व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!”

“हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!”

दक्षिण कोरियाच्या एका कॉलेजमध्ये सो-जून मुलांसाठी सल्लागार म्हणून काम करते. तिने jw.org वेबसाईटवरचे व्हिडिओ क्लासमध्ये दाखवले. ती म्हणते, “मुलांनी जेव्हा खरा मित्र हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना तो खूपच आवडला! एकाने असं म्हटलं: ‘मी मैत्रीबद्दल असा विचार कधीच केला नव्हता. मैत्रीकडे पाहण्याचा हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!’ काहींनी म्हटलं की त्यांना जेव्हा सल्ल्याची गरज असेल तेव्हा ते ही वेबसाईट पाहतील.” सो-जून पुढे म्हणते: “मी या व्हिडिओबद्दल इतर शिक्षकांनाही सांगितलं आणि क्लासमध्ये शिकवण्यासाठी इतकं चांगलं साधन मिळालं, याचा त्यांना खूप आनंद झाला.”

दक्षिण कोरियामध्ये मुलांना आणखी एका व्हिडिओमुळे फार मदत झाली, तो म्हणजे हात न उचलता, त्रास देणाऱ्यांचा सामना करा! हा व्हाईटबोर्ड अॅनिमेशन व्हिडिओ. लहान मुलांमध्ये हिंसा टाळण्यासाठी काम करणाऱ्या एका संस्थेतील लेक्चर्रने, मुलांना हा व्हिडिओ दाखवला. ती म्हणते, “या व्हिडिओचं आर्टवर्क इतकं सुंदर आहे की मुलं अगदी लक्षपूर्वक ते पाहतात. आपण जर हिंसेला बळी पडलो तर त्यातून आपण कसं सावरू शकतो, इतकंच नाही तर आपल्याला हिंसा कशी टाळता येईल याबद्दल देखील व्यावहारिक सल्ले त्यात दिले आहेत.” या संस्थेने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये होणाऱ्या, आपल्या लेक्चर्समध्ये हा व्हिडिओ दाखवण्याची परवानगी मागितली आणि त्यांना ती मिळाली. काही पोलीस अधिकारीसुद्धा jw.org वर असलेल्या व्हिडिओजचा वापर करत आहेत.

तुम्ही ही वेबसाईट पाहिली आहे का? अजून पाहिली नसेल तर नक्की पाहा. ही वेबसाईट वापरायला खूप सोपी आहे. तुम्ही या वेबसाईटवरून ऑडिओ, व्हिडिओ, बायबल आणि इतर बरंच साहित्य विनामूल्य डाउनलोड करू शकता. (g16-E No. 5)