बायबल व्हिडिओ—महत्त्वाच्या शिकवणी
या छोट्या-छोट्या व्हिडिओंमध्ये बायबलबद्दल विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. जसं की, देवाने पृथ्वी का बनवली? मृत लोकांची काय अवस्था आहे? आणि देवाने दुःख का राहू दिलं?
सृष्टीची निर्मिती करण्यात आली होती का?
बायबलमध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटलं आहे, की एक निर्माणकर्ता आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनात या अहवालाबद्दल गैरसमज आहेत किंवा हा अहवाल काल्पनिक आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर मग विश्वाच्या सुरुवातीबद्दल बायबल जे म्हणतं त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का?
देवाला नाव आहे का?
देवाच्या अनेक उपाधी आहेत, जसे की सर्वसमर्थ, निर्माणकर्ता व प्रभू. पण बायबलमध्ये सुमारे ७,००० वेळा देवाच्या वैयक्तिक नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
देवासोबत मैत्री—तुम्हाला ती कशी करता येईल?
अनेक शतकांपासून माणसांना आपल्या निर्माणकर्त्यासोबत ओळख करून घ्यावीशी वाटते. बायबल आपल्याला देवासोबत मैत्री करायला मदत करू शकतं. या मैत्रीची सुरुवात देवाचं नाव माहीत करून होऊ शकते.
बायबलचा लेखक कोण आहे?
जर बायबल माणसांनी लिहिलं आहे तर त्याला देवाचे वचन म्हणणं योग्य ठरेल का? बायबलमध्ये कुणाचे विचार आहेत?
बायबल देवाकडून असल्याची खातरी आपण का बाळगू शकतो?
बायबल देवाने लिहिलेलं असल्यामुळे, त्याची तुलना मानवानं लिहिलेल्या कोणत्याही पुस्तकाशी कधीही केली जाऊ शकत नाही.
देवाने पृथ्वी का बनवली?
आपली पृथ्वी खूप सुंदर आहे. पृथ्वी सूर्यापासून योग्य अंतरावर आहे, तिला एका उचित कोनात झुकवण्यात आलं आहे आणि ती योग्य गतीने परिभ्रमण करते. देवाने पृथ्वीची रचना करण्यात इतकी मेहनत का घेतली?
तुम्हाला जीवनातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळू शकतात?
तुम्हाला जीवनाबद्दल, मृत्यूबद्दल आणि भविष्याबद्दल प्रश्न पडतात का? या आणि अशा इतर प्रश्नांची अर्थपूर्ण उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. पण ती तुम्हाला कुठे मिळतील?
मृत लोकांची काय अवस्था आहे?
बायबल असं अभिवचन देतं, एक अशी वेळ येईल जेव्हा लाजरप्रमाणे बर्याच लोकांना पुन्हा जिवंत केलं जाईल.
नरक हे खरोखरच यातनेचं एक ठिकाण आहे का?
बायबल सांगतं की “देव प्रेम आहे.” त्यामुळे तो कधीच लोकांना त्यांच्या आधीच्या चुकांसाठी यातना देऊ शकत नाही.
येशू ख्रिस्त देव आहे का?
येशू ख्रिस्त आणि सर्वसमर्थ देव एकच आहेत का? की त्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत?
येशूला का मरावं लागलं?
येशूच्या मृत्यूला बायबलमध्ये खूप महत्त्व दिलं आहे. पण त्याच्या मृत्यूमुळे काही साध्य होणार होतं का?
देवाचं राज्य काय आहे?
येशूच्या संपूर्ण सेवाकार्यादरम्यान, त्याने देवाचं राज्य या विषयाबद्दल सर्वात जास्त शिकवलं. अनेक शतकं त्याच्या शिष्यांनी हे राज्य येण्यासाठी प्रार्थना केली.
१९१४ पासून देवाचं राज्य सुरू झालं
जवळजवळ २,५०० वर्षांपूर्वी देवाने एका शक्तिशाली राजाला स्वप्न दाखवून भविष्यात काय घडणार आहे हे प्रकट केलं आणि आज ते पूर्ण होत आहे.
१९१४ पासून जगाचं बदललेलं चित्र
१९१४ पासून जगातल्या घटनांवरून आणि लोकांच्या मनोवृत्तींवरून दिसून येतं की ‘शेवटच्या दिवसांबद्दल’ बायबलमधल्या भविष्यावाण्या आज पूर्ण होत आहेत.
देवाने दुःख का राहू दिलं?
या जगात एवढा द्वेष व त्रास का आहे असा प्रश्न अनेक जण विचारतात. बायबल याचं समाधानकारक व सांत्वनदायक उत्तर देतं.
देवाच्या नजरेत सर्वच धर्म सारखे आहेत का?
तुम्ही कोणत्याही धर्मात असलात तरी त्याने काही फरक पडत नाही असं बरेच लोक मानतात.
उपासनेत मूर्तींचा वापर करण्याबद्दल देवाला काय वाटतं?
त्या आपल्याला डोळ्यांनी न दिसणाऱ्या देवाजवळ नेतात का?
देव सगळ्याच प्रार्थना ऐकतो का?
जर एखादा आपल्या स्वार्थी इच्छांसाठी प्रार्थना करत असेल, तर देव ती ऐकेल का? एखादा नवरा आपल्या बायकोशी वाईट वागत असेल आणि दुसरीकडे देवाला प्रार्थनेत आशीर्वाद मागत असेल तर देव त्याचं ऐकेल का?
पोर्नोग्राफी पाहणं देवाविरुद्ध पाप आहे का?
पोर्नोग्राफी हा शब्द तरी बायबलमध्ये आहे का? पोर्नोग्राफीबद्दल देवाला कसं वाटतं हे आपण कसं माहीत करून घेऊ शकतो?