व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

[डावीकडून उजवीकडे] मार्सेलो, योमारा आणि हिवर. प्रत्येकाने स्पॅनिश ब्रेल भाषेतली नवे जग भाषांतराची  आवृत्ती हातात धरली आहे

त्यांनी भाऊबहिणींचं प्रेम स्वतः अनुभवलं

त्यांनी भाऊबहिणींचं प्रेम स्वतः अनुभवलं

योमारा आणि तिचे भाऊ, हिवर आणि मार्सेलो, ग्वाटेमालाच्या छोट्याशा गावात राहतात. सगळ्यात आधी योमाराने बायबल अभ्यास करायला सुरवात केली. आणि मग काही काळाने तिच्या भावांनीही बायबल अभ्यास सुरू केला. पण एक समस्या होती. ही तिन्ही भावंडं अंध होती. आणि त्यावर त्यांना ब्रेल भाषासुद्धा येत नव्हती. म्हणून त्यांचा बायबल अभ्यास घेणाऱ्‍यांना सगळं काही वाचून दाखवावं लागायचं.

सभांना जाणं ही त्यांच्यासाठी आणखी एक समस्या होती. राज्य सभागृह त्यांच्या घरापासून ४० मिनिटांच्या अंतरावर होतं. आणि त्यांना स्वतःहून तिथे जाणं अशक्यच होतं. पण भावांनी त्यांना सभांना घेऊन जायची व्यवस्था केली. मग पुढे जेव्हा त्यांना विद्यार्थी भाग मिळायला लागले, तेव्हा इतर भावांनी ते भाग पाठ करण्यासाठी त्यांना मदत केली.

मे २०१९ ला, त्यांच्याच गावात मंडळीच्या सभा होऊ लागल्या. आणि तोपर्यंत एक पायनियर जोडपं, त्या गावात सेवा करायला आलं होतं. त्या तीन भावंडांना आपण ब्रेल भाषा शिकवायची असं त्यांनी ठरवलं होतं. पण त्यांनाच ब्रेल भाषा येत नव्हती. म्हणून त्यांनी स्वतः आधी ब्रेल भाषा शिकायचं ठरवलं. आणि त्यासाठी ते लायब्ररीत गेले. इतकंच काय, तर ती कशी शिकवायची हेही त्यांनी समजून घेतलं.

मार्सेलो सभेत उत्तर देताना

काही महिन्यांतच, ती तिघं भावांडं ब्रेल भाषा शिकली. आणि त्यामुळे त्यांना आध्यात्मिक प्रगती करता आली. आता योमारा, मार्सेलो आणि हिवर पायनियर म्हणून सेवा करत आहेत. मार्सेलो सहायक सेवक आहे. ही भावंडं यहोवाच्या सेवेत खूप व्यस्त आहेत. त्यांचा उत्साह पाहून दुसऱ्‍यांनाही आवेशाने यहोवाची सेवा करायला मदत होते.

मंडळीतले भाऊबहीण ज्या प्रकारे प्रेमाने या भावंडांना मदत करत आहेत, त्या गोष्टीची त्यांना मनापासून कदर आहे. योमारा म्हणते, “ज्या दिवसापासून साक्षीदार आम्हाला भेटलेत, तेव्हापासून आम्ही त्यांचं प्रेम अनुभवत आहोत.” मार्सेलो म्हणतो, “आम्हाला मंडळीत खूप चांगले-चांगले मित्र भेटले. आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की जगातल्या वेगवेगळ्या देशात आमचे भाऊबहीण आहेत. आणि ते सगळे असंच एकमेकांवर प्रेम करतात.” योमारा आणि तिचे भाऊ त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जेव्हा संपूर्ण पृथ्वी नंदनवन बनेल.​—स्तो. ३७:१०, ११; यश. ३५:५.