देवाच्या राज्याचा राजा कोण आहे?
देवाच्या राज्याचा राजा कोण असेल, हे ओळखण्यासाठी देवाने बरीच माहिती लिहून ठेवण्याची प्रेरणा अनेक बायबल लेखकांना दिली होती. या राजाबद्दल असं सांगण्यात आलं होतं, की
-
तो देवाने निवडलेला राजा असेल. “मी . . . आपला राजा अधिष्ठित केला आहे . . . मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतांपर्यंतचे स्वामित्व तुला देईन.”—स्तोत्र २:६, ८.
-
तो दावीद राजाचा वारस असेल. “आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे; . . . त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दावीदाच्या सिंहसनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तिथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करेल.”—यशया ९:६, ७.
-
त्याचा जन्म बेथलेहेममध्ये होईल. “हे बेथलेहेम . . . तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; . . . त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल.”—मीखा ५:२, ४.
-
त्याला तुच्छ लेखलं जाईल आणि मारून टाकलं जाईल. लोक “त्याला तुच्छ लेखत” आणि त्याच्याबद्दल असं म्हणायचे, “त्याला आम्ही मानले नाही. . . . तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला.”—यशया ५३:३, ५.
-
देव त्याला मेलेल्यांतून उठवेल आणि त्याचा गौरव करेल. “तू माझा जीव अधोलोकात [कबरेत] राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. . . . तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.”—स्तोत्र १६:१०, ११.
येशू ख्रिस्त सगळ्यात चांगला राजा
एक चांगला राजा कसा असावा याबद्दल सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, संपूर्ण मानवी इतिहासात फक्त एकाच माणसाच्या बाबतीत पूर्ण झाल्या आहेत. तो म्हणजे येशू ख्रिस्त. खरंतर एका देवदूताने येशूच्या आईला म्हणजे मरीयाला असं सांगितलं होतं, की “यहोवा त्याला त्याच्या पित्याचे अर्थात दावीदचे सिंहासन देईल, . . . त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”—लूक १:३१-३३.
पृथ्वीवर असताना येशू कधीच राजा बनला नाही. तर देवाच्या राज्याचा राजा म्हणून तो स्वर्गातून मानवजातीवर राज्य करेल. पण तो सगळ्यात चांगला राजा आहे, असं का म्हणता येईल? पृथ्वीवर असताना येशूने काय केलं याकडे लक्ष द्या.
-
मत्तय ९:३६; मार्क १०:१६) कुष्ठरोग झालेल्या एका माणसाने एकदा येशूला अशी विनंती केली, “तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.” हे ऐकून येशूला त्याची खूप दया आली आणि त्याने त्याला बरं केलं.—मार्क १:४०-४२.
येशूने लोकांना मदत केली. येशूने सर्व प्रकारच्या लोकांना मदत केली; स्त्री असो किंवा पुरूष, तरुण असो किंवा वृद्ध, समाजात त्यांचं काय स्थान आहे, ते श्रीमंत आहेत की गरीब याचा त्याने विचार केला नाही. ( -
देवाला कसं खूश करता येईल हे येशूने आपल्याला शिकवलं. तो म्हणाला, “तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” त्याने असंही सांगितलं, की इतरांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसंच आपणही त्यांच्याशी वागलं पाहिजे. यासोबतच त्याने हेसुद्धा सांगितलं, की देव फक्त आपलं वागणं-बोलणंच नाही, तर आपण कसा विचार करतो आणि आपल्याला काय वाटतं हेही पाहतो. म्हणून देवाला खूश करण्यासाठी आपण आपल्या भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. (मत्तय ५:२८; ६:२४; ७:१२) येशूने स्पष्टपणे सांगितलं, की आपल्याला जर खरंच सुखी व्हायचं असेल, तर देव आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि मग त्याप्रमाणे वागलं पाहिजे.—लूक ११:२८.
-
प्रेम करणं काय असतं हे येशूने शिकवलं. येशूचं वागणं-बोलणं इतकं प्रभावी होतं की ते त्याच्या ऐकणाऱ्यांच्या मनाला भिडायचं. “लोक त्याची शिकवण्याची पद्धत पाहून थक्क झाले, कारण तो . . . अधिकार असलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांना शिकवत होता.” (मत्तय ७:२८, २९) त्याने त्यांना शिकवलं, की “आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा.” इतकंच काय तर त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या काहींसाठी त्याने अशी प्रार्थना केली, “बापा, त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहेत ते त्यांना कळत नाही.”—मत्तय ५:४४; लूक २३:३४.
या जगावर राज्य करण्यासाठी येशूच सगळ्यात चांगला राजा आहे. कारण तो सर्वांना मदत करणारा आणि दयाळू आहे. पण तो राज्य करायला कधी सुरुवात करेल?