बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
आपला मृत्यू होतो तेव्हा आपलं काय होतं?
लोक काय म्हणतात? काही लोक म्हणतात की, आपण मरतो तेव्हा आपल्या शरीरातलं काहीतरी निघून जातं आणि ते कुठंतरी जिवंत राहतं. तर इतर जण असं म्हणतात की, आपण मरतो तेव्हा सगळंच संपतं. याविषयी तुम्हाला काय वाटतं?
बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
“मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) आपण मरतो तेव्हा आपलं काहीच अस्तित्व उरत नाही.
बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?
पहिला मानव, आदाम याचा मृत्यू झाला तेव्हा तो पुन्हा मातीला जाऊन मिळाला. (उत्पत्ति २:७; ३:१९) तसंच, लोक जेव्हा मरतात तेव्हा तेही पूर्णपणे नष्ट होतात.—उपदेशक ३:१९, २०.
लोक मरतात तेव्हा ते पापापासून मुक्त होतात किंवा त्यांना त्यांच्या पापांची क्षमा मिळते. (रोमकर ६:७) मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या पापांसाठी आणखीन कोणती शिक्षा भोगावी लागत नाही.
मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?
तुम्हाला काय वाटतं?
हो
नाही
माहीत नाही
बायबलमध्ये काय सांगितलं आहे?
“मरणातून पुन्हा उठणे होणार आहे.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५, ईझी-टू-रीड व्हर्शन.
बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?
बायबलमध्ये मृत्यूची तुलना झोपेशी करण्यात आली आहे. (योहान ११:११-१४) जसं आपण एखाद्या व्यक्तीला झोपेतून उठवू शकतो तसंच देवसुद्धा मृत व्यक्तीला उठवू शकतो.—ईयोब १४:१३-१५.
मृत लोकांना पुन्हा जिवंत केल्याचे बरेच अहवाल बायबलमध्ये दिले आहेत, त्यामुळे आपल्याला ठोस पुरावा मिळतो, की मृत लोकांना पुन्हा उठवले जाईल.—१ राजे १७:१७-२४; लूक ७:११-१७; योहान ११:३९-४४. (w16-E No. 1)