात उघडपणे आचरली जाणारी पुष्कळ दुष्टाई सहन केली आहे. ३,००० पेक्षा अधिक वर्षांआधी ईयोबाने खेदाने म्हटले: “दुष्ट का जिवंत राहतात? ते वयोवृद्ध का होतात? ते समृद्ध का होतात? त्यांच्यासमक्ष त्यांच्याबरोबर, त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची मुलेबाळे नांदतात. त्यांची घरे सलामत व निर्भय असतात, देवाचा दंड त्यांजवर पडत नाही.” (ईयोब २१:७-९) न्यायाची प्रीती बाळगणाऱ्‍या इतर लोकांनी देखील, जसे की यिर्मयाने देखील, देव दुष्टांना कसा खपवून घेतो याबाबत आपली चिंता व्यक्‍ती केली.—यिर्मया १२:१, २.

तुम्हाला काय वाटते? देवाने दुष्टाईला अजूनपर्यंत अनुमती कशी काय दिली आहे हे पाहून तुम्हीही गोंधळून गेलात का? देवाने आता कसलाही विलंब न लावता सर्व दुष्ट लोकांना लगेच नाश करावे, असे तुम्हाला कधीतरी वाटते का? देवाच्या सहनशीलतेच्या मर्यादेविषयी आणि सहनशीलतेच्या कारणांविषयी बायबल काय म्हणते ते पाहा.

देव सहनशील का आहे?

प्रथम, आपण हा प्रश्‍न पाहू की, धार्मिकतेबाबत सर्वोच्च दर्जे बाळगणारा देव दुष्टाई सहनच कशी करतो? (अनुवाद ३२:४; हबक्कूक १:१३) म्हणजे तो दुष्टाईला सूट देतो का? मुळीच नाही! पुढील उदाहरणाचा विचार करा: समजा, एका इस्पितळात एक असा सर्जन आहे जो स्वच्छतेबद्दलच्या सर्व तत्त्वांचे उल्लंघन करतो आणि त्याचे उपचार फार वेदनादायक असतात. तो कोणत्याही इस्पितळात काम करत असेल तर त्याला त्वरित काढले जाणार नाही का? पण काही परिस्थितीत मात्र, इस्पितळाला असामान्य सहनशीलता दाखवावी लागेल. अतिशय तातडीच्या प्रसंगी, जसे की एखाद्या रणभूमीवर एक सर्जन, अत्याधुनिक नसलेल्या व घातक परिस्थितींत तसेच हलक्या समजल्या जाणाऱ्‍या उपकरणांचा व शस्त्रक्रियेच्या साधनांचा उपयोग करत असला तरीही त्याच्याकडून उपचार करून घेणे आवश्‍यक नसते का?

त्याचप्रकारे, देव आज अशा पुष्कळ गोष्टी सहन करतो ज्या त्याला पूर्णपणे अस्वीकार्य आहेत. त्याला दुष्टाईचा वीट असला तरीसद्धा तो तात्पुरत्या काळासाठी तिला अनुमती देत आहे. असे करण्यामागे त्याच्याकडे सबळ कारणे आहेत. एक कारण म्हणजे, दुष्टाईला अनुमती दिल्यामुळे एदेन बागेत सैतानाच्या बंडाळीमुळे उपस्थित झालेले महत्त्वपूर्ण वादविषय कायमचे सोडवण्यासाठी वेळ मिळतो. शासन करण्याची देवाची पद्धत आणि त्याचा अधिकार योग्य आहेत की नाही याजशी या वादविषयांचा संबंध आहे. शिवाय, देवाच्या सहनशीलतेमुळेच तर दुष्टपणा करणाऱ्‍यांना आपले जीवन सुधारण्यासाठी वेळ आणि संधी मिळते.

दयाळू व सहनशील देव

आपले पहिले आईवडील, आदाम आणि हव्वा यांनी सैतानाबरोबर देवाच्या विरुद्ध बंड केले. आदाम आणि हव्वेला तिथल्या तिथेच नाश करण्याचा देवाला हक्क होता. तरीपण त्याने त्यांना दया व सहनशीलता दाखवून, प्रेमळपणे त्यांना मुले होऊ दिली. परंतु, त्यांच्याद्वारे आलेल्या या मुलांचा आणि संपूर्ण मानवजातीचा पापी अवस्थेतच जन्म झाला.—रोमकर ५:१२; ८:२०-२२.

मानवाला त्याच्या दयनीय स्थितीतून वाचवण्याचा देवाचा उद्देश आहे. (उत्पत्ति ३:१५) परंतु, त्याचा हा उद्देश पूर्ण करण्याच्या कालावधीत, तो विपुल प्रमाणावर सहनशीलता व दया दाखवतो कारण आदामाकडून वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेचा आपल्यावर किती वाईट परिणाम झाला आहे याची त्याला जाणीव आहे. (स्तोत्र ५१:५; १०३:१३) तो “विपुल दया करणारा” आहे; व आपल्याला “भरपूर क्षमा” करण्यास तो तयार आहे आणि इच्छुकही आहे.—स्तोत्र ८६:५, १५; यशया ५५:६, ७.

देवाच्या सहनशीलतेची मर्यादा

पण, दुष्टाईला कायमचे राहू दिल्याने देव प्रेमळ आणि न्यायी देखील ठरणार नाही. कुटुंबातील एक मूल जर इतर सदस्यांना मुद्दामहून त्रास देत असेल तर कोणताही प्रेमळ पिता त्या मुलाचे वागणे नेहमीसाठी सहन करणार नाही. त्यामुळे पाप सहन करण्यासोबत देव नेहमी त्याचे इतरही गुण, जसे की प्रेम, बुद्धी व न्याय हे दाखवत राहतो. (निर्गम ३४:६, ७) सहनशीलता दाखवण्यामागचा त्याचा उद्देश पूर्ण झाल्याबरोबर तो दुष्टाईचा कायमचा अंत करील.—रोमकर ९:२२.

प्रेषित पौलाने हे अगदी स्पष्टपणे सूचित केले. त्याने एके प्रसंगी म्हटले: “[देवाने] गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपआपल्या मार्गांनी चालू दिले.” (प्रेषितांची कृत्ये १४:१६) देवाच्या नियमांचे व तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्‍या लोकांच्या बाबतीत “अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक” कशी केली याविषयी दुसऱ्‍या एका प्रसंगी पौल बोलला. पुढे तो म्हणाला: “परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी [देव] माणसांना आज्ञा करितो.” का बरे? कारण “त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.”—प्रेषितांची कृत्ये १७:३०, ३१.

देव सहनशीलता दाखवतो तोवर लाभ मिळवा

या कारणास्तव, कोणीही असा ग्रह करून घेऊ नये, की तो देवाच्या नियमांचे उल्लंघन करू शकतो आणि होणाऱ्‍या परिणामांपासून त्याला बचाव हवा असतो तेव्हा देवाकडे क्षमायाचना करू शकतो. (यहोशवा २४:१९) आपण असे करू शकतो असे प्राचीन इस्राएलमधील अनेक लोकांना वाटले होते. ते त्यांच्या पापी मार्गाक्रमणापासून मागे फिरत नव्हते. देव दाखवत असलेल्या सहनशीलतेचा व धीराचा त्यांनी चुकीचा अर्थ घेतला होता. परंतु देवाने त्यांची दुष्टाई कायम सहन केली नाही.—यशया १:१६-२०.

बायबल दाखवते, की देवाच्या शेवटच्या न्यायदंडापासून जो आपला जीव वाचवू इच्छितो त्याने “पश्‍चात्ताप” करण्याची गरज आहे; म्हणजे, देवासमोरील आपली अपरिपूर्ण, पापी अवस्था पश्‍चात्ताप करून स्वीकारली पाहिजे आणि दुष्टाई करण्यापासून पूर्णपणे मागे फिरले पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये ३:१९-२१) मग, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवा देव त्याला क्षमा करील. (प्रेषितांची कृत्ये २:३८; इफिसकर १:६, ७) देवाच्या नियुक्‍त समयी तो आदामाच्या पापामुळे आलेल्या सर्व दुःखदायक परिणामांपासून आपली मुक्‍तता करेल. मग एक “नवे आकाश व नवी पृथ्वी” येईल जेथे ‘नाशासाठी सिद्ध झालेल्या वस्तू’ तो खपवून घेणार नाही. (प्रकटीकरण २१:१-५; रोमकर ९:२२, फिलिप्स) देवाच्या असामान्य परंतु अमर्याद नसलेल्या सहनशीलतेचा किती हा अद्‌भुत परिणाम! (g०१ १०/८)

[१७ पानांवरील चित्र]

देवाने आदाम व हव्वेला मुले होऊ दिली