‘विविधतेने नटलेल्या देशाचा’ नाट्यमय इतिहास
‘विविधतेने नटलेल्या देशाचा’ नाट्यमय इतिहास
ब्राझीलमधील सावध राहा! बातमीदाराकडून
“विविधतेने नटलेला देश.” असे ब्राझीलला म्हटले जाते ते काही उगाच नाही. ब्राझील हा उष्ण कटिबंधात येणारा देश असला तरी, या देशाच्या दक्षिणेपासूनच्या उत्तरेकडील भागांतील हवामानात विविधता आढळते. येथील रहिवासीही वेगवेगळ्या संस्कृतींचे आहेत. ब्राझीलचे क्षेत्रफळ ८५,११,९९९ चौ. किलोमीटर असून त्याला ७,४०० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. एवढेच नव्हे तर या देशाच्या इतिहासातही विविधता पाहायला मिळते.
सुमारे ५०० वर्षांपूर्वी पोर्तुगीजांनी येथे पहिले पाऊल ठेवले तेव्हा ब्राझीलमधील लोकांनी केलेला पाहुणचार पाहून ते फार खूष झाले. पेरो वाझ डी कामिन्हा या पोर्तुगीज व्यापाऱ्याने १५०० साली पोर्तुगीज राजा मॅन्युएल पहिला याला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले, की ब्राझीलच्या लोकांनी आमचे अगदी गळ्यात पडून स्वागत केले. पण पोर्तुगीज लोक ब्राझीलमध्ये काय करत होते?
मार्च ९, १५०० रोजी, पेद्रू आल्व्हारिश काब्राल आपल्या जहाजांचा काफिला घेऊन पोर्तुगालहून निघाला. भारतातील कॅलिकट शहरात पोर्तुगालसाठी व्यापारी केंद्र स्थापन करायचा त्याचा हेतू होता. पण थेट कॅलिकटला जाण्याऐवजी तो एप्रिल २३, १५०० रोजी ब्राझीलच्या किनाऱ्यावर (आता याला बहाया म्हटले जाते) उतरला.
काही संशोधकांचे म्हणणे आहे की पोर्तुगीज लोकांना ब्राझील देश माहीत असल्यामुळे काब्रालचे तेथे जाणे अचानक नव्हते. * काहीही असो, पण पोर्तुगीज व्यापाऱ्यांना व्यापार करण्याकरता ब्राझीलवुड शिवाय ब्राझीलमध्ये दुसरे काही नव्हते. ब्राझीलवुड वृक्षाचे लाकूड लाल रंगाचे असते व ते डायसाठी वापरले जाते. व्यापाऱ्यांना या लाकडाचे आकर्षण असणे साहजिक होते, पण भारतातील मसाल्यांचे आकर्षण यापेक्षा जास्त होते.
पोर्तुगालच्या राजाने फर्नान्दो द नोरोंये नावाच्या एका व्यापाऱ्याला दहा वर्षांसाठी ब्राझील देशाचा ठेका दिला. फर्नान्दो ब्राझीलमध्ये ब्राझीलवुडचा व्यापार करायचा आणि त्याच्या बदल्यात तो राजाला टॅक्स द्यायचा. पण अमेरिका खंडांतील या प्रदेशावर युरोपमधील दुसऱ्या देशांचीही नजर होती. त्यामुळे फ्रेंच, इंग्रज व स्पॅनिश खलाशी इथे
बेकायदा व्यापार करू लागले आणि नोरोंये त्या बेकायदेशीर व्यापाऱ्यांना थांबवू शकला नाही. ब्राझीलवरील आपला ताबा जाऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी १५३२ मध्ये वसाहतीकरण केले. साखरेचा व्यापार ब्राझीलचा सर्वात मोठा व्यापार बनला.अठराव्या शतकात सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या खाणींचा व्यापारही वाढू लागला. एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीपासून, ॲमेझॉन भागातील रबर वृक्षातून मिळणाऱ्या लॅटेक्सच्या उत्पन्नात देखील भरभराट झाली. * नंतर, कॉफीच्या उत्पादनामुळे ब्राझील समृद्ध होऊ लागला. नवनवीन शहरे निर्माण होऊ लागली. कॉफीची ने-आण करण्यासाठी रेलमार्ग सुरू करण्यात आला, सॅन्टॉस व रीउ दे झानेइरु यांसारखी बंदरे तयार झाली. एकोणीसाव्या शतकाच्या अंतापर्यंत तर जगातील एकंदर कॉफी उत्पादनापैकी निम्मे उत्पादन ब्राझीलमध्ये केले जात होते व साऊँ पाउलू शहर ब्राझीलचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले.
ब्राझीलमधील गुलामगिरीमुळे या देशाचा इतिहास काळवंडला. सुरवातीला, पोर्तुगीज वसाहतकारांनी, ब्राझीलवुड कापून वाहून नेण्यासाठी अमेरिकेतील मूळ रहिवाशांचा उपयोग केला. नंतर, त्यांना उसाच्या तोडणीचे काम देण्यात आले. दुःखाची गोष्ट म्हणजे, पुष्कळ स्थानीय लोकांना युरोपियन लोकांचे आजार जडले व यामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांच्या मृत्यूमुळे पोर्तुगीज व्यापाऱ्यांचे काम थांबले नाही कारण त्यांनी राहिलेले काम पूर्ण करून घेण्यासाठी आफ्रिकेतून निग्रो लोकांना गुलाम म्हणून आणले.
अनेक वर्षे, कोट्यवधी आफ्रिकी लोकांना गुलाम म्हणून ब्राझीलला आणण्यात येते होते. या आफ्रिकी लोकांनी त्यांच्यासोबत त्यांच्या संस्कृती, रीतीभाती आणल्या. लोकप्रिय सांबा संगीत, केपोएरा (एक प्रकारची लढण्याची पद्धत), खाण्या-पिण्याच्या पद्धतीवरून आपल्याला हे पाहायला मिळेल. फेझुऑडू हा एक खाद्य पदार्थ आहे जो काळ्या वालाच्या शेंगा, डुकराचे मांस, सॉसेज आणि वाळवलेले मांस यांनी बनवला जातो. मुळात आफ्रिकेतून आलेल्या या गोष्टी ब्राझीलमध्ये आज सर्वसामान्य आहेत. सरतेशेवटी १८८८ मध्ये ब्राझीलमधील गुलामगिरीचा अंत झाला. सुमारे ७,५०,००० लोकांना मुक्त करण्यात आले. यांच्यातील बहुतेक जण उसाच्या मळ्यांत काम करणारे लोक होते.
एकोणीसाव्या शतकापासून कोट्यवधी विदेशी लोकांनी ब्राझीलमध्ये स्थलांतर केले. यांत, जर्मन, इटालियन, जपानी, पोलिश, स्पॅनिश, स्वीस आणि सायरो-लेबनीझ लोकांचा समावेश होतो. ब्राझील हा राहण्यासाठी अतिउत्तम देश आहे. येथे विविध प्रकारची फुले, विविध प्रकारचे प्राणी आहेत. तसे म्हणायला गेले तर, ब्राझील नैसर्गिक विपत्तींपासून दूरच आहे. येथे, युद्धे होत नाहीत, भूकंप, ज्वालामुखी, वादळे नाहीत. तेव्हा, ब्राझीलला भेट देऊन तेथील काही प्रेक्षणीय स्थळे पाहायला तुम्हाला आवडेल का? तेथील पाहुणचारामुळे सुमारे ५०० वर्षांपूर्वी पोर्तुगीज फार प्रभावीत झाले होते कदाचित तुम्हालाही तोच अनुभव येईल व तेथील नेत्रदिपक निसर्ग पाहायला मिळेल.
[तळटीपा]
^ सन १४९४ मध्ये पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांनी तॉरदेशील्यासचा तह केल्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराच्या पश्चिमेकडील क्षेत्र त्यांनी आपसात वाटून घेतले. त्यामुळे काही लोकांचे म्हणणे आहे, की काब्राल हा पोर्तुगीजांच्या आधीच ताब्यात असलेल्या ब्राझीलवर कब्जा करायला निघाला होता.
^ सावध राहा! मे २२, १९९७ (इंग्रजी), पृष्ठे १४-१७ पाहा.
[१६, १७ पानांवरील नकाशा/चित्रे]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
ॲमेझॉनचा भाग
बहाया राज्य
ब्राझील्या
रीउ दे झानेइरु
साँऊ पाउलू
सॅन्टॉस
ईग्वासू धबधबा
[चित्रे]
१. पेद्रू आल्व्हारिश काब्राल
२. तॉरदेसील्यासचा तह, १४९४
३. कॉफी वाहून नेणारे मजूर
४. ब्राझीलहून दिसणारा ईग्वासू धबधबा
५. ईपिशूना इंडियन
[चित्राचे श्रेय]
Culver Pictures
Courtesy of Archivo General de Indias, Sevilla, Spain
ब्राझील व ब्राझीलवासी, १८५७ या पुस्तकातून
FOTO: MOURA
[१८ पानांवरील चित्रे]
१. ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्यूमा आहेत
२. ॲमेझॉन जंगलातील ऑर्किड फुले
३. बहाया राज्यातील साल्वाडोरचा पारंपारिक पोशाख
४. मॅकॉ
५. कोपाकाबाना बीच, रीउ दे झानेइरु. ब्राझीलला ७००० किलोमीटरहून अधिक लांबीचा सुंदर समुद्री किनारा लाभला आहे
[चित्राचे श्रेय]
Courtesy São Paulo Zoo
[१९ पानांवरील चित्र]
ब्राझील्या—१९६० पासून ब्राझीलची राजधानी
[१९ पानांवरील चित्र]
साँऊ पाउलू—ब्राझीलचे व्यापारी केंद्र
[चित्राचे श्रेय]
FOTO: MOURA
[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]
© १९९६ Visual Language