व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

अभ्यास करण्यासाठी एक टीप

महत्त्वाचं काय आहे ते ठरवा

वैयक्‍तिक अभ्यासासाठी आपल्या सगळ्यांनाच पुरेसा वेळ मिळत नाही. मग आपण आहे त्या वेळेचा सगळ्यात चांगला वापर कसा करू शकतो? सगळ्यात आधी तुम्ही जे वाचत आहात त्यासाठी पुरेसा वेळ द्या. खूपसाऱ्‍या गोष्टी पटपट वाचण्यापेक्षा तुम्ही जर थोडीशीच माहिती लक्ष देऊन वाचली तर तुम्हाला जास्त फायदा होईल.

त्यानंतर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते ठरवा. (इफिस. ५:१५, १६) तुम्ही या गोष्टी करू शकता:

  • दररोज बायबल वाचा. (स्तो. १:२) आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत बायबलचा जो भाग वाचण्यासाठी दिलेला असतो, तो वाचण्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता.

  • टेहळणी बुरूज  आणि आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेची तयारी करा. आणि उत्तरं द्यायला तयार असा.​—स्तो. २२:२२.

  • तुम्हाला वेळ मिळेल तसं, jw.org वर असलेल्या सार्वजनिक आवृत्त्या, व्हिडिओ आणि यांसारखं इतर साहित्य वाचायचा प्रयत्न करा.

  • तुमच्या आवडीच्या एखाद्या विषयावर संशोधन करा. जसं की तुम्ही तोंड देत असलेल्या एखाद्या समस्येवर, तुम्हाला पडलेल्या एखाद्या प्रश्‍नावर, किंवा तुम्हाला आणखी चांगल्या समजून घ्यायचा असेल अशा एखाद्या बायबलच्या विषयावर तुम्ही संशोधन करू शकता. यासाठी आणखी पर्याय हवे असतील तर jw.org/hi वर तुम्ही “पढ़ो, समझो और करो” हा भाग पाहा.