टेहळणी बुरूज क्र. १ २०२१ | देव आपल्या प्रार्थना खरंच ऐकत असेल का?
एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रार्थना करूनही उत्तर मिळालं नाही, असं कधी तुम्हाला वाटलं का? अनेकांना असं वाटतं. कारण बऱ्याचदा प्रार्थना केल्यावरही त्यांच्या समस्या, आहे तशाच राहतात. पण देव आपल्या प्रार्थना ऐकतो असं आपण विश्वासाने का म्हणू शकतो? काही प्रार्थनांची उत्तरं आपल्याला का मिळत नाहीत? आणि प्रार्थनांची उत्तरं हवी असतील, तर आपली प्रार्थना कशी असावी? या प्रश्नांची उत्तरं पुढच्या लेखांमध्ये दिली आहेत.
प्रार्थनेबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे?
प्रार्थना ही देवाकडून मिळालेली एक खास भेट आहे, की फक्त नावापुरती केली जाणारी गोष्ट आहे?
देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?
बायबल आपल्याला असं सांगतं, की आपण जर योग्य पद्धतीने प्रार्थना केली, तर देव आपल्या प्रार्थना नक्की ऐकेल.
काही प्रार्थनांची उत्तरं का मिळत नाहीत?
देव कोणत्या प्रार्थना ऐकतो आणि कोणत्या नाही, ते बायबल सांगतं.
प्रार्थना कशी करावी?
आपण कधीही आणि कुठेही देवाला प्रार्थना करू शकतो; अगदी मनातल्या मनातसुद्धा. येशूने आपल्याला प्रार्थना कशी करायची तेसुद्धा शिकवलं.
प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?
समस्यांचा सामना करण्यासाठी प्रार्थना कशी मदत करेल?
देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का?
बायबल म्हणतं, की तुम्ही देवाला प्रार्थना करता तेव्हा तो तुमचं ऐकतो. आणि तुम्हाला मदत करायची त्याची मनापासून इच्छा आहे.